Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedआरोग्याबाबत जागरूक ग्राहकांसाठी आता स्विगीकडे लो कॅलरी श्रेणी

आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांसाठी आता स्विगीकडे लो कॅलरी श्रेणी

भारतातील टॉप 10 शहरांमध्ये लाईव्ह

स्विगी अ‍ॅपवर 500 किलोकॅलरीपेक्षा कमी प्रमाणाचे 2.2 लाख पदार्थ उपलब्ध

हलके भारतीय जेवण, पौष्टिक नाश्ता पर्याय, स्नॅक्स, स्टार्टर्स, सूप, सॅलड्स आणि कमी-कॅलरी डेझर्ट्स आणि शेकसह मोठी निवड

 

राष्ट्रीय, 10 डिसेंबर 2025– भारतातील आघाडीचे ऑन-डिमांड सुविधा प्लॅटफॉर्म असलेल्या स्विगी (स्विगी लिमिटेड, NSE: SWIGGY / BSE: 544285) ने आज त्यांच्या लो कॅलरी श्रेणीची घोषणा केली, ज्या अंतर्गत ग्राहकांना पौष्टिक परंतु हलक्या खाण्याच्या पर्यायांसह मदत करण्यासाठी खास तयार केलेला संग्रह आहे. या सरुवातीमुळे ग्राहकांना पौष्टीक अन्न पर्याय देण्याच्या स्विगीच्या वचनबद्धतेला बळकटी मिळते. लो कॅलरी श्रेणी बेंगळुरू, मुंबई, दिल्ली केंद्रशासीत प्रदेश, पुणे, हैदराबाद आणि चेन्नईसह भारतातील अग्रेसर 10 शहरांमध्ये लाईव्ह आहे. यात 500 किलोकॅलरीपेक्षा कमी प्रमाण असलेले 2.2 लाख पदार्थ आहेत आणि त्यात सूप, सॅलड, हलके भारतीय जेवण, नाश्ता पर्याय, स्नॅक्स, स्टार्टर्स आणि अगदी कमी-कॅलरी डेझर्ट्स आणि शेक यांसह विविध प्रकारच्या पदार्थांचा समावेश आहे.

 

आजकाल आरोग्याबाबत जागरूक असलेल्या ग्राहकांसाठी खास तयार केलेली, लो कॅलरी श्रेणी अशा व्यक्तींना उपलब्धता देईल जे आरोग्य-केंद्रित आहार पसंत करतात किंवा वजन कमी करण्याच्या प्रयत्नात आहेत आणि दररोजच्या जेवणाचे स्मार्ट पर्याय शोधत आहेत. चव किंवा विविधतेचा त्याग न करता, प्रयत्नपूर्वक खाणे सुलभ आणि आनंददायी बनवण्यासाठी ही सुविधा तयार केली आहे. “लो कॅलरी” साठी युजर सहजच शोध घेऊन, 0-300, 300-400 आणि 400-500 किलो कॅलरीजच्या बकेटद्वारे दिलेले पदार्थ त्वरित शोधू शकतात आणि हाय प्रोटिन लो कॅलरी जेवणाचे पदार्थ, नो अॅडेड शुगर लो कॅलरी पदार्थ, हाय फायबर लो कॅलरी पदार्थ आणि नो फ्राय लो कॅलरी पर्याय यांसारख्या त्यांना हवे त्या श्रेणींचा शोध घेऊ शकतात.

 

स्विगीच्या फूड स्ट्रॅटी, कस्टमर एक्सपिरियंस अँड न्यु इनिशिएटिव्ह विभागाचे उपाध्यक्ष दीपक मालू म्हणाले, “आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांना तुमच्यासाठी चांगले पर्याय देण्याच्या आमच्या वचनबद्धतेतील लो कॅलरी श्रेणी हा पुढचा टप्पा आहे. आमच्या हाय प्रोटीन पर्यायांच्या यशस्वी सुरुवातीनंतर, हाय प्रोटीन व लो कॅलरी पदार्थ हवे असलेल्या ग्राहकांच्या अभिप्रायामुळे लो कॅलरी श्रेणी सुरू करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. लो कॅलरी श्रेणीमध्ये, आम्ही पदार्थ खाऊन मन भरेल असे परंतु पौष्टिक पर्याय उपलब्ध करून देतो: प्रोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त, ज्यामुळे समाधानकारक जेवण मिळते ज्यामुळे तुम्हाला जास्त काळ पोट भरल्यासारखे वाटते. या सुरुवातीमुळे आमचे युजर यावर्षीच्या शेवटी जास्त वेळ घालवण्यापूर्वी आणि जागरूक राहून निवडलेल्या पदार्थांवर लक्ष केंद्रित करू शकतील”

 

 

ग्राहक सध्या पोषण आणि निरोगीपणाला जास्त प्राधान्य देत असल्यामुळे आमची ही सुरुवात स्विगीच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या सुविधांना बळकट करण्याचा एक प्रयत्न आहे. जुलैमध्ये, स्विगीने हाय प्रोटीन श्रेणी लाँच केली आणि अलिकडेच विविध फिटनेस आणि पोषण उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी नवीन हाय प्रोटीन उपश्रेणींसह त्यात वाढ केली. हाय प्रोटीन श्रेणी आता 160+ शहरांमध्ये उपलब्ध आहे. युजर 1.4 लाख रेस्टॉरंट्सच्या नेटवर्कमध्ये 10 लाखांहून अधिक हाय प्रोटीन डिश पर्यायांमधून निवडू शकतात. अलीकडेच, स्विगीने नो अॅडेड शुगर श्रेणीची सुद्धा सुरुवात केली, ज्यामुळे आमच्या जागरूक निवडींची श्रेणी आणखी विस्तृत झाली. ग्राहक 2.5 लाखांहून अधिक खाद्यपदार्थ आणि नो अॅडेड शुगर श्रेणी अंतर्गत सूचीबद्ध 62,700 हून अधिक रेस्टॉरंट्समधून निवडू शकतात. आजपर्यंत, जवळजवळ 6.5 दशलक्ष वापरकर्त्यांनी हाय प्रोटीन किंवा नो अॅडेड शुगर ऑफर स्वीकारली आहे.

 

पोषण-केंद्रित श्रेणीचा विकास सुरू ठेवून, भारताला उत्सव साजरा करतांना, दैनंदिन दिनचर्या राखतांना किंवा नवीन आरोग्य प्रवास सुरू करतांना, अधिक संतुलित जीवनशैलीकडे वळवणे आणि वापरकर्त्यांना चांगले अन्नपदार्थ निवडण्यासाठी सक्षम करणे हे स्विगीचे उद्दिष्ट आहे. ग्राहकांच्या अपेक्षा वाढत असताना, हा प्लॅटफॉर्म मोठ्या प्रमाणात निवड, सुविधा आणि आरोग्यदायी पर्याय देण्यासाठी

वचनबद्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments