Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*

*

पुणे, दि. ६ : कलात्मक समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाजसेवकांना आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना देण्यात येणाऱ्या महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी २० मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन मागास बहुजन कल्याण कार्यालयाने केले आहे.

राज्यातील वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाजसेवकांना आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिवर्षी वैशाख शुद्ध अक्षय्य तृतीयेच्या दिवशी त्यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो.

पुरस्काराची पात्रता, निकष व अधिक माहितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा पोलीस स्टेशनसमोर, विश्रांतवाडी पुणे-६ या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक संगीता डावखर यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments