पुणे,20 जानेवारी 2026 : मुळच्या विंग कमांडर (निवृत्त) आणि चित्रकार डॉ.मेधा देशपांडे यांच्या रंगसखा या पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 27 जानेवारी 2026 ते 2 फेब्रुवारी 2026 दरम्यान औंध येथील फेज 1 रोड येथील सनगार्ड बिल्डिंग,वेस्ट एंड सेंटर 1 मधील पीएनजी ॲन्ड सन्स येथे सकाळी 11 ते रात्री 8 दरम्यान सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात निसर्गाने प्रेरित एकूण 25 वॉटर कलर पेंटींग्स प्रदर्शित केली जाणार आहेत. निसर्ग,लँडस्केप आणि शिल्पकला या प्रकारातील सुंदर पेंटिंग्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.


