पुणे,12 डिसेंबर 2025 : कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीसाठी व्यासपीठ असलेल्या उद्दीपन तर्फे पुणे इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम) येथे दोन दिवसीय भव्य करिअर कॉन्क्लेव्ह चे आयोजन 11 व 12 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. रमणबाईट प्रा.लि. आणि एआयसीटीई च्या सहकार्याने आयोजित या उपक्रमात पुणे जिल्हा व महाराष्ट्रातून प्रतिभावान विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील कंपन्या एकाच व्यासपीठावर आल्या.
उद्दीपन हे एक राष्ट्रीय स्तरावरील कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती व्यासपीठ असून रमणबाईट प्रा.लि.ने हे विकसित केले आहे.याला एआयसीटीई चे समर्थन असून याचा उद्देश शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध उद्योगांमध्ये रोजगार व इंटर्नशिप्स मिळवून देणे हे आहे.
या भव्य करिअर कॉन्क्लेव्हमध्ये अभियांत्रिकी,वाणिज्य,विज्ञान,कला व व्यवस्थापन अशा विविध शाखेतील 2500 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला,तर अनेक मोठ्या कंपन्या लघु व मध्यम उद्योग,स्टार्टअप्स यांनी यात सहभाग नोंदवला.त्यामध्ये बँकींग व वित्तीय सेवा, फिनटेक,आयटी व आयटीईएस, रिअल इस्टेट, एडटेक, कन्सल्टींग, इंजिनिअरींग, मॅन्युफॅक्चरींग, ऑटोमोटिव्ह, रिटेल,ई-कॉमर्स,हॉस्पिटॅलिटी व प्रोफेशनल सर्व्हिसेस इत्यादी उद्योगांचा समावेश होता.
पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना सेल्स ॲन्ड मार्केटिंग,बिझनेस डेव्हलपमेंट,कस्टमर सपोर्ट,ऑपरेशन्स,ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी,डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी,डिझाईन इंजिनिअर्स,साईट इंजिनिअर्स,प्रॉडक्शन इंजिनिअर्स,क्वालिटी इंजिनिअर्स,अकाऊंटस एक्झिक्युटिव्ह,फायनान्स असोसिएटस अशा अनेक जॉबरोल्स साठी संधी मिळाली.नवीन संधींमध्ये ऑटोकॅड स्पेशालिस्ट,एस्टिमेशन इंजिनिअर,क्युसी केमिस्ट व एचव्हीएसी/टेक्निकल सर्व्हिसेस यांनी लक्ष वेधून घेतले.
या मेगा जॉब फेअरमध्ये बजाज हाऊसिंग फायनान्स,फ्लिपकार्ट,डब्ल्यूएनएस,पेटीएम,ॲक्सिस बँक,डी-मार्ट,सूझलॉन,टेलिपरफॉर्मन्स,एकलेर्क्स,बीव्हीजी इंडिया व अशा अनेक कंपन्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या मुलाखती घेतल्या.
पीआयबीएम चे अध्यक्ष रमणप्रीत म्हणाले की,आजच्या काळातील कंपन्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या क्षेत्रातील ज्ञान व क्षमतेसह उत्तम संवाद कौशल्य,विश्लेषणात्मक विचार क्षमता (ॲनालिटिकल थिंकींग) व डिजिटल कौशल्य बघत आहेत.हे असल्यास मोठ्या संख्येत असलेल्या उमेदवारांमध्ये कौशल्यवान विद्यार्थी वेगळे ठरू शकतात.म्हणूनच संरचित कौशल्य मॅट्रिक्स द्वारे पीआयबीएम आपल्या विद्यार्थ्यांना उद्योगासाठी तयार करण्यासाठी आवश्यक क्षमतांमध्ये प्रशिक्षण
देत आहे.


