Wednesday, August 26, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहेश बालभवनतर्फे आंतरशालेय सामूहिक नृत्य स्पर्धा आयोजित

महेश बालभवनतर्फे आंतरशालेय सामूहिक नृत्य स्पर्धा आयोजित

 

महेश बालभवनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामूहिक शालेय नृत्यस्पर्धेत इयत्ता 1ली ते 4 थी या गटात श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील प्राथमिक शाळेने प्रथम क्रमांक व तापडिया करंडक पटकावला. इयत्ता 5वी ते 9 वी या गटात ढोले पाटील स्कुल फॉर एक्सलन्स या शाळेने प्रथम क्रमांक व तापडिया करंडक पटकावला.

ही सामूहिक शालेय स्पर्धा बाल गटात इयत्ता 1ली ते 4 थी व मोठया गटात इयत्ता 5वी ते 9 वी अशा 2 गटात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील 47 नामांकित शाळांमधूम 800 विध्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्वर्गीय श्री. भगिरथ तापडिया यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा तापडिया करंडक हा उपक्रम सेफपॅक इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या प्रायोजकत्वाखाली पार पडला. गेल्या दशकभरापासून सातत्याने लोककलेच्या संवर्धनासाठी कार्यरत असलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये भारतीय नृत्यपरंपरेची गोडी निर्माण करत आहे.

 

या स्पर्धेतील विजेत्यांना माहेश्वरी विद्या प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष बालकिशन करवा, विश्वस्त सुशिला राठी, सेफपॅक इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष राजेंद्र तापडिया, उद्योजक अनुप तापडिया व आनंद तापडिया यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले. दोन्ही गटातील प्रथम क्रमांक विजेत्या स्पर्धकांना प्रत्येकी 21 हजार रुपये व तापडिया करंडक असे या बक्षिसाचे स्वरूप होते.

दोन्ही गटांमध्ये प्रथम द्वितीय तृतीय व चतुर्थ अशी रोख पारितोषक व करंडक देण्यात आली. उत्तेजनार्थ प्रत्येक गटामध्ये तीन/ तीन पारितोषिक देण्यात आली. या स्पर्धेचे प्रायोजिकतव सेफपॅक इंडस्ट्रिज लिमिटेड कंपनीतर्फे करण्यात आले होते.

राकेश राठी, अनुराधा गांधी व स्नेहा बर्गे यांनी या स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.

या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री राजेंद्र तापडिया म्हणाले की, विध्यार्थ्यांनी सादर केलेले सामूहिक नृत्य अत्यंत प्रेरणादायी व ऊर्जा देणारे होते. नव्या पिढीला भारतीय लोककला व परंपरेशी जोडले जावे, विध्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, आणि भारतीय संस्कृतीबद्दल अभिमान वाटावा हेच या स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

स्पर्धेतील विजेत्या शाळांची नावे पुढीलप्रमाणे —-

 

१ ली ते ४ थी

१) प्रथम पुरस्कार व तापडिया करंडक

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील ,प्राथमिक शाळा

२) व्दितीय पुरस्कार- द ऑरबिस स्कूल,मुंढवा

३) तृतीय पुरस्कार – रॅंगलर र.पु.परांजपे हुजूरपागा प्राथमिक शाळा

४) चतुर्थ पुरस्कार – एंजल हायस्कुल CBSC

 

उत्तेजनार्थ –

१)शेठ केशवचंद पारख प्राथमिक विद्यालय,राजगुरुनगर

२) श्री एकनाथ खेसे इंग्लिश मिडियम स्कूल

३) महेश विद्यालय इंग्लिश मिडियम स्कुल

###############

५ वी ते ९ वी

प्रथम पुरस्कार -तापडिया करंडक

१) ढोले पाटील स्कूल फॉर एक्सलन्स

२) व्दितिय पुरस्कार – मॅाडर्न हायस्कूल रु.NCL

३) तृतीय पुरस्कार – भारतीय विद्याभवन परांजपे विद्या मंदीर

४) चतुर्थ पुरस्कार- पोतदार इंटरनशनल स्कूल,CBSC चाकण

 

उत्तेजनार्थ

१)ध्रुव ग्लोबल स्कूल ,नांदे

२)छत्रपती संभाजी प्राथमिक विद्यालय मनपा.शाळा क्रमांक ४७

३)लिटील फ्लावर्स इंग्लिश मीडियम स्कूल CBSC

४)महेश विद्यालय इंग्लिश मीडियम

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments