Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedसशस्त्र सेना ध्वज दिनी विद्यार्थ्यांची अनोखी मानवंदना* जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस...

सशस्त्र सेना ध्वज दिनी विद्यार्थ्यांची अनोखी मानवंदना* जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस तर्फे आयोजन ; तब्बल ६० बाय ४० फूट आकारामध्ये ध्वजांची प्रतिकृती 

 

 

पुणे : भारताचा राष्ट्रध्वज तसेच लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या ध्वजांची भव्य प्रतिकृती न-हे येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस तर्फे साकारण्यात आली. भारत माता की जय च्या जयघोषात भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साज-या करण्यात येणा-या सशस्त्र सेना ध्वज दिनी ही अनोखी मानवंदना देण्यात आली.

 

संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. तब्बल ६० बाय ४० फूट आकारामध्ये हे ध्वज साकारण्यात आले होते. भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन भारतात दरवर्षी ७ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. देशाच्या सीमांचे रक्षण तीन सैन्य करतात. भारतीय लष्कर ध्वज दिन प्रत्यक्षात लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी साजरा केला जातो.

 

अ‍ॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, सशस्त्र सेना ध्वज दिवस हा भारताच्या प्रत्येक सैनिकाचा आणि देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. भारतीय सशस्त्र दलातील जवानांच्या कल्याणासाठी भारतातील लोकांकडून निधी गोळा करण्यासाठी समर्पित करण्यात आलेला दिवस आहे. त्यामुळे यादिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सैनिकांना अनोखी मानवंदना दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments