ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड,मुंबई,इंडिया या संस्थेच्या मान्यतेने भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू सन्माननीय श्री करसन घावरी सर यांच्या सन्मानार्थ *करसन घावरी चॅम्पियन करंडक 2026* वेस्ट झोन दिव्यांग टी-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन
पुणे,29 डिसेंबर 2025. दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट,पुणे डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन तसेच ऑल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्ड यांच्या संयुक्त विद्यमाने करसन घावरी चॅम्पियन करंडक वेस्ट झोन दिव्यांग टी20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा सिंहगड इन्स्टिट्यूट,लोणावळा येथील क्रिकेट मैदानावर दिनांक 1 ते 3 जानेवारी 2026 या कालावधीत पार पडणार आहे.
स्पर्धेबाबत माहिती देताना ऑल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर फिजिकली चॅलेंज्डचे अध्यक्ष शरद सावंत म्हणाले की, “दिव्यांग खेळाडूंना त्यांच्या क्रीडागुणांचे सादरीकरण करण्यासाठी योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.”
महाराष्ट्र राज्य दिव्यांग खेळाडू प्रतिनिधी सोमनाथ नलावडे, व अश्विन शिंदे यांनी सांगितले,“या स्पर्धेत महाराष्ट्र, मुंबई, सौराष्ट्र, बडोदा, गुजरात आणि प्रेसिडेंट इलेव्हन हे संघ सहभागी होत असून,अत्यंत चुरशीचे व दर्जेदार सामने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.”
यावेळी माजी भारतीय दिव्यांग खेळाडू व दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे सचिव राजू मुजावर म्हणाले,
“अशा स्पर्धांमुळे दिव्यांग खेळाडूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळते.पुण्यात वेस्ट झोन स्तरावरील स्पर्धेचे आयोजन होणे ही अभिमानाची बाब आहे.”
पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे समन्वयक कैलास येवले म्हणाले की, “पुणे जिल्हा क्रिकेट असोसिएशनने नेहमीच समावेशक क्रीडा उपक्रमांना पाठबळ दिले आहे.या दिव्यांग टी20 स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य असोसिएशनकडून करण्यात आले आहे.”
दिव्यांग क्रिकेट असोसिएशन पुणे जिल्ह्याचे समन्वयक राहुल मगर यांनी सांगितले,“ही स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नसून,दिव्यांग खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवणारी आणि त्यांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ देणारी आहे. या स्पर्धेतून अनेक नवोदित खेळाडू पुढे येतील, असा आम्हाला विश्वास आहे.”
स्पर्धेतील विजेत्या संघाला करसन घावरी चॅम्पियन करंडक तसेच आकर्षक पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज व मालिकावीर यांना देखील आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. सदर स्पर्धेचे मुख्य प्रायोजक उद्योजक अनिल जोगळेकर यांच्या मदतीने व AICAPC संस्थेचे उपाध्यक्ष विनोद देशपांडे निवड चाचणी समिती सदस्य श्री ब्रिजेश सोलकर,श्री प्रसाद देसाई, मिलिंद गुंजाळ,श्रीकांत काटे,सौरभ रावळिया व संस्थेचे सचिव श्री विनायक धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखा
ली होत आहे.


