…
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या सुचनेनुसार युवा मोर्चाने संपूर्ण राज्यात नमो चषक २०२४ चे आयोजन केले होते. या अंतर्गत कोथरुड मतदारसंघात ही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी स्पर्धा आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे उत्तम नियोजन केल्याबद्दल; नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आपल्या हातातील घड्याळ काढून कोथरुड दक्षिणचे सरचिटणीस दीपक पवार यांना दिले.