Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedएचडीएफसी स्कायने एचडीएफसी गोल्ड ईटीएफच्या समावेशासह केला एमटीएफ युनिव्हर्सचा विस्तार

एचडीएफसी स्कायने एचडीएफसी गोल्ड ईटीएफच्या समावेशासह केला एमटीएफ युनिव्हर्सचा विस्तार

मुंबई, 22 डिसेंबर 2025: एचडीएफसी गोल्ड ईटीएफ आता त्यांच्या ऑल-इन-वन गुंतवणूक प्लॅटफॉर्म एचडीएफसी स्कायवर मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी (एमटीएफ) साठी पात्र झाले असल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने आज जाहीर केले. या सुधारणेमुळे पात्र गुंतवणूकदारांना सोने या मालमत्ता वर्गात लीव्हरेज्ड एक्स्पोजर घेता येणार असून, विद्यमान जोखीम व बाजारस्थितींच्या अधीन राहून एमटीएफद्वारे गुंतवणुकीच्या रकमेपैकी 70% पर्यंत निधी उपलब्ध होणार आहे.

 

 

 

या समावेशामुळे एचडीएफसी स्कायचे वापरकर्ते मोबाईल अ‍ॅप तसेच वेबवर एचडीएफसी गोल्ड ईटीएफचे युनिट्स खरेदी करू शकतात, तसेच एमटीएफ अंतर्गत 70% पर्यंत निधीचा लाभ घेऊ शकतात आणि लागू एमटीएफ दरानुसार व्याज भरू शकतात (सध्या निधी दिलेल्या रकमेवर दरमहा 1% आहे). मानक एमटीएफ जोखीम नियंत्रण उपाय लागू राहतील. त्यामुळे गुंतवणूकदारांना अनुमती असलेल्या होल्डिंग कालावधीत लीव्हरेज्ड पोझिशन्सचे सुज्ञ व्यवस्थापन करता येईल.

 

 

 

एचडीएफसी गोल्ड ईटीएफ हा एक एक्स्चेंज-ट्रेडेड फंड असून तो सोन्याच्या कामगिरीशी संलग्न परतावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. प्रत्यक्ष साठवणुकीच्या अडचणींशिवाय सोने या मौल्यवान धातूमध्ये सहभागी होण्यासाठी हा एक सोयीस्कर, कमी खर्चाचा आणि डिमॅट-आधारित मार्ग सादर करतो. तसेच, हा ईटीएफ पोर्टफोलिओ विविधीकरणाचे फायदे आणि बाजारातील अस्थिरता व चलन-संबंधित जोखमींविरुद्ध संभाव्य संरक्षण देतो.

 

 

 

एमटीएफ अंतर्गत एचडीएफसी गोल्ड ईटीएफ सक्षम करून एचडीएफसी सिक्युरिटीज एचडीएफसी स्कायवर लीव्हरेज वापरून खरेदी करता येणाऱ्या ईटीएफ युनिव्हर्सचा विस्तार करत आहे. यामध्ये त्यांच्या बीएसपीएल (बाय स्टॉक्स पे लेटर) चौकटीअंतर्गत आधीच उपलब्ध असलेल्या विविध इंडेक्स, सेक्टोरल आणि थीमॅटिक ईटीएफचा समावेश आहे. गुंतवणूकदार एचडीएफसी स्कायच्या सुलभ व सहज वापरता येणाऱ्या इंटरफेसद्वारे त्यांच्या एमटीएफ पोझिशन्सचे निरीक्षण, टॉप-अप किंवा स्क्वेअर ऑफ सहजपणे करू शकतात. हा इंटरफेस प्रगत ट्रेडिंग साधने मोठ्या प्रमाणावर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी सुलभ करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.

 

 

 

या सादरीकरणाबाबत प्रतिक्रिया देताना एचडीएफसी सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. धीरज रेली म्हणाले, “सोने हे भारतीय गुंतवणूकदारांसाठी अस्थिर बाजारात वैविध्यता आणणारे एक महत्त्वाचे साधन आणि मूल्य साठवणूक म्हणून महत्वपूर्ण राहिले आहे. एचडीएफसी स्कायवर मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी अंतर्गत एचडीएफसी गोल्ड ईटीएफ उपलब्ध करून, आम्ही आमच्या ग्राहकांना पारदर्शक, डिजिटल आणि किफायतशीर पद्धतीने सोन्यात मोजके, लीव्हरेज्ड एक्स्पोजर घेण्याची लवचिकता देत आहोत. तसेच आमच्या एमटीएफ चौकटीमध्ये अंतर्भूत असलेल्या जोखीम व्यवस्थापन संरक्षक उपायांचा लाभ देत आहोत. तंत्रज्ञान आणि उत्पादन नाविन्यपूर्णतेचा वापर करून गुंतवणूकदारांना अधिक स्मार्ट आणि अधिक लवचिक पोर्टफोलिओ तयार करण्यात मदत करण्याच्या आमच्या व्यापक दृष्टीकोनातील हे आणखी एक पाऊल आहे.”

 

 

 

एचडीएफसी गोल्ड ईटीएफच्या जोडीला एसबीआय, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल, टाटा, कोटक, अ‍ॅक्सिस, मिराए अ‍ॅसेट, झेरोधा, यूटीआय आणि ग्रोव यांसह इतर अनेक गोल्ड ईटीएफ योजनाही एचडीएफसी स्कायवर एमटीएफसाठी उपलब्ध आहेत. पात्रता आणि टक्केवारी जोखीम व बाजारस्थितीनुसार बदलू शकत असल्यामुळे यामध्ये निधी पातळी सामान्यतः 60–70% पर्यंत असते. हा विस्तारित गोल्ड ईटीएफ संच गुंतवणूकदारांना वैविध्यपूर्ण साधने आणि सुज्ञ लीव्हरेजच्या संयोजनातून सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी अनेक पर्याय पुरवितो.

 

 

 

मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटीचा लाभ घेण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी त्यांची जोखीम स्वीकारण्याची क्षमता काळजीपूर्वक तपासावी, एमटीएफ-संबंधित व्याज खर्च व अटी समजून घ्याव्यात आणि सर्व संबंधित दस्तऐवज वाचावेत असा सल्ला देण्यात येत आहे. लीव्हरेज्ड गुंतवणूक नफा आणि तोटा दोन्ही वाढवू शकते आणि ती शिस्तबद्ध, दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा भाग म्हणूनच वापरणे योग्य ठरते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments