Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात पुणे महानगरपालिकेच्या...

महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेला आजपासून सुरुवात पुणे महानगरपालिकेच्या वतीने, पुणे जिल्हा चेस सर्कलच्या सहकार्याने आयोजन

 

 

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने पुणे महापौर चषक बुद्धिबळ स्पर्धेला आज, गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. पुणे जिल्हा चेस सर्कलच्या सहकार्याने होणारी ही स्पर्धा १२ ते १४ मार्चदरम्यान लॉ कॉलेज रोडवरील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये होणार आहे, अशी माहिती संयोजक सचिव आणि नगरसेवक सुनील पांडे लोहगावकर यांनी दिली.

 

या स्पर्धेत एकूण सहा लाख २१ हजार रुपयांची पारितोषिक देण्यात आली आहेत. ही स्पर्धा ७, ९, ११, १३, १५, १७, १९ वर्षांखालील गट आणि खुल्या गटात होणार आहे. स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील सर्वांना मोफत प्रवेश असणार आहे. प्रत्येक गटातील विजेत्यास ११ हजार रुपयांचे पारितोषिक असणार आहे.

 

स्पर्धेचे उद्घाटन आज, गुरुवारी महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी सुनील पांडे लोहगावकर, स्पर्धा संचालक राजेंद्र कोंडे, चिफ आरबिटर राजेंद्र शिदोरे, पवन राठी, पवन कातकडे आदी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी राजेंद्र शिदोरे (९८९०४८५६६६) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments