Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedनोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे अवयवदान या विषयावर सीएमई परिषदेचे आयोजन

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे अवयवदान या विषयावर सीएमई परिषदेचे आयोजन

पुणे,19 जानेवारी 2026 : नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे अवयवदान प्रक्रिया,नियमावली (डिसीज्ड ऑर्गन डोनेशन,प्रोसेसस,प्रोटोकॉल्स ॲन्ड केस बेस्ड लर्निंग) या विषयावर रूग्णालयाच्या सभागृहात सीएमई परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये या क्षेत्रात कार्यरत 100 हून अधिक लोकांनी भाग घेतला.या कार्यक्रमाचे उद्घाटन नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने,संचालक दिविज माने,समुह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे यांसह झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन ऑफिसर आरती गोखले,रूबी हॉल क्लिनिक येथील न्युरो क्रिटिकल केअर चे प्रमुख व सिनियर इंटेसिव्हिस्ट डॉ.कपिल झिरपे,सह्याद्रि हॉस्पिटल येथील प्रत्यारोपण समन्वयक मयुरी बारगे,झेडटीसीसी पुणेच्या सहसचिव व प्रत्यारोपण शल्यचिकित्सक वृषाली पाटील,नोबल हॉस्पिटल्समधील यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ.मनोज श्रीवास्तव आणि वरिष्ठ मुत्रपिंड तज्ञ व ट्रान्सप्लांट फिजिशियन डॉ.अविनाश इग्नेशियस यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

 

झेडटीसीसीच्या झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन ऑफिसर आरती गोखले आरती गोखले यांनी अवयव दान आणि त्यानंतरच्या प्रक्रियेबाबत कार्यप्रणालीची माहिती दिली.तसेच विविध समित्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला.त्या म्हणाल्या की,जेव्हा पुण्यात 1997 मध्ये पहिले प्रत्यारोपण झाले त्यावेळेस मेंदूमृत ही संकल्पना लोकांना समजून सांगायला लागायची.त्यापासून ते आजवर आपण मोठा पल्ला गाठला आहे आणि अवयवदानाविषयी जनजागृती आणि संबंधित कर्मचाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण चालू ठेवणे महत्त्वाचे आहे.

 

डॉ.कपिल झिरपे म्हणाले की,अवयवदानामुळे 8 गरजू रूग्णांना नवजीवन मिळू शकते या जाणिवेने मृत रूग्णांकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलला आहे.दात्यांची संख्या वाढवण्यापलीकडे मेंदूमृत झालेल्या रूग्णाकडून दान केल्या जाणाऱ्या अवयवांची संख्या वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.यासाठी सर्वांत वरिष्ठ तज्ञांच्या देखरेखीखाली योग्य दाता आणि प्राप्तकर्ता व्यवस्थापन गरजेचे आहे.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की,अवयवदान जागरूकता हे आमच्या सर्व जनजागृती कार्यक्रमांचा एक मुख्य भाग राहिला आहे.नुकतेच गेल्या वर्षी गणेशोत्सवात आमच्या 400 कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत अवयवदानाची प्रतिज्ञा केली.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे समुह कार्यकारी अधिकारी डॉ.संजय पठारे यांनी उपस्थितांचे स्वागत के

ले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments