Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedकिर्लोस्कर समूहाच्या ‘मेड इन किर्लोस्कर’ उपक्रमातून अभियंते, अभियांत्रिकी आणि निर्मितीची जिद्द यांचा...

किर्लोस्कर समूहाच्या ‘मेड इन किर्लोस्कर’ उपक्रमातून अभियंते, अभियांत्रिकी आणि निर्मितीची जिद्द यांचा गौरव

या उपक्रमातून भारताच्या औद्योगिकीकरणाच्या प्रवासाचा गौरव; विविध महत्त्वाच्या क्षेत्रांतील अभियांत्रिकीवर आधारित नवकल्पनांप्रती किर्लोस्कर समूहाची असलेली बांधिलकी अधोरेखित;

 

 

· नव्या जाहिरातपटात समूहाच्या नवोन्मेषी परंपरेच्या पुनर्प्रत्ययातून अभियंते आणि अभियांत्रिकी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त;

 

 

· ‘मेड इन किर्लोस्कर’ ही एक व्यापक, बहुपदरी पुढाकार योजना असून, येत्या वर्षभरात विविध कार्यक्रमांच्या रूपाने ती राबवली जाणार आहे. उद्योगक्षेत्रातील भागीदार, हितधारक, सरकारी संस्था आणि पुण्याच्या समृद्ध उत्पादन परिसंस्था यामध्ये एकत्र येण्याची अपेक्षा

 

 

पुणे, ११ डिसेंबर २०२५ : भारतातील सर्वांत जुन्या आणि प्रतिष्ठित अभियांत्रिकी समूहांपैकी एक असलेल्या किर्लोस्कर समूहाने आज ‘मेड इन किर्लोस्कर’ हा एक नवीन उपक्रम जाहीर केला. अभियंते आणि अभियांत्रिकी या दोन्हींचा गौरव करण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आधुनिक जग घडविणाऱ्या नवनवीन अभियांत्रिकी शोधांचा आणि त्यामागील कर्तृत्ववान निर्मात्यांचा प्रवास दाखवणारा एक विशेष चित्रपटही या उपक्रमाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आला.

 

 

 

या चित्रपटातून जगभरातील अभियंत्यांचा गौरव करण्यात आला आहे. शतकानुशतके अभियांत्रिकीने केलेल्या विलक्षण कामगिरीचे दर्शन यात घडते आणि जागतिक विकासक्रमात अभियांत्रिकीची असलेली महत्वाची भूमिका अधोरेखित होते. या चित्रपटाचा मुख्य संदेश सरळ, स्पष्ट आणि ठळक आहे — अभियांत्रिकी अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रनिर्मितीची ती प्रेरक शक्ती आहे, प्रगतीची गती ती वाढवते आणि आपण बांधू इच्छितो त्या भविष्यातील जगाची भक्कम पायाभरणी ती करते.

 

 

 

आजवर हा विषय राष्ट्रीय चर्चेत ठळकपणे आला नव्हता; परंतु भारत जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून पुढे जात असताना, हा संवाद आता योग्य आणि निर्णायक टप्प्यावर सुरू होत आहे.

 

‘मेड इन किर्लोस्कर’ ही फक्त एक भावना नसून किर्लोस्कर समूहातील एक विस्तृत उपक्रम म्हणून ती राबवली जात आहे. येत्या वर्षभरात या अंतर्गत विविध कार्यक्रम सुरू केले जाणार आहेत. त्या अनुषंगाने उद्योगक्षेत्रातील सहकारी संस्थांबरोबर, शासनासोबत आणि पुण्यातील स्थानिक समुदाय परिसंस्थेबरोबर भागीदारी करण्यात येत आहे.

 

 

 

यातील चित्रपटाच्या प्रदर्शनासंबंधी बोलताना किर्लोस्कर ऑइल इंजिन्स लिमिटेड आणि किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष अतुल किर्लोस्कर म्हणाले, “विचार हे प्रत्यक्ष निर्मितीत उतरतात, तेव्हाच त्या विचारांना अर्थ प्राप्त होतो, यावर आमच्या संस्थापकांचा ठाम विश्वास होता. याच विचारधारेने गेली सुमारे १३५ वर्षे आमचे मार्गदर्शन केले, आमच्या यंत्रांची, आमच्या कल्पनांची आणि आमच्या वाढीची दिशा ठरवली. अभियंते हे या प्रवासाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत; ते कल्पनेचे रूपांतर वास्तवात करतात. ‘मेड इन किर्लोस्कर’ ही भावना आम्ही अभिमानाने पुढे नेत आहोत. उज्ज्वल भविष्य उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला तीच ऊर्जा देत राहणार आहे.”

 

 

 

किर्लोस्कर न्यूमॅटिक कंपनी लिमिटेड आणि किर्लोस्कर फेरस इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपन्यांचे अध्यक्ष राहुल किर्लोस्कर यांनीही याप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “किर्लोस्करमध्ये आम्ही नेहमीच स्वदेशी नवकल्पनांना प्राधान्य दिले आहे. देशाची गती वाढवणारी उच्च दर्जाची उत्पादने तयार करण्यावर आमचा भर राहिला आहे. उत्पादन हे आमच्या उद्योगाच्या केंद्रस्थानी असते आणि अभियंता हा आमच्या यशाचा मुख्य आधार असतो. आज दर वीस सेकंदाला किर्लोस्करचे एक उत्पादन विकले जाते. शेतकऱ्यांना, उद्योगांना, शहरांना आणि जगभरातील समुदायांना त्यांतून आम्ही साथ देतो. आताच्या या चित्रपटातून आम्ही प्रत्येक अभियंत्याला सॅल्यूट करीत आहोत. या अभियंत्यांनी, निर्मात्यांनी केवळ आमच्या कंपन्याच उभारल्या नाहीत, तर राष्ट्रनिर्मितीलाही बळ दिले आहे.”

 

 

 

किर्लोस्कर समूहाने १८८८ पासून भारताच्या प्रगतीला शक्ती दिली आहे. शेतांपासून ते कारखान्यांपर्यंत, शहरांपासून ते समुदायांपर्यंत प्रत्येक ठिकाणी हा समूह आपले अस्तित्व राखून आहे. भारतीय उद्योगक्रांतीतील अनेक ऐतिहासिक ‘पहिल्या गोष्टी’ घडवून आणण्याचे श्रेय या समूहाला जाते. लोखंडी नांगर, सेंट्रीफ्यूगल पंप, डिझेल इंजिन, लेथ मशीन, विद्युत मोटर, एअर कंप्रेसर्स अशा या समूहाच्या अनेक नवकल्पनांनी देशाच्या विकासाला नवे वळण दिले. निर्मितीची ही ‘किर्लोस्करी’ वृत्ती पुण्यात रुजली आणि तिने शहराचे एका सक्षम उत्पादनकेंद्रामध्ये रूपांतरित केले. आज पुणे जागतिक दर्जाच्या वाहन उद्योगांना, सहाय्यक उत्पादन क्षेत्रांना, औद्योगिक साधनांना आणि मोठ्या अभियांत्रिकी उद्योगांना आश्रय देणारे एक मोठे औद्योगिक केंद्र बनले आहे. या शहराची वाटचाल किर्लोस्कर समूहाच्या सातत्यपूर्ण प्रभावाची साक्ष देते. ‘मेक इन इंडिया’ शब्दप्रयोग जन्मालाही आला नव्हता, त्या काळी ही भावना प्रत्यक्षात येथे रुजलेली होती. आजही ती तितक्याच उत्साहाने पुढे जात आहे.

 

 

 

जगभरात अधिक मोठी उद्दिष्टे साध्य करण्याच्या दिशेने आपण पुढे जात असताना आणि परिवर्तनाच्या नव्या टप्प्यात प्रवेश करत असताना, ही अभियांत्रिकीची आणि ‘निर्मिती’ची भावना अधिकच महत्त्वाची ठरते. उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे उद्योगपद्धती झपाट्याने बदलत असताना, आमच्या कंपन्यांनी नेहमीच नवोन्मेष आणि अभियांत्रिकी कौशल्याला केंद्रस्थानी ठेवून नेतृत्व केले आहे आणि भविष्यासाठीच्या आमच्या संकल्पातून हीच भावना पुढे चालली आहे.

 

 

 

A person in a hard hat standing in a desert

 

AI-generated content may be incorrect.

 

ब्रॅंडचा जाहिरातपट : https://www.youtube.com/watch?v=VaUf2N2sNCU&feature=youtu.be

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments