पुणे, १७ डिसेंबर २०२५ : भारतातील सर्वात मोठी ग्रामीण रिटेल साखळी असलेल्या स्टार लोकलमार्टने केलेल्या सर्वेक्षणातून ऑफलाइन शॉपिंग ग्रामीण ग्राहकांसाठी पसंतीचा पर्याय राहिला आहे असे दिसून आले आहे. कोल्हापूर, मुंबई, पुणे, कर्नाटक आणि दिल्ली या पाच शहरांमधील ५,००० ग्राहकांमध्ये केलेल्या या सर्वेक्षणात असे आढळून आले की ६७% ग्राहक आपल्या स्थानिक रिटेल सुपरमार्केटमधून खरेदी करण्यास प्राधान्य देतात, तर फक्त ३५% ग्राहक केवळ ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर अवलंबून असतात. सुपरमार्केट हे रिटेल केंद्र असण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सामाजिक जीवनाचे आधार स्तंभ आहेत.
भारताचे ई-कॉमर्स क्षेत्र अभूतपूर्व गतीने वाढत असून, एका अभ्यासानुसार २०३० पर्यंत ई-कॉमर्स बाजारपेठ सुमारे ३४५ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल, तर २०३५ पर्यंत ५५० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. ही मजबूत वाढ वेगवान डिजिटायझेशन, स्मार्टफोनचा वाढता वापर आणि भारतीय ग्राहकांच्या बदलत्या खरेदी सवयींमुळे घडून येत आहे. मात्र, ऑनलाईन रिटेल वेगाने विस्तारत असतानाही, अंदाजानुसार २०२४ मध्ये मॉलमधील व्हेकन्सी प्रमाण घटून ८.१% वर आले. हा कल रिटेल क्षेत्रात प्रत्यक्ष स्टोअर्सचे महत्त्व अधोरेखित करतो, कारण असे स्टोअर्स खरेदीचा अनोखे अनुभव देतात.


