Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedआंतरराष्ट्रीय महिला दिन २०२४ च्या निमित्ताने हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजेसकडून २५,००० महिलांच्या...

आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२४ च्या निमित्ताने हिंदुस्तान कोका कोला बेव्हरेजेसकडून २५,००० महिलांच्या सक्षमीकरणाचा बहुराज्यीय उपक्रम पूर्ण

राष्ट्रीय, ७ मार्च २०२४: आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२४ च्या निमित्ताने भारतातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेस (एचसीसीबी) ने २५००० महिलांना आर्थिक आणि डिजिटल साक्षर करण्याच्या आपल्या बहुराज्यीय महिला सक्षमीकरण योजनेच्या यशस्वी पूर्ततेची घोषणा केली आहे. ही एक महत्त्वाची कामगिरी असून त्यामुळे आर्थिक समावेश आणि डिजिटल अंगीकार यांच्यामधील लिंगाधारित विभाजन कमी करण्याच्या दृष्टीने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि मागील वर्षाच्या ऑगस्ट महिन्यात घोषित करण्यात आलेल्या महिला सक्षमीकरणाप्रति एचसीसीबीच्या वचनाशी सुसंगत आहे.

हा उपक्रम वाय४डी फाऊंडेशनच्या भागीदारीत सुरू करण्यात आला होता. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, पश्चिम बंगाल, बिहार, आसाम आणि ओदिशा अशा १२ भारतीय राज्यांमध्ये पसरलेल्या या उपक्रमातून एक खास क्लासरूम कार्यपद्धती वापरण्यात आली. त्याची रचना विविध पार्श्वभूमीच्या महिलांच्या विविध गरजा, स्वारस्य, क्षमता स्तरांनुसार करण्यात आली होती, आणि त्यांना वित्तपुरवठा व तंत्रज्ञानाच्या शक्तीचा वापर करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

या अभ्यासक्रमाची रचना नवीन अर्थव्यवस्थेत टिकून पुढे जाण्यासाठी विविध प्रकारची कौशल्ये देण्याच्या दृष्टीने करण्यात आली होती. बँकिंग सेटअपच्या मुलभूत माहितीपासून ते युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) वापरण्यापर्यंत, गुंतवणूक धोरणांमध्ये माहिती मिळवण्यापासून ते ऑनलाइन बँकिंगचा फायदा घेण्याबरोबरच या उपक्रमातून महिलांना मदत करण्यासाठी विविध सरकारी उपक्रमांवरही भर देण्यात आला. त्यात बेटी बचाओ, बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना आणि नारीशक्ती अशा उपक्रमांचा समावेश होता. डिजिटल साक्षरता घटकदेखील तेवढाच सर्वसमावेशक होता. त्यात मोबाइल बँकिंग, डिजिटल मार्केट लिंकेज आणि सायबर सिक्युरिटी अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला. याद्वारे सहभागींना एक चांगले राहणीमान मिळवून घरच्या अर्थव्यवस्थेत योगदान देण्याची संधी देण्यात आली.

स्थानिक भाषांमध्ये चाललेल्या संवादात्मक सत्रांद्वारे एक उत्तम शिक्षणाचा अनुभव देण्यात आला. त्यात सारांश पुस्तिका, प्री रेकॉर्डेड लेक्चर्स आणि पूर्तता प्रमाणपत्रे अशा विविध गोष्टी होत्या. या वैयक्तिकीकृत दृष्टीकोनामुळे सहभागींना देण्यात आलेले ज्ञान सहजपणे आत्मसात करून त्याचा वापर करणे शक्य झाले.

या महत्त्वाच्या टप्प्याबाबत बोलताना हिंदुस्तान कोका-कोला बेव्हरेजेसचे चीफ पब्लिक अफेयर्स, कम्युनिकेशन्स आणि शाश्वतता अधिकारी श्री. हिमांशू प्रियदर्शी म्हणाले की, “आपण आंतरराष्ट्रीय महिला दिन २०२४ साजरा करत असताना आम्हाला देशभरातील २५,००० महिलांचे सबलीकरण करता आले त्याबाबत खूप अभिमान वाटतो. हा उपक्रम आपल्या समाजात अर्थपूर्ण बदल घडवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. या महिलांना आपल्या आर्थिक आणि डिजिटल आयुष्यांचा ताबा घेण्यास सक्षम करून आम्ही त्यांच्या क्षमतेचा गौरव तर करतो आहोतच पण त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबांच्या, समाजाच्या आणि अंतिमतः आपल्या देशाच्या भरभराटीला हातभार लावत आहोत. हे आमच्या तत्वांनुसार आणि सरकारच्या महिलांच्या नेतृत्वाखालील विकास दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. आम्ही सर्वसमावेशकतेला तसेच सकारात्मक सामाजिक बदलांसाठी तंत्रज्ञानाच्या भूमिकेवर भर देत आहोत.”

वाय४डी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल निकम यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “वाय४डी फाऊंडेशनमध्ये आम्ही शिक्षण आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून व्यक्ती आणि समाजाचे सक्षमीकरण करण्याचे ध्येय ठेवतो. एचसीसीबीसोबत महिला सक्षमीकरण उपक्रम सकारात्मक बदलाला चालना देण्यातील भागीदारीच्या शक्तीचे प्रतीक आहे. आम्ही एकत्र येऊन महिलांना आपल्या आर्थिक भविष्याचे नियंत्रण घेण्यासाठी आणि डिजिटल क्रांतीने सादर केलेल्या संधींचा वापर करण्यासाठी सक्षम केले आहे.”

या कार्यक्रमाच्या कर्नाटकातील एक लाभार्थी श्रीमती नाझिया बानू म्हणाल्या की, “या उपक्रमात सहभागी होण्यापूर्वी माझ्या मुलीच्या भविष्यासाठी असलेल्या कोणत्याही सरकारी योजनांची मला माहिती नव्हती. मी कोणतीही विशिष्ट योजना न ठेवता पारंपरिक पद्धतीने पैशांची बचत करत असे. परंतु या प्रशिक्षणाच्या माध्यमातून मला सुकन्या समृद्धी योजना आणि तिच्या फायद्यांची माहिती मिळाली. आता मी या योजनेअंतर्गत खाते उघडले आहे आणि दर महिन्याला माझ्या मुलीच्या भवितव्यासाठी मी पैशांची बचत करते. आम्हा महिलांसाठी सुसंगत आणि उपयुक्त ठरणारे प्रशिक्षण दिल्याबद्दल मी एचसीसीबीची आभारी आहे. या मदतीमुळे माझ्या आयुष्यात मोठा बदल घडून आला आहे.”

या कार्यक्रमाच्या ओदिशामधील दुसऱ्या लाभार्थी श्रीमती लिझा नायक म्हणाल्या की, “कॉर्पोरेट नोकरी मिळणारी मी माझ्या कुटुंबातील एकमेव महिला होता. परंतु आम्हाला दारिद्र्यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागत असे. शिवाय आमची काहीही बचत नव्हती. दर महिन्याला ३००० रूपयांची बचत फारशी उपयुक्त ठरत नव्हती कारण मला गुंतवणूकीबद्दल काहीही माहीत नव्हते. आर्थिक साक्षरता सत्रानंतर स्मार्ट गुंतवणूकीचे महत्त्व कळले. आता मी अधिक चांगल्या जास्त परतावा पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे आणि आरोग्य विम्यातही गुंतवणूक केली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकीचे महत्त्व समजून घेण्यासाठी इतरांना मदत करण्याच्या दृष्टीने आणखी समुदाय सत्रांसाठी मी उत्सुक आहे. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी एचसीसीबी आणि वाय४डी फाऊंडेशनची मी आभारी आहे.”

एचसीसीबी सर्वसमावेशक वाढीला चालना देणाऱ्या उपक्रमांबाबत वचनबद्ध आहे. जवळपास २५,००० महिलांचे सशक्तीकरण करण्याच्या महत्त्वाच्या कामगिरीबरोबरच ही कंपनी तरूणांसाठी विक्री आणि मार्केटिंग कौशल्ये, विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस् टू कॉर्पोरेट कार्यक्रम आणि व्यापक सामाजिक उपक्रमांसाठी काम करते. या कार्यक्रमांमधून ७००,००० व्यक्तींना लाभ झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments