ILCE-7V: AI सब्जेक्ट रेकग्निशन क्षमतांमध्ये आणि स्टिल्स व व्हिडिओसाठी उच्च-वेगवान कामगिरीमध्ये प्रचंड प्रगती
नवी दिल्ली, 3 डिसेंबर 2025: सोनी इंडिया नव्याने विकसित केलेल्या अंशत: स्टॅक्ड Exmor RS™ CMOS इमेज सेन्सरवर आधारित आणि अंदाजे 33.0 प्रभावी मेगापिक्सेल सह लोकप्रिय Alpha 7 फुल-फ्रेम मिररलेस लाईन-अपमधील बहुप्रतीक्षित फिफ्थ जनरेशन ILCE-7V सादर करत आहे. नवीन इमेज प्रोसेसिंग इंजिन BIONZ XR2™ मध्ये अत्याधुनिक α™ (AlphaTM) मालिकेतील AI प्रोसेसिंग युनिटची कार्ये समाविष्ट केली आहेत. या नवकल्पनांमुळे, ILCE-7V Real-time Recognition AF (Auto-Focus) पासून Real-time Tracking, वेग, स्थिर रंग अचूकता, स्टिल कॅप्चर आणि व्हिडिओ बहुवैविध्य पर्यंत प्रतिमेच्या प्रत्येक घटकात कामगिरीत मोठी सुधारणा करते.
जोडीला, सोनी FE 28-70mm F3.5-5.6 OSS II हे फुल-फ्रेम सुसंगत, कॉम्पॅक्ट आणि हलके स्टँडर्ड झूम लेन्स सादर करत आहे. ते ILCE-7V च्या उच्च-गतीने सातत्यपूर्ण शूटिंगला पाठबळ देते.
“नव्याने सादर केलेला ILCE-7V हा ऑल-अराऊंड फुल-फ्रेम कॅमेरा एक नवीन मापदंड प्रस्थापित करत आहे. उत्कृष्ट इमेजिंग अनुभव देण्यासाठी तयार केलेले हे साधन सर्जनशीलतेच्या सीमा पुढे ढकलते आणि कल्पनातीत प्रतिमा कॅप्चर करते. ज्यांना सुधारित प्रगत नियंत्रण, अत्याधुनिक नाविन्यता आणि लायटनिंग, वेगवान गती हवी आहे अशा क्रिएटर्ससाठी हा कॅमेरा बनवण्यात आला आहे,” असे सोनी इंडियाच्या डिजिटल इमेजिंग बिझनेसचे प्रमुख मुकेश श्रीवास्तव यांनी सांगितले.
AI-प्रणीत कामगिरीला चालना
ILCE-7V मध्ये AI प्रोसेसिंग युनिट BIONZ XR2 इंजिनमध्ये एकत्रित केले आहे. त्यामुळे ऑटोफोकस वेग, अचूकता आणि विश्वसनीयतेमध्ये लक्षणीय वाढ होते. ILCE-7V मध्ये Real-time Recognition AF मध्ये 30% पर्यंत सुधारणा असून ते लक्ष्य केलेली वस्तू लगेच ओळखते आणि उच्च अचूकतेसह सतत कॅप्चर करत राहते. 759 फेज डिटेक्शन पॉईटस आणि 94% पर्यंत फ्रेम कव्हरेजसह, EV -4.0 पर्यंतच्या आव्हानात्मक कमी-प्रकाश परिस्थितीतही कॅमेरा जवळजवळ संपूर्ण प्रतिमाक्षेत्रात अचूक सब्जेक्ट ट्रॅकिंग सुनिश्चित करतो.
हाय रेझोल्युशन RAW प्रोसेसिंगला आता इमेजिंग ए़ज डेस्कटॉप ॲप्लिकेशनचा आधार असून त्यामुळे पोस्ट-प्रोडक्शनमध्ये अतुलनीय लवचिकता मिळते.
विना तडजोड उच्च गतिमान सातत्यपूर्ण शुटींग
ज्याचा रीडआउट वेग अंदाजे 4.5 पट ने वाढलेला आहे अशा अंशत: स्टॅक्ड Exmor RS™ CMOS इमेज सेन्सर आणि BIONZ XR2™ प्रोसेसर यांच्या संयोजनामुळे अत्यल्प डिस्टॉर्शनसह उच्च-गुणवत्तेची प्रतिमा मिळते.
जोडीला, 60 पट पर्यंत AF/AE calculations per second इतकी उच्च-अचूक ट्रॅकिंग क्षमता आणि ब्लॅकआउट फ्री सातत्यपूर्ण शुटींग 30 fps पर्यंत मिळते. क्रिएटर्सच्या गरजा समजून घेणे आणि त्यांच्या कल्पनांना आत्मविश्वासाने प्रत्यक्षात उतरविण्यास सक्षम उत्पादने तयार करणे या आमच्या तत्वाला अधिक बळकटी मिळते. भारतात व्हिज्युअल क्रिएटर्सच्या संख्येत उल्लेखनीय वाढ दिसत आहे आणि सोनी इंडियाला या वाढीमध्ये योगदान देताना अभिमान वाटतो.
ILCE-7V च्या माध्यमातून क्रिएटर्सना विविध शैलींमध्ये स्पष्टता, उद्देश आणि कल्पकतेसह त्यांचा दृष्टीकोन साकार करण्यास सक्षम करणाऱ्या विश्वासार्ह, उत्कट आणि जागतिक-स्तरीय इमेजिंग सोल्यूशन्स सादर करून आम्ही आमचे पर्यावरण, परिसंस्था अधिक मजबूत करत आहोत. AF/AE tracking मुळे जलद हालचाल करणाऱ्या आणि गुंतागुंतीच्या पद्धतीने हलणाऱ्या विषयांवर; जसे की वन्यजीव आणि क्रीडा छायाचित्रण; यांचे शूट करताना कोणताही क्षण चुकत नाही. 14-bit RAW शुटींग दरम्यानही ते 30 fps पर्यंत इतक्या उच्च-गतीच्या सतत शूटिंगला AF/AE tracking सह सक्षम करते.
शटर दाबण्यापूर्वी 1 सेकंद पर्यंत रेकॉर्ड करू शकणारे प्री कॅप्चर फंक्शन पाळीव प्राणी किंवा क्रीडा दृश्ये यांच्याबाबतीत होणाऱ्या अनपेक्षित हालचाली, अंदाज बांधता येणार नाहीत असे निर्णायक क्षण सहज कॅप्चर करते.
अतुलनीय स्थिर चित्र कामगिरी
कमाल सर्जनशील नियंत्रणासाठी डिझाइन केलेल्या ILCE-7V ला 16 stops ची गतिशील रेंज आहे. त्यामुळे प्रखर उजेड आणि सावलीमध्ये प्रभावी टोनल तपशील मिळतात. अत्यंत विरोधाभासी असलेल्या दृश्यांमध्येही ते गडद भागांपासून ते उजळ भागांपर्यंत नैसर्गिक आणि मृदू ग्रेडेशन देते.
बदल न होता सातत्यपूर्ण अचूक रंग प्रतिमा मिळण्यासाठी नवीन AI-प्रणीत ऑटो व्हाइट बॅलन्स (AWB) असून त्यायोगे अॅडव्हान्स्ड सीन विश्लेषणाचा लाभ घेतला जातो आणि डीप लर्निंग तंत्रज्ञानाद्वारे लाईट सोर्स एस्टीमेशन केले जाते. शूटिंग वातावरणातील प्रकाशस्रोत अत्यंत अचूकतेने ओळखून योग्य रंग-छटांमध्ये समायोजन केल्यामुळे, हे नैसर्गिक आणि स्थिर रंग प्रतिमेत मिळणे सुनिश्चित होते. त्यामुळे अधिक अस्सल रंग मिळतात आणि पोस्ट-प्रोडक्शनवरील कामाचे ओझे कमी होते.
व्हर्साटाईल व्हिडीओ क्षमता
हायब्रिड क्रिएटर्ससाठी सर्जनशील संधी वाढवत, ILCE-7V अतिरिक्त 4K रेकॉर्डिंग मोड्स सादर करते. त्यात 7K oversampled 4K 60p रेकॉर्डिंग संपूर्ण फ्रेम मोडमध्ये उपलब्ध आहे आणि 4K 120p recording APS-C mode/Super 35mm मध्ये समाविष्ट आहे. संपादनासाठी अतुलनीय लवचिकतेसह समृद्ध, तपशीलवार फुटेज पुरविते. फुल पिक्सेल रीडआउट विदाऊट पिक्सेल बिनिंग मुळे अत्यंत सूक्ष्म तपशिलांसह उच्च-गुणवत्तेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग शक्य होते.
इमेज स्टॅबिलायझेशनमधील डायनॅमिक अॅक्टिव्ह मोड मुळे हातात धरून शूटिंग करतानाही व्यवस्थित आणि स्थिर व्हिडिओ मिळतात. व्लॉग्सपासून क्रिएटिव्ह प्रोडक्शनपर्यंत आणि कौटुंबिक क्षण कॅप्चर करण्यापर्यंत विविध दृश्यांमध्ये वापरकर्ते उच्च-गुणवत्तेच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगचा आनंद घेऊ शकतात.
कॅमेऱ्यातील ऑटो फ्रेमिंग फंक्शन AI प्रणीत subject recognition वापरून रेकॉर्डिंग दरम्यान त्या गोष्टीचे ऑप्टिमल कॉम्पोझिशन आपोआप कायम ठेवते. यामुळे विविध दृश्यांमध्ये स्थिर आणि योग्य फ्रेमिंगसह व्हिडिओ रेकॉर्डिंग शक्य होते.
नवीन इन-कॅमेरा नॉईज रिडक्शन आणि सुधारित इंटरनल माइक फंक्शनॅलिटी पार्श्वभूमीतील आवाज कमी करून, हस्तक्षेप कमी करून आणि नैसर्गिक ध्वनी राखून उच्च-गुणवत्तेचे ऑडिओ रेकॉर्डिंग सुनिश्चित करतात.
विश्वासार्हतापूर्वक जोडणी
ILCE-7V मध्ये अपग्रेडेड पॉवर मॅनेजमेंट आणि वाढीव स्टॅमिना परफॉर्मन्स आहे. त्यामुळे व्यत्यय न येता लांब शूटिंग सेशन्स शक्य होतात. नवीन मॉनिटर लो ब्राइट मोड बॅटरी लाइफ आणखी वाढवतो, तर सुधारित थर्मल मॅनेजमेंटमुळे CIPA मानकांनुसार व्ह्यू फायंडर वापरताना अंदाजे 630 शॉट्स असा अव्याहत गुणवत्तेसह दीर्घ 4K recording ला आधार मिळतो.
FE 28-70mm F3.5-5.6 OSS II – The ऑल-अराऊंड लेन्स
कॉम्पॅक्ट (आटोपशीर), वजनाने हलकी आणि उच्च-वेगासाठी डिझाइन केलेली FE 28-70mm F3.5-5.6 OSS II लेन्स ILCE-7V सेन्सरच्या सातत्यपूर्ण शूटिंग क्षमतांचा पूर्ण लाभ घेण्यासाठी तयार केली आहे. सुसंगत कॅमेऱ्यांसोबत वापरल्यास ही नवीन लेन्स 120 fps पर्यंत AF/AE tracking, सातत्यपूर्ण शूटिंग, विनाअडथळा बॉडी लेन्स कोऑर्डिनेटेड इमेज स्टॅबिलायझेशन, झूमिंग दरम्यानही उपलब्ध AF आणि अंगभूत ब्रीदिंग कॉम्पेन्सेशन पाठबळ पुरविते. गतिमान अॅक्शन शॉट्सपासून वेगवान प्रसंग किंवा उच्च-गुणवत्तेच्या व्हिडिओ कॅप्चरपर्यंत ही लेन्स हळुवार, विश्वसनीय प्रतिसाद आणि लवचिकता देते.
सामाजिक जबाबदारी
सोनीच्या महत्त्वाकांक्षी ‘रोड टू झिरो’ उपक्रमाशी सुसंगत राहून हे उत्पादन 2050 पर्यंत पर्यावरणावर शून्य परिणाम करणाऱ्या कंपनीच्या दृष्टीकोनाला समर्थन देते. सोनी ग्रुपच्या ILCE-7V आणि FE 28-70mm F3.5-5.6 OSS II यांचा समावेश असलेल्या इमेजिंग उत्पादनांच्या उत्पादन सुविधा केंद्रामध्ये 100% अक्षय ऊर्जा वापरली जाते. पॅकेजिंगमध्ये प्लास्टिकऐवजी सोनीचे पर्यावरणपूरक ओरिजिनल ब्लेंडेड मटेरियल वापरण्यात आले आहे.
किंमत आणि उपलब्धता
ILCE-7V Body 10 डिसेंबर 2025 पासून उपलब्ध होईल आणि ILCE-7V M-kit फेब्रुवारी 2026 पासून उपलब्ध होईल. ही उत्पादने सोनी सेंटर, निवडक क्रोमा आणि रिलायन्स आउटलेट्स, www.ShopatSC.com पोर्टल आणि अॅमेझॉन वर उपलब्ध असतील.
मॉडेल नाव
किंमत
उपलब्धता
ILCE-7V Body
255,990
10 डिसेंबर 2025 पासून
ILCE-7V M-kit
270,490
फेब्रुवारी 2026 पासून


