पुणे,23 जानेवारी 2026 : भारत आणि युनायटेड अरब इमिरेटस दरम्यान सध्याच्या फ्लाईटस व आसनक्षमतांमधील मर्यादांमुळे वाढत्या मागणीची पूर्तता अपुरी राहण्याची शक्यता असल्याचे एका नवीन अभ्यासामधून समोर आले आहे. या अभ्यासात केलेल्या विश्लेषणानुसार सध्याची क्षमता लक्षात घेता भारत आणि युएई दरम्यानची प्रवासी वाहतुकीच्या 27 टक्के मागणीची पूर्तता करता येणार नाही.याचाच अर्थ 2026 ते 2035 दरम्यान 54.5 दशलक्ष लोकांच्या प्रवासाची कमतरता होऊ शकेल.अबुधाबी-भारत या प्रवासी मार्गावरील 13.2 दशलक्ष प्रवाशांची मागणी पूर्ण होऊ शकणार नाही.या अहवालामध्ये भारतातील हवाई वाहतूक बाजारपेठेतील मजबूत रचनात्मक वाढ अधोरेखित केली गेली आहे.
टुरिझम इकोनॉमिक्स चे सल्लागार संचालक मॅथ्यू डॅस म्हणाले की,भारत-युएई दरम्यान हवाई वाहतुकीची मागणी झपाट्याने वाढत आहे.अभ्यास केलेल्या काळादरम्यान महत्त्वाच्या मार्गांवर लोड फॅक्टर हा 80 टक्क्यांपेक्षा जास्त असून भविष्यातील मागणी आणि उपलब्ध सीटस मधील दरी वाढून 2026 पर्यंत उपलब्ध क्षमता पूर्णपणे वापरली जाईल असा अंदाज आहे
.


