Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedबेवारटोला प्रकल्पाची कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण करणार - ...

बेवारटोला प्रकल्पाची कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नागपूर , दि.१३:- गोंदिया जिल्ह्यातील बेवारटोला (ता. साकोली) लघु सिंचन प्रकल्पाची उर्वरित कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण केली जातील, असे जलसंपदा ( विदर्भ, तापी, कोकण पाटबंधारे विकास) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले.

 

सदस्य डॉ. परिणय फुके यांनी बेवारटोला (जि. गोंदिया ता. साकोली) धरण प्रकल्पांतर्गत कालव्याची कामे अपूर्ण अवस्थेत असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

 

जलसंपदा मंत्री महाजन यांनी या प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना सांगितले, या प्रकल्पाची प्रकल्पीय सिंचन क्षमता १३१० हेक्टर असून त्यापैकी ९९५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे उर्वरित ३१५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी डाव्या कालव्यावरील टोयागोंदी, चांदसूरज आणि कोपालगड कालव्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. ही कामे जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजित असल्याचेही त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments