Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedपोको सी८५ ५जी च्‍या फर्स्‍ट सेलला सुरूवात: आकर्षक दरामध्‍ये कार्यक्षमता, स्‍टाइल आणि...

पोको सी८५ ५जी च्‍या फर्स्‍ट सेलला सुरूवात: आकर्षक दरामध्‍ये कार्यक्षमता, स्‍टाइल आणि सर्वोत्तम बॅटरीचा अनुभव घ्‍या!

 

नवी दिल्‍ली, डिसेंबर १६, २०२५: पोको या भारतातील सर्वात विश्वसनीय ग्राहक तंत्रज्ञान ब्रँडने फक्‍त फ्लिपकार्टवर नवीन पोको सी८५ ५जी च्‍या फर्स्‍ट सेलला सुरूवात केली आहे. सर्वोत्तम बॅटरी अनुभवासाठी पोको सी८५ ५जी मध्‍ये ६००० एमएएच बॅटरी आहे, जी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहते. ३३ वॅट फास्‍ट चार्जिंगसह स्‍मार्टफोन फक्‍त २८ मिनिटांमध्‍ये ५० टक्‍के चार्ज होऊ शकतो, ज्‍यामधून तुम्‍ही सतत कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते. १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंग डिवाईसला पोर्टेबल पॉवर बँक बनवते, ज्‍यासह मोबाइल्‍स, टीडब्‍ल्‍यूएस इअरबड्स, स्‍मार्टवॉचेस् आणि इतर अॅक्‍सेसरीज चार्ज करता येऊ शकतात. हा पॉवर-पॅक स्‍मार्टफोन १२,००० रूपयांपेक्षा कमी किमतीच्‍या डिवाईसेस श्रेणीमध्‍ये नवीन मापदंड स्‍थापित करतो.

पोको सी८५ ५जी सह तुम्‍ही तुमच्‍या स्‍टाइलमध्‍ये सर्वांचे लक्ष वेधून घेऊ शकता. या स्‍मार्टफोनमध्‍ये स्‍लीक, आधुनिक डिझाइनसह क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी आणि प्रीमियम ड्युअल-टोन फिनिशिंग आहे. हा स्‍मार्टफोन मिस्टिक पर्पल, स्प्रिंग ग्रीन आणि पॉवर ब्‍लॅक या रंगांमध्‍ये उपलब्‍ध आहे. उच्‍च कार्यक्षम मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० चिपसेटची शक्‍ती असलेला हा डिवाईस गेमिंगपासून मल्‍टीटास्किंगपर्यंत प्रत्‍येक गोष्‍टीसाठी अत्‍यंत सुलभ, विनाव्‍यत्‍यय कार्यक्षमता देतो. तसेच, ५० मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा सेटअप महत्त्वपूर्ण क्षण सुस्‍पष्‍टपणे कॅप्‍चर होण्‍याची खात्री देते.

कॅलेंडरवर खूण करून ठेवा! फर्स्‍ट सेलला फ्लिपकार्टवर १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजता सुरूवात होत आहे.

अद्वितीय लाँच किमतीसह १६ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजल्‍यापासून फक्‍त फ्लिपकार्टवर पोको सी८५ च्‍या विक्रीला सुरूवात होईल. सुरूवातीची किंमत ४ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १०,९९९ रूपये*, ६ जीबी + १२८ जीबी व्‍हेरएिण्‍टसाठी ११,९९९ रूपये* आणि ८ जीबी + १२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १३,४९९ रूपये* आहे. लाँच ऑफरचा भाग म्‍हणून ग्राहक एचडीएफसी, आयसीआयसीआय किंवा एसबीआय बँक क्रेडिट व डेबिट कार्ड्सचा वापर करत १,००० रूपयांच्‍या त्‍वरित बँक सूटचा आनंद घेऊ शकतात किंवा पात्र डिवाईसेसवर १,००० रूपयांच्‍या एक्‍स्‍चेंज बोनसचा अवलंब करू शकतात. तसेच, क्रेडिट व डेबिट कार्ड्सवर ३ महिने नो-कॉस्‍ट ईएमआय उपलब्‍ध आहे. वरील ऑफर्स फक्‍त विक्रीच्‍या पहिल्‍या दिवशी लागू आहेत.

अटी व शर्ती लागू.*

फ्लिपकार्ट सेल लिंक: http://flipkart.com/

पोको सी८५ ५जी का खरेदी करावा?

सर्वोत्तम बॅटरी अनुभव, जेथे ६००० एमएएच बॅटरी दोन दिवसांहून अधिक कार्यरत राहते, तसेच ३३ वॅट फास्‍ट चार्जिंग आणि अत्‍यंत व्‍यावहारिक १० वॅट वायर्ड रिव्‍हर्स चार्जिंग वैशिष्‍ट्य आहे.

उत्तम फिलसाठी क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक, स्लिम ७.९९ मिमी जाडी, प्रीमियम ड्युअल-टोन फिनिश आणि विशिष्‍ट कॅमेरा डेको आहे, जे प्रभावीपणे दिसून येते.

सेगमेंटमधील सर्वात मोठ्या ६.९ इंच डिस्‍प्‍लेसोबत १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट अत्‍यंत सुलभ स्‍क्रॉलिंग, स्‍वाइपिंग, गेमिंग आणि मनोरंजनाचा आनंद देते.

मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० ची शक्‍ती असलेला हा डिवाईस ४५०के च्‍या अंतूतू स्‍कोअरसह उत्तम कार्यक्षमता देतो. हा डिवाईस अँड्रॉईड १५ आऊट ऑफ द बॉक्‍सवरील हायपरओएस २.२ वर संचालित आहे आणि सेगमेंटमधील सर्वोत्तम सॉफ्टवेअर कटिबद्धता – २ अँड्रॉईड अपग्रेड्स आणि ४ वर्ष सिक्‍य‍ुरिटी अपडेट्स देतो.

आधीच्‍या मॉडेलच्‍या तुलनेत पोको सी८५ ५जी अधिक शक्तिशाली बॅटरी, अपग्रेडेड मोठे व आकर्षक डिस्‍प्‍ले आणि प्रीमियम क्‍वॉड-कर्व्‍ह बॅक डिझाइनसह मोठी झेप आहे. हा स्‍मार्टफोन हातामध्‍ये सहजपणे मावतो.

पोको सी८५ ट्रेण्‍डी, पण कार्यक्षम डिवाईसेसचा शोध घेत असलेल्‍या तरूण, उत्‍साही वापरकर्त्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. ही संधी चुकवू नका! फर्स्‍ट सेल ऑफर्स फक्‍त फ्लिपकार्टवर आहेत, संपण्‍यापूर्वीच या संधीचा लाभ

घ्‍या!

###

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments