पुणे, 20 डिसेंबर: द एम्पॉवर हर फाउंडेशन च्या लाभार्थी मुलींचा व त्यांच्या कुटुंबीयांचा सर्वांगीण विकास साधणे व विविध विषयांबाबत त्यांना अधिक व्यापक दृष्टिकोन मिळवून देण्याच्या मुख्य उद्देशाने संस्थेतर्फे पर्यावरणाचे महत्त्व, शाश्वत विकासाची गरज विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
हे व्याख्यान २१ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता, डेक्कन जिमखाना क्लब हाऊस येथे होणार आहे. हे व्याख्यान संस्थेच्या लाभार्थी मुलींसाठी दर तिमाही आयोजित केल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांच्या मालिकेचा एक भाग आहे. अशी माहिती द एम्पॉवर हर फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष व भाषातज्ञ संदीप नूलकर यांनी दिली.
रविवारी होणाऱ्या व्याख्यानासाठी प्रसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गुरुदास नूलकर हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच संस्थेचे अन्य पदाधिकारी उपस्थित राहतील.
पर्यावरणतज्ज्ञ डॉ. गुरुदास नूलकर हे आपल्या व्याख्यानातून पर्यावरणाचे महत्त्व, शाश्वत विकासाची गरज आणि प्रत्येक व्यक्तीला आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरण संवर्धनासाठी कोणत्या प्रकारे योगदान देता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन करतील.
हे व्याख्यान विशेषता संस्थेच्या लाभार्थी मुली व त्यांच्या कुटुंबीयांना केंद्रस्थानी ठेवून आयोजित केले आहे. त्यांच्यामध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण करणे व जबाबदार जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरणा देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.


