Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्रेट प्लेस टू वर्क®’ (GPTW) तर्फे ‘सी.डी.के (CDK)’ ला 2025...

ग्रेट प्लेस टू वर्क®’ (GPTW) तर्फे ‘सी.डी.के (CDK)’ ला 2025 साठी भारतातील टॉप-१०० (IT&ITES) माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान-सहाय्यभूत सेवा कंपन्यांमध्ये स्थान!

भारत, ८ डिसेंबर २०२५: ऑटोमोटिव्ह रिटेल सॉफ्टवेअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी सीडीके (CDK) ला ग्रेट प्लेस टू वर्क (Great Place to Work®) तर्फे 2025 साठी भारतातील टॉप-१०० (IT&ITES) माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान-सहाय्यभूत सेवा वर्कप्लेस मध्ये स्थान देण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणीची संस्कृती, कर्मचारी अनुभव आणि नेतृत्व याविषयी जागतिक प्राधिकरणाकडून मिळालेली ही मान्यता CDK च्या तंत्रज्ञान-आधारित कार्यस्थळ तयार करण्याच्या सततच्या प्रयत्नांचे प्रतिक आहे—जिथे स्वायत्तता, स्पष्टता आणि प्रामाणिकता ही रोजच्या निर्णयप्रक्रियेची मुख्य तत्त्वे आहेत.

 

 

 

संस्थेचे India’s Best Workplaces in IT & IT-BPM List 2025 मधील स्थान ‘दोन प्रमुख निकषांवर’ आधारित असते:

 

1. Great Place To Work Trust Index™ Survey: कर्मचाऱ्यांकडून मिळणाऱ्या गोपनीय अभिप्रायाद्वारे कर्मचारी अनुभवाची गुणवत्ता मोजली जाते. बेस्ट वर्कप्लेस यादीत समावेशासाठी एकूण गुणांपैकी 75% गुण या सर्वेक्षणातून दिले जातात.

 

2. Culture Audit™: नेतृत्वाची क्षमता, मूल्ये व तत्त्वज्ञान, तसेच कर्मचारी अनुभव घडवणाऱ्या उपक्रमांची गुणवत्ता तपासली जाते. हे कर्मचाऱ्यांमध्ये सातत्यपूर्ण विश्वास निर्माण करण्यास आणि त्यांना संपूर्ण क्षमतेने काम करण्यास सक्षम बनवतात. एकूण गुणांपैकी 25% गुण या घटकावर आधारित असतात.

 

 

 

सीडीके, भारताचे चे वरिष्ठ मानव संसाधन संचालक-श्री आशिष सक्सेना, म्हणाले: “CDK ला पुन्हा एकदा भारतातील टॉप 100 वर्कप्लेसमध्ये स्थान मिळाल्याचा आम्हाला अभिमान आहे! ही नवी मान्यता देशभरातील सर्व IT आणि ITES कंपन्यांमधील आमच्या कामगिरीचे प्रतिनिधित्व करते, मग त्यांचा आकार काहीही असो. या मान्यतांनी आमच्या कर्मचाऱ्यांप्रतीच्या अविचल बांधिलकीला अधोरेखित केले आहे — कारण तेच आमची सर्वात मौल्यवान संपत्ती आहेत. आम्ही समावेशक आणि पारदर्शक प्रक्रिया निर्माण केल्या आहेत, ज्यामुळे आमचे इंजिनिअर्स, विश्लेषक, ग्राहक आणि उत्पादन संघ आपल्या कामाचा प्रभाव समजू शकतात, कंपनीतच वाढीची संधी शोधू शकतात आणि विविध भूमिकांमध्ये प्रगती करू शकतात — हे सर्व ‘विश्वासाच्या’ संस्कृतीवर आधारित आहे!”

 

 

 

Great Place to Work® च्या 2025 सर्वेक्षणातील CDK कर्मचाऱ्यांचे निष्कर्ष:

 

• 92% कर्मचाऱ्यांनी सांगितले की गरज पडल्यास ते कामातून वेळ काढू शकतात.

 

• 93% म्हणाले की संस्था जॉईन करताना सहकारी आणि व्यवस्थापनाकडून त्यांना स्वागतार्ह वातावरण मिळाले.

 

• 87% कर्मचाऱ्यांनी CDK मधील मैत्रीपूर्ण, सहयोगी संस्कृतीचा अनुभव असल्याचे सांगितले.

 

 

 

सीडीके भारताचे चे व्यवस्थापकीय संचालक-श्री संदीप जैन, यांनी म्हटले: “ही मान्यता, ऑटोमोटिव्ह रिटेल सॉफ्टवेअरमधील आमची खोल डोमेन एक्स्पर्टाइज, मजबूत अभियांत्रिकी क्षमता आणि तत्पर ग्राहक सहाय्य संघ एकत्रितपणे प्रगत होऊ शकतील असे कार्यस्थळ निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अधिक बळ देते!”

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments