पुणे, दि. १५ जानेवारी २०२६ – पूना क्लब लिमिटेड यांच्या वतीने आयोजित बहुप्रतीक्षित अशा अत्यंत प्रतिष्ठेच्या सातव्या द पूना क्लब गोल्फ लीग-२०२६ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यात १४ संघांनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा येरवडा येथील पुना क्लबच्या गोल्फ कोर्सवर १६ जानेवारीपासून सुरु होणार आहे.
स्पर्धेला ड्यूकॅटी लीगसी मोटर्स यांचे मुख्य प्रायोजकत्व लाभले असून न्याती यांचे सह प्रायोजकत्व लाभले आहे.
पूना क्लब गोल्फ लीग ही स्पर्धेतील संघांची प्रत्येकी सात संघ अशी दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. यामध्ये एकेरी, फोरसम्स, फोरबॉल अशा लढती पाहायला मिळणार आहेत. हि स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवण्यात येणार असून अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत. स्पर्धेचे सामने आठवड्याच्या शेवटी होणार असून सर्व गुणनोंदणी डिजिटल पद्धतीने केली जाईल, ज्यामुळे खेळाडू आणि प्रेक्षक खेळाडूंसाठीही पारदर्शकता आणि रिअल-टाइम अद्यतने सुनिश्चित होणार आहे.
पूना क्लब गोल्फ लीग ही केवळ एक स्पर्धा नसून विविध क्षेत्रातील नाते संबंध घडविण्याची आणि गोल्फ वरील सर्वांचे प्रेम एकत्रित रित्या साजरे करण्याची सुवर्ण संधीच आहे. एकूण १४ संघ आणि २५२ अधिक खेळाडूंच्या सहभागामुळे यंदाची स्पर्धा अतिशय चुरशीची ठरेल यात शंका नाही.
स्पर्धेतील संघांची अ व ब गटात विभागणी करण्यात आली असून अ गटात मानव डीजीएमसी पिन सीकर्स, मनप्रीत, एबी अँड जीजी जॅग्वार्स, विजय अडवाणी आणि महिंद्रा लुल्ला फेअरवे टायटन्स, ऑटोमेक बेकर्स, शुब्बान सनरायजर्स, शिर्के बर्डी बँडिट्स, अडवाणी सुपर किंग्ज यांचा तर, ब गटात जिंजर्स, तेजोमया स्टार्स, हिलियॉस ईगल्स, मेव्हरिक्स, इव्हेन्ट डायनमिक्स पार-टी टायगर्स , जॉय-एन-क्र्यु चॅलेंजर्स, व्हॅस्कॉन पूना लायन्स,यांचा समावेश आहे.
पूना क्लब गोल्फ लीग ही स्पर्धा पुण्याच्या गोल्फ स्पर्धा मालिकेच्या उच्च दर्जाचा मानदंड आहे. या स्पर्धेमुळे कॉर्पोरेट क्षेत्रातील अव्वल खेळाडू आणि अन्य क्षेत्रातील अनुभवी खेळाडूबरोबरच हौशी गोल्फ पटू सुद्धा अशा स्पर्धेसाठी एकत्र येतात जेथे कौशल्य, सांघिक वृत्ती आणि खेळा वरील निष्ठा यांचा संगम होतो. यावर्षीच्या स्पर्धनिमित्याने स्पर्धात्मकता आणि बंधूभाव एकत्र येणार आहे.
पूना क्लब गोल्फ लीग ही केवळ एक स्पर्धा नसून विविध क्षेत्रातील नाते संबंध घडविण्याची आणि गोल्फ वरील सर्वांचे प्रेम एकत्रित रित्या साजरे करण्याची सुवर्ण संधीच आहे. ही लीग म्हणजे एक असे अभिनव व्यासपीठ आहे. जेथे केवळ गोल्फ मधील कौशल्याच्या स्पर्धात्मकतेप्रक्षाही खेळाडू आणि संघांमधील सहकार्य आणि बंधूभाव अधिक महत्वाचा ठरतो. एका अत्यंत दर्जेदार स्पर्धेचा अनुभव यामुळे आम्हाला मिळेल अशी आमची खात्री आहे.
पूना क्लब गोल्फ २०२६ ही स्पर्धा संपूर्ण गोल्फ समुदायाच्या गोल्फ वरील निष्ठेचे आणि उत्साहाचे प्रतिनिधित्व करते..प्रत्येक संघाचा उत्साह आणि खिलाडूवृत्ती ही सर्वांसाठी प्रेरणा दायक ठरेल अशीच
आहे.


