Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedजबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता - ...

जबड्यावर अवघड शस्त्रक्रिया झालेल्या मुलीकडून प्रशासनाप्रती कृतज्ञता – विभागीय आयुक्तांची भेट घेऊन व्यक्त केले ऋणनिर्देश

सांगली, दि. 26 (जि. मा. का.) : ईश्वरपूर येथील एका मुलीला जन्मत: खालचा जबडा अडकलेला असल्याने बोलता व खाता येत नव्हते. तिची खर्चिक शस्त्रक्रिया व उपचार जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून घेण्यात आलेल्या घरेलु कामगार आरोग्य तपासणी शिबीरांतर्गत पार पडले. यामुळे त्या मुलीला अन्नग्रहण करता येऊ लागले आहे. तसेच बोलण्याच्या क्रियेची सुरवात होऊ लागली आहे. सदर मुलीने तिच्या वडिलांसह जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांची भेट घेवून आपल्यावर झालेल्या खर्चिक उपचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यानींही सदर मुलीची आपुलकीने विचारपूस केली. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आदि उपस्थित होते.

 

 

 

यावेळी शस्त्रक्रिया पार पडलेल्या वसंतदादा पाटील दंत रुग्णालय, कवलापूर येथील डॉ. श्रीनिवास अष्टेकर, डॉ. सचिन मजती, डॉ. सुरेखा बेडसगावकर व डॉ. अनिरुध्द पाटील या टीमने पार पाडली. याबाबत विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी त्यांचे कौतुक केले.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments