Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक मुत्रपिंड दिनाच्या निमित्त नोबल हॉस्पिटल्स तर्फे जनजागृतीसाठी संवादात्मक सत्राचे आयोजन

जागतिक मुत्रपिंड दिनाच्या निमित्त नोबल हॉस्पिटल्स तर्फे जनजागृतीसाठी संवादात्मक सत्राचे आयोजन

पुणे,12 मार्च 2026 : आजच्या धावपळीच्या जगात चुकीची जीवनशैली व खाण्याच्या सवयींमुळे मुत्रपिंडावर ताण निर्माण होत असताना,मुत्रपिंडाचे आरोग्य राखण्यासाठी निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले.

 

जागतिक मुत्रपिंड दिनाच्या निमित्ताने नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटर आणि नेफ्रोप्लस यांच्या सहयोगाने किडनी हेल्थ फॉर ऑल या विशेष संवादात्मक सत्र व जागरूकता उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

याप्रसंगी नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरच्या वैद्यकीय सेवेच्या संचालक डॉ.मनिषा पाठक यांनी प्रास्ताविक केले.

 

या सत्राचा उद्देश्य मुत्रपिंडाच्या आरोग्याबाबत जनजागृती करणे,प्रतिबंधात्मक देखभाल आणि मुत्रपिंड आजारांचे लवकर निदान करण्याचे महत्त्व याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता.या कार्यक्रमात आरोग्यदायी मुत्रपिंड राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जीवनशैलीतील सवयी,आहार,शारीरिक हालचाल आणि मानसिक आरोग्य याविषयी चर्चा करण्यात आली.

या कार्यक्रमात किडनी पे चर्चा या माहितीपूर्ण चर्चासत्राचा समावेश होता.या सत्रात मुत्रपिंड विकार तज्ञांनी मुत्रपिंड आजारांबाबत असलेले सामान्य समज आणि शंकांचे निरसन केले.

 

नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरच्या नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख व वरिष्ठ कन्सल्टंट डॉ.अविनाश इग्नेशियस आणि कन्सल्टंट नेफ्रोलॉजिस्ट डॉ.राकेश शिंदे यांनी मधुमेह,उच्च रक्तदाब आणि चुकीच्या जीवनशैली यांसारख्या सवयी मुत्रपिंड विकारांना कारणीभूत ठरणाऱ्या जोखमीच्या घटकांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले.

पोषण व आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ.सारिका सातव यांनी संतुलित आहाराचे महत्त्व तसेच मुत्रपिंडाच्या आरोग्यासाठी संतुलित आहार आणि योग्य आहारपध्दती कशी असावी याविषयी मार्गदर्शन केले.

फिजिओथेरपी ॲन्ड रिहॅबिलिटेशन विभागाचे प्रमुख डॉ.भूपेंद्र गुप्ता यांनी फ्लेक्स फन थेरपी हा आकर्षक उपक्रम आयोजित केला होता.या उपक्रमातून नियमित शारीरिक हालचालींचे एकूण आरोग्य राखण्यात असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

 

कन्सल्टंट सायकोलॉजिस्ट आणि आर्ट थेरपीस्ट डॉ.विशाल हरपळे यांच्या किडनी-माईंड कनेक्शन या सत्राने कार्यक्रमाचे समारोप सत्र पार पडले.या सत्रात दीर्घकालीन आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी मानसिक आरोग्य आणि तणाव व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले.

 

याप्रसंगी बोलताना नोबल हॉस्पिटल्स ॲन्ड रिसर्च सेंटरचे उपव्यवस्थापकीय संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की, मुत्रपिंडाच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्याच्या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेळेवर तपासणी करणे,निरोगी जीवनशैली अंगीकारणे आणि आजाराचे लवकर निदान करणे याबाबत लोकांना प्रोत्साहन दिले गेले. या सर्व गोष्टी दीर्घकालीन मुत्रपिंडाच्या आजाराच्या प्रतिबंधासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

 

या उपक्रमात रूग्ण, रूग्णांचे नातेवाईक तसेच रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.या सत्राच्या माध्यमातून मुत्रपिंडाच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले तसेच मुत्रपिंडाचे आजार टाळण्यासाठी निरोगी जीवनशैली अवलंबण्याचा सं

देश देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments