महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील अनुसूची ड प्रकरण १ (निवडणूक नियम) मधील नियम क्रमांक ८ अन्वये क्रमांक रानिआ/मनपा-२०२५/प्र.क्र.८०/का-५, दि. १५/१२/२०२५ अन्वये पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ चा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नामनिर्देशनपत्र देण्याची प्रक्रिया दि. २३/१२/२०२५ (मंगळवार) पासुन सुरु होत आहे.
त्यानुसार नामनिर्देशन प्रक्रिया सुलभ होणेकामी तसेच निवडणूक प्रक्रियेची माहिती देणेकामी मा. निवडणूक निर्णय अधिकारी, *प्रभाग क्र. २१. २३, २४ व २७ यांनी दि. २२/१२/२०२५ (सोमवार) रोजी दु. ४.०० वा. बैठक* आयोजित केली असुन *प्रभाग क्र. २१, २३, २४ व २७* मध्ये इच्छुक असणारे सर्व राजकिय पक्षाचे उमेदवार अथवा अधिकृत प्रतिनिधी तसेच इच्छुक अपक्ष उमेदवार किंवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, ‘ग क्षेत्रीय कार्यालय, थेरगांव ४११०३३ येथे उपस्थित रहावे.असे श्रीमती सुप्रिया डांगे
*निवडणुक निर्णय अधिकारी*
प्रभाग क्र. २१. २३, २४ व २७* पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी कळविले आहे.


