Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर...

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी

पुणे, दि.८: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात आज झालेल्या विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी घेण्यात आली. अर्ज निकाली काढण्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने तत्परतेने कार्यवाही करावी, असे आदेश त्यांनी दिले.

 

यावेळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक सुनील फुलारी, अपर आयुक्त तुषार ठोंबरे तसेच विविध विभागांचे विभागस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

 

विभागातील सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून न्याय्य पद्धतीने व तत्परतेने सोडवणूक करण्यासाठी दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्हास्तरीय लोकशाही दिनात तक्रार निवारण न झालेल्या दोन व प्रलंबित एक अशा तीन प्रकरणावर डॉ. पुलकुंडवार यांनी अर्जदारांना म्हणणे मांडण्याची संधी दिली आणि सुनावणी घेतली. ही तीनही प्रकरणे पुणे जिल्ह्यातील होती.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments