Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedमैनावी कॉर्पोरेशन, जपान आणि ब्लूम व्हेंचर्स यांच्या नेतृत्वाखालील विरोहण’ची 65 कोटी ($7.5...

मैनावी कॉर्पोरेशन, जपान आणि ब्लूम व्हेंचर्स यांच्या नेतृत्वाखालील विरोहण’ची 65 कोटी ($7.5 M) चालू सिरीज बी’च्या साह्याने सुलभ, प्रभावी आरोग्यसेवा शिक्षणाच्या दिशेने एक मोठी झेप

नवी दिल्ली, 19 डिसेंबर, 2025: विरोहण हा आरोग्यसेवा शिक्षणातील भारताचा अग्रगण्य मातब्बर असून मैनावी कॉर्पोरेशन यांच्या नेतृत्वाखालील चालू सिरीज बी’च्या निधी फेरीचा भाग म्हणून रु. 65 कोटी ($7.5 मिलियन) उभे केले. या फेरीमध्ये ब्लूम व्हेंचर्स, भारत इन्क्लुसिव्ह टेक्नॉलॉजीज सीड फंड आणि रिब्राइट पार्टनर्ससह विरोहणच्या विद्यमान गुंतवणुकदारांचाही सहभाग दिसून आला.

 

या निधीमुळे उत्पादन नवोन्मेष, कामकाज क्षमता आणि धोरणात्मक प्रतिभा विस्तार याद्वारे विरोहणच्या नफ्याला चालना मिळेल.

 

यूपीईएस (डेहरादून), बीबीडी युनिव्हर्सिटी (लखनऊ), सीएमआर युनिव्हर्सिटी (बंगळुरू), आसाम डॉन बॉस्को युनिव्हर्सिटी (गुवाहाटी) MIT युनिव्हर्सिटी (शिलाँग) जी.एच. रायसोनी युनिव्हर्सिटी (नागपूर आणि पुणे) सिल्व्हर ओक युनिव्हर्सिटी (अहमदाबाद) आणि इतर अनेक काही संलग्न आरोग्यसेवा, नर्सिंग आणि आरोग्यसेवा व्यवस्थापनात श्रेणीतील सर्वोत्तम पदवी अभ्यासक्रम उपलब्ध करून देसाठी. उद्योगाच्या बाजूने, ते लेन्सकार्ट, मेदांता, हेल्थियन्स, डॉ. लाल पॅथलॅब्स आणि इतर अनेकांसह उच्च आरोग्य सेवा संस्थांसह काम करते. त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी एक मजबूत शिक्षण-ते-रोजगार मार्ग तयार करते.

 

सन 2018 मध्ये स्थापना झाल्यापासून, विरोहण’च्या मॉडेलने मजबूत परिणाम दिले आहेत- उद्योग भागीदार म्हणून 20 हून अधिक उच्च शिक्षण संस्थांशी भागीदारी करणे,जवळपास 13,000 हून अधिक महत्वाकांक्षी आरोग्यसेवा व्यावसायिक तयार करणे तसेच पदवीधर पहिल्या दिवसापासून करिअरसाठी तयार असल्याची सुनिश्चितता करण्यासाठी 2,000 हून अधिक आरोग्यसेवा क्षेत्रातील नियोक्ते (मालक) सहकार्य करणे.

 

या घोषणेवर बोलताना विरोहण’चे सीईओ कुणाल दूडेजा म्हणाले:

 

“आरोग्य सेवा प्रणाली कुशल व्यावसायिकांच्या बळावर चालते, तरीही शिक्षण आणि रोजगार यांच्यात असलेल्या दरीमुळे लाखो नियुक्त्या अपूर्ण राहतात. उच्च शिक्षण संस्थांसाठी उद्योग भागीदार म्हणून ही तफावत मोठ्या प्रमाणात कमी करणे हे विरोहण’मध्ये आमचे ध्येय आहे. नवीन तसेच परतणाऱ्या गुंतवणुकदारांच्या या पाठिंब्यामुळे आम्हाला तंत्रज्ञान दुप्पट करता येते, आमच्या भागीदारीचा विस्तार करता येतो आणि विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी खुल्या करता येतात. सन 2030 पर्यंत, आम्ही दहा लाख विद्यार्थ्यांना प्रभावित करण्याचे आणि भारत आणि परदेशातील संलग्न आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांचा कणा बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.”

 

मैनावी इंडिया’चे मॅनेजिंग डायरेक्टर हिडेकाझू इतो पुढे म्हणालेः

 

“भारत आणि जगभरात कुशल आरोग्यसेवा व्यावसायिकांची मागणी अभूतपूर्व गतीने वाढत आहे; त्याचप्रमाणे तंत्रज्ञान, उद्योग-संरेखित शिक्षण आणि मजबूत संस्थात्मक भागीदारी एकत्र आणणाऱ्या विरोहण’च्या मॉडेलमध्ये आरोग्यसेवा शिक्षण मोठ्या प्रमाणात कसे दिले जाते याची व्याख्या नव्याने करण्याची क्षमता आहे.

 

जपानी बाजारपेठेतील आमच्या मनुष्यबळ व्यवसायाच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट आणि करियरमधील संक्रमणांना पाठिंबा देत, आम्ही मैनावीमध्ये उद्देश-आधारित संस्कृतीसह वाढलो आहोत. भारतीय संदर्भात, आम्ही मनुष्यबळ आणि शिक्षण क्षेत्रातील गंभीर आव्हानांचा सामना करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.

आमचा ठाम विश्वास आहे की विरोहण’च्या शाश्वत वाढीमुळे अर्थपूर्ण सामाजिक परिणाम निर्माण होतील आणि या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यात मदत होईल.”

 

हा मापदंड गाठत, ‘विरोहण’ भारतातील आरोग्यसेवा शिक्षण आणि मनुष्यबळ विकासाच्या पुढील दशकाला आकार देण्यासाठी सज्ज आहे- अभ्यासाचे वर्ग आणि कारकीर्द यांच्यात एक मजबूत मार्ग

तयार करत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments