अहमदाबाद/सेऊल, डिसेंबर २३, २०२५ – ह्युंडाई मोटर कंपनीने आज इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल (आयसीसी) सोबत जागतिक सहयोगाची घोषणा केली, जेथे २०२६ ते २०२७ पर्यंत आयसीसीच्या प्रतिष्ठित टूर्नामेंट्ससाठी प्रीमियर पार्टनर बनली आहे.
प्रीमियर पार्टनर म्हणून ह्युंडाई मोटरला आयसीसीच्या आगामी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धांचे विशेष अधिकार व संधी मिळाली आहे, ज्यामध्ये मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप २०२७ चा देखील समावेश आहे. तसेच या अधिकारांतर्गत कंपनीला सामन्यामधील महत्त्वपूर्ण क्षण जसे नाणेफेकमध्ये सहभाग घेता येईल, स्टेडियममध्ये प्रमुख ब्रँडिंग मिळवता येईल आणि चाहत्यांना उत्साहवर्धक अनुभव देता येईल.
या सहयोगामधून क्रीडाप्रती समान आवडीच्या माध्यमातून जगभरातील विविध प्रेक्षकांसोबत दृढ नाते निर्माण करण्याप्रती ह्युंडाई मोटरची कटिबद्धता दिसून येते. हा सहयोग भारतासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये ब्रँडची उपस्थिती अधिक दृढ देखील करतो, जेथे क्रिकेटला महत्वपूर्ण स्थान आहे.
ह्युंडाई मोटर कंपनीचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी जोस मुनोज म्हणाले, ”क्रिकेट व ह्युंडाईची सुधारणा घडवून आणण्याप्रती, तसेच प्रत्येक आव्हानावर मात करण्याप्रती समान कटिबद्धता आहे. आम्हाला आयसीसीसोबत सहयोग करण्याबद्दल सन्माननीय वाटत आहे, ज्यासह जगभरातील दोन बिलियनहून अधिक निस्सीम क्रिकेटप्रेमींसोबत कनेक्ट होण्याची संधी मिळाली आहे. क्रिकेटला सर्वाधिक महत्त्व दिल्या जाणाऱ्या भारतासारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये हा सहयोग ग्राहक व समुदायांसोबत आमचे संबंध अधिक प्रबळ करतो, ज्यामधून आम्हाला करणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रेरणा मिळते. आम्ही या प्रख्यात टूर्नामेंट्समध्ये सहयोगाने संस्मरणीय अनुभव निर्माण करण्यास उत्सुक आहोत.”
आयसीसीचे अध्यक्ष श्री. जय शाह म्हणाले, ”क्रिकेट जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे, जेथे विशेषत: आयसीसीच्या मार्की इव्हेण्ट्सदरम्यान दोन बिलियनहून अधिक क्रिकेटप्रेमींची अत्यंत आवड दिसून येते. हे जागतिक इव्हेण्ट्स नाविन्यपूर्ण डिजिटल व स्टेडियममधील उत्साहवर्धक सुविधांच्या माध्यमातून क्रिकेटप्रेमींशी संलग्न होण्याची उत्तम संधी देतात. आम्ही प्रीमियर पार्टनर म्हणून ह्युंडाईचे स्वागत करतो, तसेच सहयोगाने उल्लेखनीय इव्हेण्ट्सचा आनंद देण्यास उत्सुक आहोत. ह्युंडाई जागतिक ब्रँड आहे, ज्याने दीर्घकाळापासून क्रीडाला पाठिंबा दिला आहे आणि आम्ही या इव्हेण्ट्समध्ये आमच्या एकत्रित क्षमता प्रबळ करण्यास उत्सुक आहोत.”
हा सहयोगाला महत्त्वपूर्ण बनवणारी बाब कोणती?
हा सहयोग क्रिकेट जगतात ह्युंडाईच्या स्थानाला अधिक दृढ करतो, जेथे २०११ ते २०१५ पर्यंत आयसीसीसोबत सुरूवातीच्या सहयोगानंतर कंपनी पुन्हा एकदा क्रीडा क्षेत्रात पुनरागमन करत आहे.
आयसीसी सामने पाहण्यासाठी उपस्थित असणाऱ्या क्रिकेटप्रेमींना परस्परसंवादात्मक फॅन झोन्स, वेईकल प्रदर्शन आणि डिजिटल फॅन एंगेजमेंट उपक्रमांच्या माध्यमातून ह्युंडाई मोटरच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल, ज्यासह समर्थकांना अधिक उत्साहपूर्ण आनंद मिळेल.
या करारामध्ये विविध प्रतिष्ठित आयसीसी टूर्नामेंट्सचा समावेश आहे, ज्यामध्ये क्रिकेट खेळणाऱ्या देशांचे संघ सहभाग घेतात.
ह्युंडाई मोटर आपल्या जागतिक क्रीडा धोरणाचा भाग म्हणून क्रिकेटवर का लक्ष केंद्रित करत आहे?
ह्युंडाई मोटरचा आयसीसीसोबत सहयोग त्यांच्या व्यापक क्रीडा सहयोग धोरणाशी संलग्न आहे, जेथे प्रत्येक प्रांतामधील सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण खेळांशी संलग्न होण्याला प्राधान्य दिले जाते. जगभरातून दोन बिलियनहून अधिक क्रिकेटप्रेमी उपस्थित असण्याच्या अपेक्षेसह क्रिकेटने ब्रँडला व्यापक, निस्सीम प्रेक्षकांसोबत कनेक्ट होण्याची अद्वितीय संधी दिली आहे.
भारतातील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये समारोहादरम्यान या सहयोगाची घोषणा करण्यात आली, जेथे ह्युंडाई मोटर व आयसीसीचे प्रतिनिधी उपस्थित होते.
ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी (नियुक्त) श्री. तरूण गर्ग म्हणाले,
“या सहयोगामधून ह्युंडाईची भारताप्रती प्रबळ कटिबद्धता आणि ह्युंडाईच्या जागतिक कार्यसंचालनांमध्ये भारताचे वाढते महत्त्व दिसून येते. आम्ही काही रोमहर्षक क्रिकेट सामन्यांसाठी उत्सुक आहोत, तसेच देशभरात ही संधी अधिक वाढवण्यासाठी पीआर, डिजिटल, अनुभवात्मक व डिलरशिप्समध्ये सर्वांगीण कम्युनिकेशन दृष्टिकोनासह
सुसज्ज आहोत.”


