पुणे, 5 मार्च 2024: ONDC (Open Network for Digital Commerce) ने नेटवर्क वर ‘O रिक्षा’ खरेदीदार आणि विक्रेता अॅप लॉन्च केल्याची घोषणा केली. पुणे शहाराच्या गतिशीलतेमधील हे एक लक्षणीय पाऊल आहे. हे अॅप शहरातील ऑटो चालक आणि प्रवासी या दोघांना ओपन नेटवर्कवर थेट जोडते.
हे अॅप एक समुदाय-चलित सेक्शन 8 कंपनी, एन्ड माईल कनेक्टिव्हिटी फेडरेशनच्या मालकीचे असून त्यांच्या द्वारेच ते चालवण्यात येते. ऑटो चालकांना सक्षम करण्यासाठी तसेच पुण्याच्या नागरिकांना सुरक्षित, परवडण्याजोग्या ऑटो राईड्स उपलब्ध करून देण्यासाठी ते स्थापन करण्यात आले आहे. पुण्यातील 12000 पेक्षा जास्त ऑटो चालक आधीच या फेडरेशनचा भाग झाले आहेत आणि आता ते ‘O रिक्षा’ अॅपव’र उपलब्ध असतील. ड्रायव्हर समूह ONDC नेटवर्कवर उपलब्ध होण्याची ही पहिलीच घटना असल्यामुळे हा उपक्रम या क्षेत्रातील एक लक्षणीय क्षण दर्शवतो. हे टेक-सक्षमकर्ता सुमा सॉफ्ट द्वारे शक्य झाले आहे.
या लॉन्च इव्हेंटमध्ये श्री. टी. कोशी (ONDCचे एमडी आणि सीईओ), श्री. हर्डीकर (एमडी पुणे मेट्रो), श्री. वेलणकर (ग्राहक मंचाचे अध्यक्ष), श्री. सूर्यकांत पाठक (ग्राहक पेठचे अध्यक्ष), श्री. सुरेंद्र ब्रह्मे (सुमा सॉफ्टचे संचालक) आणि श्री. श्रीकांत आचार्य (एन्ड माईल फेडरेशनचे सल्लागार) या प्रमुख मान्यवरांचा समावेश होता.
ONDCचे एमडी आणि सीईओ टी. कोशी यांनी सांगितले, “स्थानिक समुदायांना सक्षम बनवून ई-कॉमर्सचे लोकशाहीकरण करण्याचे ONDCचे उद्दीष्ट आहे. ‘O रिक्षा’ अॅप या कल्पनेशी मिळतेजुळते असून पुण्यातील नागरिकांना त्याच्यामुळे खूप फायदा होईल. हे लॉन्च ऑटो चालक आणि प्रवाशांच्या हातात परत नियंत्रण देण्याच्या ONDCच्या उपक्रमाचा परिणाम आहे. पुण्याने शहरी गतिशीलतेचा हा परिवर्तनवादी प्रवास स्वीकारला असून हे अॅप सर्वसमावेशक आणि सर्वांना एकसमान संधी देणारे आहे. सकारात्मक बदला घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाच्या क्षमतेची प्रचिती यातून मिळते.”
‘O रिक्षा’ अॅप च्या यशस्वी विकासामध्ये ONDC नेटवर्कसाठी सुमा सॉफ्ट या पुणे–स्थित तंत्रज्ञान सेवा प्रदात्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. चालकांना सक्षम बनवण्याच्या उद्दिष्टाने त्याची रचना करण्यात आली आहे आणि पुढील 3 महिन्यांत आणखी 35000 चालक ऑनबोर्ड करण्यासाठी ते तत्पर आहे. पुढील 6 महिन्यांत महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये आपली सेवा विस्तारित करण्याची त्याची योजना आहे.
सुमा सॉफ्टचे संचालक, सुरेन्द्र ब्रह्मे म्हणाले, “सुमा सॉफ्ट सर्वोत्कृष्ट श्रेणीची उत्पादने विकसित करण्यावर विश्वास ठेवते, जे सर्व भागधारकांसाठी आणि एकंदरितच पर्यावरणासाठी टिकाऊ विकास आणि सामायिक समृद्धी सुनिश्चित करते. ONDC, AA आणि ABDM सह इंडिया स्टॅकच्या विविध घटकांशी निगडीत होताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे, जिथे विकसनशील भारतासाठी उपयुक्त डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांचा शोध घेतला जात आहे. रिक्षा चालकांच्या जीवनात मूल्ये निर्माण करण्याचा हा उपक्रम त्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.”
एन्ड माईल कनेक्टिव्हिटी फेडरेशनचे संचालक केदार ढमाले म्हणाले, “भारतातील शेवटच्या मैलाच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये क्रांती घडवणे हे एन्ड माईल कनेक्टिव्हिटी फेडरेशनचे उद्दीष्ट आहे. प्रवाशांना त्यांच्या अंतिम गंतव्य स्थानाशी जोडणार्या प्रवासाचा अंतिम टप्पा गाठण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ते बस किंवा रेल्वे स्थानकापासून एखाद्या व्यक्तीचे घर किंवा कार्यालय यामधील छोटेसे अंतर असू शकते. समाजातील वंचित घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे तसेच चालकांच्या कुटुंबाचे कल्याण करण्याचे एक साधन म्हणूनही आम्ही याकडे बघत आहोत.”
‘O रिक्षा’ अॅप लॉन्च हे भारतातील शाश्वत वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि शेवटच्या टप्प्यातील कनेक्टिव्हिटीचे उद्दीष्ट साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा अनुभव सुधारतोच परंतु स्वच्छ आणि हरित राष्ट्र निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांनाही पाठबळ मिळते.
‘O रिक्षा’ अॅपच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे चालकांना त्यांचा योग्य मोबदला मिळेल याची खातरजमा करतानाच शून्य-कमिशन मॉडेलशी बांधिलकी. शिवाय, हे अॅप सरकारच्या ‘निर्धारित भाडे’ तत्वाचे पालन करते, त्यामुळे वापरकर्त्यांसाठी वाहतूक परवडण्याजोगी व पारदर्शक बनते.
ONDC विषयी
31 डिसेंबर 2021 रोजी उभी करण्यात आलेली, (Open Network for Digital Commerce) ONDC, एक सेक्शन 8 कंपनी असून उद्योग आणि अंतर्गत व्यापार, वाणिज्य मंत्रालय, भारत सरकारच्या प्रोत्साहन विभागाचा तो एक उपक्रम आहे. ज्याचा उद्देश डिजिटल कॉमर्समध्ये क्रांती घडवून आणणारे एक सुविधाजनक मॉडेल तयार करून भारतात रिटेल ई-कॉमर्सच्या व्याप्तीवर जोर देण्याचा आहे. ONDC हे एक अॅप्लिकेशन, प्लॅटफॉर्म, मध्यस्थ किंवा सॉफ्टवेअर नाही तर तो एक खुला, स्वतंत्र आणि इंटर-ऑपेरेबल ओपन नेटवर्कला चालना देण्यासाठी डिझाईन केलेल्या वैशिष्ट्यांचा एक संच आहे.
सुमा सॉफ्ट विषयी
सुमा सॉफ्ट हा IT सेवा आणि सोल्यूशन्सचा एक आघाडीचा जागतिक प्रदाता आहे, जो इनोव्हेशन आणि कौशल्याद्वारे उत्कृष्टता प्रदान करण्यासाठी समर्पित आहे. 2 दशकांपेक्षा मोठा, समृद्ध इतिहास असलेल्या सुमो सॉफ्टने सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबरसुरक्षा, IT सपोर्ट आणि अशा इतर अनेक सेवांचा सर्वसमावेशक संच प्रदान करून, विविध उद्योगांमधील व्यवसायांसाठी एक विश्वासू भागीदार म्हणून स्वतःची ओळख प्रस्थापित केली आहे. ग्राहकांच्या समाधानासाठी वचनबद्ध सुमा सॉफ्ट प्रत्येक ग्राहकाच्या असाधारण गरजा पूर्ण करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेते व उत्कृष्ट प्रथा राबवते आणि कार्यक्षमता, स्केलेबिलिटी आणि विश्वासार्हता सुनिश्चित करते. ग्राहक-केंद्रित दृष्टीकोन आणि उत्कृष्टतेचा निरंतर ध्यास घेऊन सुमा सॉफ्ट जगभरात डिजिटल परिवर्तनाला चालना देत आहे आणि जगभरातील संस्थांना सक्षम बनवत आहे.
—


