पुणे । जानेवारी १५, २०२६: ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल)च्या सीएसआर शाखेने उल्लेखनीय टप्पा संपादित केला आहे, जेथे पुण्यातील तळेगावजवळ आयओएनआयक्यू फॉरेस्ट उपक्रमांतर्गत १ दशलक्ष झाडांचे यशस्वीरित्या वृक्षारोपण केले. या उपक्रमांतर्गत ९०.५ एकर जागेवर मियावाकी पद्धतीचा वापर करत ४१ स्थानिक वृक्ष प्रजातींची लागवड करण्यात आली. हा उपक्रम देशामध्ये हाती घेण्यात आलेला सर्वात प्रभावी, एकाच ठिकाणी आणि ठराविक वेळेमध्ये करण्यात आलेला वनीकरण प्रयत्न आहे.
मे २०२५ मध्ये जागा पाहणीसह या उपक्रमाची सुरूवात झाली, ज्यानंतर जागतिक पर्यावरण दिनी (५ जून २०२५) वृक्षारोपण मोहिम सुरू झाली. यानंतर सप्टेंबर २०२५ मध्ये महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते अधिकृतरित्या उद्घटन करण्यात आले. प्रत्येक झाडावर क्यूआर कोडसह जिओ टॅग लावण्यात आला आहे, ज्यामधून पादर्शकतेची खात्री मिळण्यासोबत झाडांची उत्तम देखभाल करता येते.
या उपक्रमांचे महत्त्व सांगत एचएमआयएलच्या कॉर्पोरेट अफेअर्स, कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स अँड सोशलचे एव्हीपी व व्हर्टिकल हेड श्री. पुनीत आनंद म्हणाले, ”ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशनचा आयओएनआयक्यू फॉरेस्ट प्रकल्प वनीकरण प्रयत्नापेक्षा अधिक आहे. या प्रकल्पामधून हरित व अधिक शाश्वत भविष्य निर्माण करण्याप्रती आमचा दृष्टिकोन दिसून येतो. पर्यावरण संवर्धन व समुदायांच्या सक्षमीकरणाला एकत्र करत ह्युंदाई भारतात शाश्वत विकासासाठी मापदंड स्थापित करत आहे. या उपलब्धीला अधिक महत्त्वपूर्ण बनवणारी बाब म्हणजे एकाच ठिकाणी एका वर्षाच्या आत १ दशलक्ष झाडे लावण्यात आली आहेत. यासह ह्युंदाई महाराष्ट्रात आपली उपस्थिती वाढवत असताना पर्यावरणीय स्थिरता, हवामान कृती आणि जबाबदार विकासाप्रती कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.”
पर्यावरणीय प्रभावाव्यतिरिक्त हा उपक्रम समुदायांना सक्षम करतो, जेथे स्थानिक आदिवासी समुदायामधील १५० हून अधिक सदस्यांसाठी शाश्वत उदरनिर्वाह निर्माण केला आहे, सामाजिक सर्वसमावेशनासह पर्यावरणीय संवर्धानाला प्राधान्य देत आहे. पुढील पाच वर्षांमध्ये या वनातील झाडे ६३,००० टन कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे जैवविवविधता वाढेल आणि हवामान स्थिरता प्रबळ होईल.
पूर्णपणे विकसित झाल्यानंतर हे वन शाळा व स्थानिक समुदायांसाठी गतीशील शैक्षणिक केंद्र म्हणून सेवा देईल, जेथे पर्यावरणाबाबत जागरूकतेला चालना देण्यात येईल आणि भावी पिढ्यांमध्ये शाश्वततेची संस्कृती रूजवण्यात येईल.
या प्रयत्नामधून एचएमआयएफची महाराष्ट्राप्रती दीर्घकालीन कटिबद्धता दिसून येते, ज्याला पर्यावरण, आरोग्यसेवा, रस्ता सुरक्षितता आणि समुदाय विकास अशा प्रमुख क्षेत्रांमधील ५६ कोटी रूपयांच्या सीएसआर गुंतवणूकीचे पाठब
ळ आहे.


