Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedकल्याण ज्वेलर्सची महाराष्ट्रात नवी झळाळी! २६ डिसेंबरला नवीन शोरूमच्या उदघाटनाचा दिमाखदार सोहळा...

कल्याण ज्वेलर्सची महाराष्ट्रात नवी झळाळी! २६ डिसेंबरला नवीन शोरूमच्या उदघाटनाचा दिमाखदार सोहळा सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे च्या उपस्थितीत पार पडणार

बाणेर, २६ डिसेंबर, २०२५: भारतातील सर्वात विश्वसनीय आणि आघाडीच्या ज्वेलरी ब्रँड्सपैकी एक, कल्याण ज्वेलर्सने पुण्यातील बाणेर मेन रोडवर गणराज चौक येथे नवीन शोरूम सुरु करत असल्याची घोषणा केली आहे. शुक्रवार, २६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता प्रख्यात अभिनेत्री आणि सौंदर्यवती सोनाली बेंद्रे यांच्या हस्ते शोरुमचे उदघाटन केले जाईल. पश्चिम भारतातील सर्व महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये कल्याण ज्वेलर्सने आपले पाय रोवले आहेत, महाराष्ट्रामध्ये हे त्यांचे ३०वे शोरूम आहे. नवनवीन डिझाइन्स आणि जागतिक दर्जाची सेवा; पुणेकरांच्या दागिन्यांच्या खरेदीला एक नवी उंची लाभेल.

 

नवीन शोरूमच्या उदघाटनाबद्दल बोलताना कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरामन म्हणाले, “एक कंपनी म्हणून, ग्राहकांच्या खरेदीच्या अनुभवातील प्रत्येक पैलू अधिक समृद्ध करणारी एक सर्वसमावेशक इकोसिस्टिम निर्माण करण्याच्या दिशेने आम्ही मोठी प्रगती केली आहे. महाराष्ट्र ही आमच्यासाठी सर्वात महत्त्वाची बाजारपेठ राहिली असून, गेल्या काही वर्षांत आम्ही येथे धोरणात्मकरीत्या विस्तार केला आहे. बाणेर येथील नवीन शोरूम या प्रदेशाप्रती असलेली आमची वचनबद्धता अधिक दृढ करेल आणि आमच्या ग्राहकांसाठी अधिक सुविधा, सुलभता आणि मूल्य प्रदान करेल, असा आम्हाला विश्वास आहे.”

 

या नवीन शोरूमच्या शुभारंभाचे औचित्य साधून, कल्याण ज्वेलर्सने स्टोअरमध्ये खास ऑफर्सची घोषणा केली आहे. यामध्ये निवडक दागिन्यांच्या मजुरीवर (Value Addition) १५०० रुपयांपर्यंत सवलत देण्यात येत आहे. सोबतच ग्राहकांना ‘कल्याण स्पेशल गोल्ड बोर्ड रेट’चा लाभ घेता येईल—जो बाजारपेठेतील सर्वात कमी दर असून सर्व शोरूम्समध्ये एकसमान आहे. लाँचच्या निमित्ताने मिळणारे हे फायदे मर्यादित काळासाठीच उपलब्ध आहेत.

 

कल्याण ज्वेलर्समधील प्रत्येक दागिना हा ‘बीआयएस’ (BIS) हॉलमार्क असलेला असून त्यावर शुद्धतेच्या विविध चाचण्या केल्या जातात. याव्यतिरिक्त, ग्राहकांना ब्रँडचे सिग्नेचर ‘४-स्तरीय आश्वासन प्रमाणपत्र’ (4-Level Assurance Certificate) मिळते, जे सोन्याची शुद्धता, दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल (Free lifetime maintenance), उत्पादनाची सविस्तर माहिती आणि पारदर्शक एक्सचेंज व बाय-बॅक धोरणांची हमी देते.

 

हे आश्वासन आपल्या मौल्यवान ग्राहकांना सर्वोत्तम गुणवत्ता आणि विश्वास प्रदान करण्याप्रती असलेल्या कल्याण ज्वेलर्सच्या अढळ बांधिलकीवर भर देते. या शोरूममध्ये कल्याणचे लोकप्रिय ‘हाऊस ब्रँड्स’ देखील उपलब्ध असतील, ज्यात मुहूर्त (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकला केलेले अँटिक दागिने), निमा (मंदिर शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअरसारखे हिऱ्यांचे दागिने), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी हिरे), अंतरा (लग्नासाठीचे हिऱ्यांचे दागिने), हेरा (अगदी रोज वापरता येतील असे हिऱ्यांचे दागिने), रंग (मौल्यवान खड्यांचे दागिने) आणि अलीकडेच लाँच केलेले लीला (रंगीत खडे आणि हिऱ्यांचे दागिने) या कलेक्शन्सचा समावेश असेल.

 

ब्रँड, त्यांची कलेक्शन्स आणि ऑफर्सविषयी अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा – https://www.kalyanjewellers.net/

 

अटी व शर्ती लागू आहेत.*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments