Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन..... यशवंतराव...

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन….. यशवंतराव चव्हाण यांनी कुशल नेतृत्व, लोकाभिमुख धोरणे आणि विकासाभिमुख विचारांच्या माध्यमातून रचला आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया – महापौर रवि लांडगे

पिंपरी, दि.१२ मार्च २०२६- देशाचे माजी उपपंतप्रधान, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते, दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व, लोकाभिमुख धोरणे आणि विकासाभिमुख विचारांच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या प्रगतीचा भक्कम पाया रचला. त्यांचे कार्य, मूल्ये आणि राज्यकारभारातील संतुलित दृष्टी आजही प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

 

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात त्यांच्या प्रतिमेस तसेच वल्लभनगर व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील त्यांच्या पुतळ्यास महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

 

मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

 

तर वल्लभनगर आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय येथील कार्यक्रमास उपमहापौर शर्मिला बाबर, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, माजी महापौर तथा नगरसदस्य योगेश बहल, नगरसदस्या अनुराधा गोरखे, वर्षा जगताप, फझल शेख,आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, वैद्यकिय अधिक्षक डॉ. उज्ज्वला आंदुरकर, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, डॉ. छाया शिंदे, डॉ. शैलजा भावसार, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता महादेव बोत्रे, आरोग्य सहाय्यक मोहन वाघमारे, प्रदीप गायकवाड तसेच महापालिका कर्मचारी महासंघाचे अभिषेक फुगे उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी

केले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments