चेन्नई, भारत- डायमलर इंडिया कमर्शीयल वेहिकल्स (DICV), डायमलर ट्रक एजीचा संपूर्ण मालकीचा असलेल्या सबसिडरी द्वारे आज BB1924, या हेवी-ड्युटी बसचे सादरीकरण करण्यात आले ज्याची रचना ही विशिष्ठ पद्धतीने भारताचा वाढत्या आंतर शहरीय प्रवासी परिवहनाकरिता करण्यात आलेली आहे. या वाहनाचे निव्वळ वाहन वजन हे (GVW) 19,500 किलो (19.5टन) आहे, BB1924 मुळे भारतातील आंतर शहरीय बस चालकांचा कठीण अशा समस्यांचे समाधान केले जाणार आहे, ज्यांना उच्च पेलोड क्षमता, कमी वापर खर्च आणि उत्तम प्रवासी अनुभव देण्याची गरज असते ज्यामुळे देशाचा वाढत्या प्रवास मागणीचे योग्य पद्धतीने समाधान करता येऊ शकेल. भारताचा बस बाजारपेठेचा भाव हा अमेरिकन डॉलरमध्ये USD 51.09 बिलियन असून 2030 पर्यंत 5.36% CAGR ने वाढण्याची शकयता आहे. या नव्या चेसिसमुळे भारत बेन्झला मुख्य आंतर शहरीय विभागाचा एक महत्वाचा भाग मिळविण्याची संधी मिळाली आहे.
या सदरीकरणाचा वेळी बोलताना, DICV चे बस व्यवसाय प्रमुख , अंदामुथु पोनुसमी म्हणाले,
“आंतर शहरीय गतीशीलतेप्रती असलेल्या अमचा विचारांचे प्रतिनिधीत्व BB1924 चा माध्यमाने केले जाणार आहे. आधुनिक सुरक्षा वैशिष्ठ्यांसह, औद्योगिक – गरजांनुसार स्थानिकीकरण आणि मालकीची एकूण किंमत यावर आमचे लक्ष आहे. भारतबेन्झने आंतर शहरी गतीशीलतेमध्ये आपले स्वत:चे एक स्थान आणि विश्वसनीयता निर्माणा केली आहे. आमचा फ़िल्ड ट्रायल्सचा मार्ग हा प्रामुख्याने मुंबई-पुणे, दिल्ली-जयपूर आणि चेन्नई- बेंगलोर असा होता ज्यामध्ये उपलब्ध असलेल्या उपायोजनांचा तुलनेत मालकीचा एकूण किंमतीत बऱ्याच प्रमाणात घट झाल्याचे लक्षात आले आहे.”
ऑपरेटर्सचा यशाकरिता व्यापक सहाय्य प्रणाली
BB1924 भारतबेन्झचा 398 अधिकृत टचपॉईंट्सवरती भारतभरात उपलब्ध असेल, ज्यामुळे सहज उपलब्धता आणि संपूर्ण भारतात डिलिवरी सहाय्याची हमी मिळेल. वाहनाची उपलब्धता सहज आणि सोपी व्हावी म्हणून, भारतबेन्झने 15+ अग्रगण्य बॅंकांसह NBFCsचा माध्यमाने स्पर्धात्मक आर्थिकतांची उपलब्धी करून दिली आहे ज्यामध्ये व्याजाचा दर हा 8.5% प्रतीवर्षापासून सुरू होत ईएमआयचा कालावधी हा लवचिक आणि पाच वर्षांपर्यंतचा असेल.
भारतबेन्झची बांधिलकी ही विक्रीचा पलिकडे जाऊन उद्योग- त्यापलिकडील- विक्री सहाय्यापर्यंत आहे. प्रत्येक BB1924 सह येते व्यापक 6-वर्षांची किंवा 6 लाख किलोमीटरपर्यंतची पावरट्रेन वॉरंटी, त्यासह संपूर्ण देशामध्ये 24×7 रस्त्यावरील सहाय्य. कंपनी 24/48 तासांमध्ये 95% पार्ट्सचा उपलब्धीची हमी देते कारण कंपनीची मजबूत अशी स्थानिक सप्लाय चेन आहे, ज्यामुळे किमान वेळेत उत्तम कार्यकारी स्थपानेची हमी देता येते. ऑपरेटर्सला याशिवाय IoT-आधारीत टेलिमॅटिक्सचा वापर करून आपल्या कामाचे व्यवस्थापन वाढविता येऊ शकते, तसेच व्यापक ड्रायवर आणि टेक्निशीयन प्रशिक्षण उपक्रम हे स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जातील ज्यामुळे संपूर्ण अशा वाहन कौशल्याची हमी देता येऊ शकेल. नवीन बससाठी(AMC) व्यवस्थापन हे 6वर्ष /6 लाख किलोमीटर पर्यंतचे करून देण्यात आले आहे तसेच ग्राहक सहाय्य हेल्पलाईन देखील असेल ज्यामुळे संपूर्ण मालकी अनुभवासह, ऑपरेटरचा दीर्घकालीन लाभासह मानसिक स्वास्थ्याप्रती देखील बांधिलकी जोपासली जाईल.
प्रवाशांची सुरक्षितता सर्वतोपरि
भारतबेन्झचा अभियांत्रिकी तत्वज्ञानामध्ये सुरक्षा हा एक महताचा स्तंभ आहे. BB1924 ची रचना ही काळजीपुर्वक पद्धतीने केली गेली असून प्रवाशांचा तसेच ड्रायवर आणि ऑपरेटर्सचा सुरक्षिततेवर कुठेही तडजोड केली गेलेली नाही. आधुनिक प्रणालींनी युक्त ॲन्टी-ब्रेकिंग सिस्टिम (ABS), इलेक्ट्रॉनिक वेहिकल स्टॅबिलिटी कंट्रोल (EVSC) आणि CAN आधारीत, ECU नियंत्रित इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिटार्डर ज्यामध्ये आहे 5-स्तरीय नियंत्रण तंत्रज्ञान. यामुळे मिळते सुधारीत वाहन नियंत्रणाची हमी आणि मागणीनुसार रस्त्याचा अवस्थांप्रमाणे कमी अंतरावर मारता येईल असा ब्रेक. उच्च-टेन्साइल स्टील चेसिसमुळे उत्तम रचनात्मक एकीकरण आणि क्रॅशविरोधी संरक्षण देखील मिळते तसेच फ़ॅक्ट्रीमध्ये निर्मीत मिशेलिन रेडियल ट्युबलेस टायरमुळे मिळते उत्तम ट्रॅक्शन आणि टिकाऊपणा. भारतबेन्झचा सुरक्षा सर्वतोपरि या धोरणामध्ये, ड्रायवर प्रशिक्षण उपक्रम आणि संभाव्य व्यवस्थापन उपाययोजनांची माहिती देखील दिली जाईल, ज्यामुळे कंपनीची सुरक्षितता, विश्वसनीयता आणि परिणामकारक आंतर शहरी परिवहनाप्रती असलेली बांधिलकी जोपासली जाईल.
उत्पादनाची वैशिष्ठ्ये
BB1924 ची वैशिष्ठ्यांमध्ये एक महत्वाची बाब म्हणजे 19,500 किलो GVW एवढी उच्च प्रवासी क्षमता (सुमारे 51+1+1 सीट) आणि सामानाचे वजन, ज्यामुळे आंतर शहरी फ़ेऱ्यांमध्ये प्रत्येक फ़ेरीसह कमाल भाड्याची वसूली होऊ शकेल. भारत बेन्झचा 92% स्थानिक सपलाय चेनद्वारे निर्मीत, हा चेसिस किंमतीप्रती अतीशय स्पर्धात्मक असून याचे सगळे पार्ट्स उपलब्ध आहेत.
तांत्रिक वैशिष्ठ्ये:
पावरट्रेन
BS-VI OBD-II OM926, 6-सिलेंडर डिझेल इंजिनसह टर्बोचार्जर आणि इंटरकुलर, 241 एचपी पावरची निर्मीती होते आणि 850 एनएम फ़्लॅट टॉर्क्सह आरपीएमची श्रेणी
6- स्पीड सिन्क्रोमेश गिअरबॉक्स जो विशेषकरून हायवेवरील परिणामकारकतेकरिता आहे
6- वर्ष 6 लाख किलोमीटर पावरट्रेन वॉरंटी
सुरक्षा आणि आराम
ॲन्टी -रोल बार्स सह फ़्रन्ट आणि रेअर न्युमॅटिक सस्पेन्शन
ABS सह EBD
5-स्तरीय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रिटार्डर (ज्यामुळे ब्रेकची झिज 40% ने )
इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल
क्रुझ कंट्रोल
ब्रेक होल्ड असिस्ट
TFT डिस्प्लेचा माध्यमाने सावधानता इशारा
चेसिस आणि बिल्ड
हाय टेन्साइल स्टील फ़्रेम: 255 x 73.3 x 7 मिलीमी
व्हीलबेस: 6,850 मिलीमी
फ़ॅक्ट्री फ़िटेड मिशिलिन 295/80 R22.5 रेडियल ट्युबलेस टायर्स
कार्यकारी वैशिष्ठ्ये
इंधन टाकीची क्षमता: 380लिटर (1,300+ किलो श्रेणी)
सर्विसचा कालावधी: 1ली सर्व्हिस 60,000 किलो. मीटर त्यानंतर प्रत्येक 1,20,000 किलोमीटर
10–15 वर्षांचा सेवा आयुष्याकरिता निर्मीत
###
डायमलर ट्रक आणि डायमलर इंडिया कमर्शीयल वेहिकल्सची अधिक माहिती ही:
Asia.daimlertruck.com आणि www.daimlertruck.com वर उपलब्ध आहे
डायमलर ट्रकवर एक कटाक्ष
डायमलर ट्रक होल्डिंग्ज एजी (“डायमलर ट्रक”) हे जगातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादनकर्त्यांपैकी एक असून, 40 पेक्षा जास्त प्रमुख ठिकाणे आणि जगभरात 100,000 पेक्षा अधिक कर्मचारी आहेत. डायमलर ट्रकच्या संस्थापकांनी आधुनिक परिवहन उद्योगाचे संशोधन करत आपले ट्रक्स आणि बसेस सुमारे 125 वर्ष कार्यरत ठेवले आहेत. आजच्या दिवसापर्यंत, कंपनीची महत्वाकांक्षा ही एकाच ध्येयाशी समर्पित आहे: डायमलर ट्रक्स अशा सगळ्यांकरिता जे या जगाला फ़िरते ठेवतात. आमचे ग्राहक लोकांना गतीशीलता प्रदान करत, माल त्यांच्या ठिकाणी विश्वासार्हतेने, वेळेवर आणि सुरक्षितपणे पोहोचविण्यास सक्षम करतात. डायमलर ट्रक त्यांना तसे करण्यासाठी तंत्रज्ञान, उत्पादने आणि सेवा प्रदान करतात. यामध्ये CO2-neutral ड्रायविंगचे परिवर्तन देखील समाविष्ट आहे. कंपनी शाश्वत परिवहन यशस्वी करण्याचा प्रयत्न करत आहे, ज्याकरिता सखोल तांत्रिक ज्ञान आणि ग्राहकांच्या गरजांचा स्पष्ट दृष्टीकोन विचारात घेतला जातो. डायमलर ट्रक्सच्या व्यावसायिक हालचाली पाच रिपोर्टिंग सेग्मेंट्समध्ये संरचित आहेत: ट्रक्स नॉर्थ अमेरिका (टीएन) ज्यात फ़्रेटलाइनर आणि वेस्टर्न स्टार ट्रक ब्रॅन्ड्ससह स्कूल बस ब्रॅन्ड थॉमस बिल्ट बसेसचा समावेश होतो. ट्रक्स एशीया (टीए) ज्यात फ़ूसो (FUSO) आणि रायझोन (RIZON) कमर्शीयल वाहनांचा समावेश होतो. मर्सिडीज-बेन्झ ट्रक्स (MBT), ज्यात याच नावाचे ट्रक ब्रँड आणि भारतबेन्झ (BharatBenz) समाविष्ट आहेत. डायमलर बसेस (डीबी) ज्यात मर्सिडीज बेन्झ आणि सेटरा बस ब्रॅन्डचा समावेश होतो. डायमलर ट्रक्सचा नवीन फ़ायनान्शीयल सर्व्हिसेस बिझनेस (DTFS) हा पाचवा सेग्मेंट आहे. ट्रक श्रेणीमधील उत्पादनांमध्ये हलके, मध्यम आणि हेवी ट्रक्स, दीर्घ-परिवहन, डिस्ट्रिब्युशन आणि कन्स्ट्रक्शन ट्राफ़िक सह विशेष उपयुक्तता वाहनांचा समावेश होतो, ज्यांचा वापर प्रामुख्याने महानगरपालिका आणि व्होकेशनल विभागात केला जातो. बस सेग्मेंटमधील उत्पादनांमध्ये सिटी बसेस, स्कूल बसेस आणि इंटरसिटी बसेससह कोचेस आणि बस चेसिसचा समावेश होतो. नव्या आणि वापरलेल्या व्यावसायिक वाहनांच्या विक्रीशिवाय, कंपनीद्वारे विक्रीनंतरच्या सेवा आणि कनेक्टिव्हिटी उपाययोजना देखील प्रदान केल्या जातात.
डायमलर इंडिया कमर्शीयल वेहिकल्स प्रायवेट लिमिटेड वर एक दृष्टीक्षेप
डायमलर इंडिया कमर्शीयल वेहिकल्स (डीआयसीव्ही) ही डायमलर ट्रक एजी, जर्मनीची एक संपूर्ण मालकी असलेली सबसिडरी आहे, जी भारतातील व्यावसायिक वाहनांकरिता कार्यरत आहे आणि त्यांचा ब्रॅन्ड हा देशातील बाजारपेठेमध्ये समर्पित आहे: भारतबेन्झ. डीआयसीव्ही द्वारे 10 ते 55 टनच्या ट्रक्सची निर्मीती आणि विक्री केली जाते, शिवाय भारतबेन्झच्या बसेस, मर्सिडीज-बेन्झचे कोचेस आणि बस चेसिस देखील विकले जातात. डीआयसीव्हीचे अत्याधुनिक असे युनिट चेन्नईजवळ ओरागडम येथे सुमारे 400 एकरवरती (160 हेक्टर) पसरलेले असून यात आधुनिक टेस्ट ट्रॅक आहेत, शिवाय कंपनीचे मुख्यालय, संशोधन आणि विकास विभाग आणि प्रशिक्षण कार्यकारी क्षेत्र देखील आहे. जागतिक गुणवत्तेसह, डायमलर ट्रक्सची निर्मीती ही फुसो (FUSO), मर्सिडीज-बेन्झ आणि फ़्रेटलाइनर ब्रॅन्ड अंतर्गत केली जाते. उत्पादने आणि त्यांचे पार्ट्स हे अफ़्रिका, आशीया, लॅटिन अमेरिका आणि मिडिल ईस्टसह 60 बाजारपेठांमध्ये निर्यात केले जातात. डीआयसीव्ही भारतीय चलनानुसार 9,56
0 कोटींच्या गुंतवणूकीचे प्रतिनिधीत्व करते.


