Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedइकोआईस कंपनीतर्फे हवामान व प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी रॅपर्स व कॉमेडीयंसची स्पर्धा आयोजित

इकोआईस कंपनीतर्फे हवामान व प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी रॅपर्स व कॉमेडीयंसची स्पर्धा आयोजित

 

पुणे — इकोआईस कंपनीतर्फे हवामान व प्रदूषणाबद्दल जनजागृती करण्यासाठी रॅपर्स व कॉमेडीयंसची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत 100 हुन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.

स्पर्धेतील विजेत्या रॅपर्सना 1 लाख 75 हजार रुपयांची रोख व कॉमेडीयंसना 15 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

ही माहिती इकोआईस कंपनीचे अध्यक्ष व संचालक डॉ करणं चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत माहिती सांगितली.

इकोआईस कंपनीतर्फे गेल्या 8 वर्षांपासून भारत व कॅनडात प्रदूषण, व पर्यावरणविषयक संशोधन व जनजागृतीचे काम केले जात आहे. आत्ता पर्यंत भारत व कॅनडात 21 प्रोजेक्ट कंपनीतर्फे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले आहेत. कंपनी तर्फे कॅनडात हवेपासून सी ओ 2(कार्बन डाय ऑकसाईड) प्रकल्पाचे उत्पादन सुरु करण्यात आले आहे. कंपनीतर्फे भारतातही गेल्या वर्षांपासून प्रदूषणमुक्त पुणे, महाराष्ट्र व भारतात कार्य करण्यास सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी डिसेंबर 2024 मध्ये क्लायमेंट हॅकेथान स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 200 तज्ज्ञ व स्वयंसेवकांनी सहभाग घेऊन चांगला प्रतिसाद दिला होता. यंदाही पुणे व टोरांतो येथे बायो पॉलिसि अंतर्गत क्लायमेट हॅकेथान इव्हेंट्स आयोजित करण्यात आले होते.

यंदा पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या प्रदूषण विषयक स्पर्धेसाठी रॅपर्स व कॉमेडीयसचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा डॉ करण चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

संस्थेतर्फे या स्पर्धेच्या काळात मुळा व मुठा नद्याच्या पाण्याचे प्रदूषण खास यंत्रणामार्फत तपासले जाणार आहे. या नद्यामध्ये होणाऱ्या जलप्रदूष्णाची तपासणी करून त्याचा अहवाल तयार केला जाणार आहे. त्याचबरोबर या अ हवालात या नद्यामधील जलप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करता येईल याची माहिती दिली जाणार आहे. हा अहवाल पुणे महापालिका व महाराष्ट्र शासनास सादर केला जाणार आहे. त्या चबरोबर पाठपुरावाही केला जाणार आहे. त्यानंतर महाराष्ट्रातील अन्य नद्याचीही प्रदूषण चाचणी करून त्याचाही अहवाल तयार करून महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे.

यावर्षी संस्थेतर्फे नद्याचे, हवा व ध्वनी प्रदूषणविषयक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत रॅपर्स व कॉमेडीयसनी नद्या, हवा आणि ध्वनी प्रदूषणविषयक सादरीकरण करावे. तसेच प्रदूषण कमी कसे होईल यासाठी

कोणत्या उपाययोजना करता येईल हे स्पर्धकांनी सादर करावेत.अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक विजेत्या रॅपर्सला 1 लाख रुपयांचे रोख रक्कमेचे पारितोषिक प्रदान केले जाणार आहे. कॉमेडीयन्ससाठी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत 15 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे.

कंपनीतर्फे जलशुद्धी आणि त्र्यंबकम ही उत्पादन निर्माण केली जात आहे. या दोन्ही उत्पादनाचा वापर भारतातील नद्यामध्ये करून प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच नद्यामध्ये माशांचे उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल तसेच मत्स्यशेती करण्यासाठी नद्याचे प्रदूषण मुक्त पाणी वापरता येईल असा दावा डॉ चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना केला. त्याविषयीचे प्रात्यक्षिक मुळा मुठा नद्याच्या पात्रातील पाण्यात केले जाणार आहे.

डॉ करण चव्हाण हे मूळचे पुण्याचे रहिवासी आहेत. ते कॅनडात कंपनीतर्फे प्रदूषण पर्यावरणविषयी जनजागृतीचे कार्य करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments