Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedअंदमान आणि निकोबार येथील विजयापुरम येथे "सागरा प्राण तळमळला" या गीताच्या ११६व्या...

अंदमान आणि निकोबार येथील विजयापुरम येथे “सागरा प्राण तळमळला” या गीताच्या ११६व्या वर्षपूर्तीनिमित्त भव्य ऐतिहासिक सोहळा

स्वातंत्र्यवीर सावरकर विनायक दामोदर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत अंदमान आणि निकोबार येथील बेवदानाबाद येथे लोकार्पण

माननीय मोहन भागवतजी आणि अमित शहाजी एकत्र आल्याने एक दुर्मिळ योग साधला

श्री विजयापुरम, अंदमान आणि निकोबार, भारत : १२ डिसेंबर २०२५: “सागरा प्राण तळमळला” या अमर्त्य अशा काव्यपंक्तींनी लाखो भारतीयांच्या हृदयात त्यावेळी राष्ट्रवादाची वात जागवली, या गोष्टीला म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी या ज्या पंक्ती समुद्राच्या लाटांच्या साक्षीने लिहिल्या त्या गोष्टीला आज ११६ वर्षे होऊन गेली आहेत.

या ऐतिहासिक अशा क्षणाच्या निमित्ताने मुंबई येथील व्हॅल्यूएबल ग्रुपचे संस्थापक श्री अमेय हेटे यांनी “सागरा प्राण तळमळला” या भव्य अशा सोहळ्याचे आयोजन १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी तीन वाजता अंदमान आणि निकोबार येथील श्री विजयापुरम येथे केले होते. या भव्य अशा सोहळ्यात सावरकरांच्या तेजस्वी आणि भव्य पुतळ्याचे अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते आणि केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

माननीय मोहन भागवत आणि माननीय अमित शहा हे हृद्य आणि सार्वजनिक अशा या सोहळ्यात एकत्र आल्याने एक दुर्मिळ योग साध्य झाला. एडमिरल (नि)देवेंद्र कुमार जोशी, माननीय लेफ्टनंट गव्हर्नर, श्री विजयापुरम आनंद अंदमान निकोबार आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ऍडव्होकेट आशिष शेलार हे यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी व्हॅल्यूएबल ग्रुपचे संस्थापक अमेय हेटे यांचीसुद्धा उपस्थिती होती.

हा पुतळा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रवादाचे, अजोड त्यागाचे आणि निडर विचारसरणीचे प्रतीक आहे. या पुतळ्याची रचना प्रख्यात शिल्पकार श्री राम सुतार यांची आहे. त्यांना नुकतेच महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

या अनोख्या अशा उपक्रमाबद्दल बोलताना व्हॅल्युएबल ग्रुपचे संस्थापक श्री अमेय हेतेहोते म्हणाले, ” हा सोहळा म्हणजे केवळ एक सांस्कृतिक सोहळा नसून ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला वाहिलेली एक मानवंदना आहे. हा भविष्यातील आपल्या पिढ्यांमध्ये राष्ट्रवाद आणि देशभक्ती जागृत करण्याचा एक प्रामाणिक छोटासा प्रयत्न आहे. आमच्यासाठी हा सोहळा गौरवापेक्षा स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याप्रति त्यांचा त्याग आणि देशाभक्ती यासाठी आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे

.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments