Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedZEE5 च्या साली मोहब्बतच्या स्क्रीनिंगसाठी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित; करण जोहर, काजोल,...

ZEE5 च्या साली मोहब्बतच्या स्क्रीनिंगसाठी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित; करण जोहर, काजोल, फराह खान, भूमी पेडणेकर यांनी मनीष मल्होत्राच्या प्रॉडक्शनला भरभरून पाठिंबा दर्शविला आहे.

हाउ-डनइट रोमांचक कथा आता फक्त हिंदी ZEE5 वर स्ट्रीम केली जात आहे ~

ZEE5 ची घट्ट खिळवून ठेवणारी नवीन रोमांचक कथा साली मोहब्बत आता स्ट्रीम केली जात आहे आणि यापूर्वीच ती चर्चेचा विषय होती. टिस्का चोप्राने याचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात नाट्य, फसवणूक आणि गुंतवळ्यात सापडलेल्या नात्यांचा मिलाफ पहायला मिळत आहे. राधिका आपटे व दिव्येंदू यांच्या प्रभावी अभिनयाने त्यात रंगत भरली आहे.

रिलीजच्या आधी, ZEE5 ने मुंबईत एका-मागे-एक अशा खास स्क्रिनिंग्ज आयोजित केल्या असून इंडस्ट्री मधील काही दिग्ग्ज कलाकार त्यात सामील होते. या कार्यक्रमाला निर्माते – मनीष मल्होत्रा, त्यातील कलाकार- राधिका आपटे, दिव्येंदू, अंशुमान पुष्कर, सौरसेनी मैत्रा आणि दिग्दर्शनात पदार्पण करणाऱ्या टिस्का चोप्रा, हे सर्वजण उपस्थित होते. सोबतच करण जोहर, काजोल, भूमी पेडणेकर, फराह खान, उर्मिला मातोंडकर, नशरत भरुचा, रासिका दुग्गल, अभिषेक बॅनर्जी, वरुण शर्मा, हीना खान, करण टॅकर आणि इतर जबरदस्त कलाकार मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते.

स्क्रीनिंग्जना भरभरून प्रशंसा मिळाली आणि पाहुण्यांनी चित्रपटाची कुशाग्र कथा सांगण्याची शैली, बारकाईपूर्वक केलेले दिग्दर्शन आणि लक्षवेधक अभिनयाची स्तुती केली. या प्रचंड भावनिक रोमांचक कथेभोवती निर्माण होणारी उत्सुकता, या उद्योगाने दिलेल्या स्नेहपूर्ण प्रतिसादामुळे वाढलेली दिसून येते.

काजोलने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जाऊन चित्रपटाबद्दल आपली समीक्षा सर्वांना कळविली. तिने चित्रपटाचे कौतुक करत लिहिले की, “किती छान मजेदार गूढ रोमांचक कथा आहे ही! नक्कीच पाहिली पाहिजे. पूर्ण टीमचे आणि विशेषत: अतिशय उत्कृष्ट कामगिरीसाठी @radhikaofficial चे खूपखूप अभिनंदन.”

 

फराह खानने इंस्टाग्रामवर जाऊन लिहिले की, “मला @manishmalhotra05 या व्यक्तीचे आणि त्याच्या आगामी चित्रपट #saalimohabbat @ZEE5 चे खूप कौतुक वाटते.”

दिग्दर्शिका टिस्का चोप्रा या चित्रपटाला मस्ट वॉच बनवणाऱ्या कारणांविषयी बोलताना म्हणाल्या, “अधिकांश रोमांचक कथेचा भर बाह्यांगावर, शस्त्रावर आणि उद्देशावर असतो. पण माझी इच्छा होती की गुन्ह्याच्या पलीकडे असलेली भावनिक वादळे उघडकीस आणली पाहिजेत. हा चित्रपट भीती, गिल्ट आणि इच्छा यांच्यावर अवलंबून राहून निवड करणाऱ्या अशा प्रभावित, खोलवर दोषाने भरलेल्या लोकांच्या बाबतीत आहे. आम्ही प्रेम, निष्ठा आणि जीवित राहण्याची लढाई या गोष्टी एकमेकांना भिडणाऱ्या अशा गोंधळलेल्या गलथान जगाची रचना केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांच्या मनात, त्यांच्या मौन मध्ये आणि त्याच्या वादविवादात घर करून राहता आले, तर आम्ही आमचे काम साध्य केले आहे, असे आम्हाला वाटेल.”

बऱ्याच काळानंतर पडद्यावर परत येत असलेली अभिनेत्री राधिका आपटे सांगते, “आपण कोणत्याही इतर अपराधी रोमांचक कथेकडून (क्राईम थ्रिलरकडून) जलद हालचाली असणाऱ्या अ‍ॅक्शन फिल्मची अपेक्षा करतो. परंतु साली मोहब्बत अशा रोमांचक कथांसारखी (क्राईम थ्रिलर्स सारखी) नाही. यात हळूहळू प्रगती होत जाते आणि शांत, स्थिर आणि फारच वातावरण संबंधी चित्रपट आहे.” “व्हूडनइट” ऐवजी “हाउ-डनइट” असे त्याचे वर्णन करताना, ती पुढे म्हणाली, “यात पात्राचा आणि त्या पात्राच्या नात्यांचा शोध घेतला गेला आहे, आणि आपण जी लोकं ओळखतो असे आपल्याला वाटते, ती आपल्याला खरंच समजली आहेत का? या मुख्य प्रश्नाचा तपास यात केला गेला आहे. मला वाटले की ते खूप कोड्यात पाडणारे आहे, आणि एका वेगळ्या प्रकारची रोमांचक कथा आहे. म्हणूनच मी ती करण्याचा निर्णय घेतला. आपण हा चित्रपट नक्की पाहाल आणि त्याचा आनंद उचलाल, अशी आशा करते.”.

सुरुवातीच्या प्रतिक्रिया अतिशय उत्साही आहेत आणि जोर वेगाने वाढत जात आहे. अशा वेळेस प्रेक्षक आता हे घट्ट खिळवून ठेवणारे, भावनांनी भरलेले नाटक तल्लीन होऊन पाहू शकतात – आता हिंदी ZEE5 वर स्ट्रीम

होत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments