Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedवैष्णवी जाधव, यश भिडे यांना शो जम्पिंग मध्ये सुवर्ण   पुणे महापौर...

वैष्णवी जाधव, यश भिडे यांना शो जम्पिंग मध्ये सुवर्ण   पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेला प्रारंभ ; स्टेट इक्वेस्ट्रियन असोसिएशनचा सहभाग

 

 

पुणे : पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित पुणे महापौर चषक राज्यस्तरीय अश्वारोहण स्पर्धेत दुसऱ्या दिवशी शो जम्पिंग फॉल्ट अँड आऊट प्रकारात पुण्यातील दिग्विजय हॉर्स रायडिंग अकॅडमीच्या वैष्णवी जाधव, यश भिडे यांसह आरएमएलएसएस कॉलेजच्या पूर्वजा खेडकर, दिग्विजय हॉर्स रायडिंग अकॅडमीच्या साईशा पाटील आणि ला फेन्सीच्या अमायशा असीम यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक पटकावले. स.प. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर ही स्पर्धा सुरु आहे.

 

स्पर्धेत स्टेट इक्वेस्ट्रीयन असोसिएशनचा सहभाग आहे. शो जम्पिंग फॉल्ट अँड आऊट प्रकारात खुल्या गटात वैष्णवी जाधव (सुवर्ण), कारमजीत सिंग (रौप्य), रंभान सिंग (ब्राँझ) यांनी यश मिळविले. तर, युवा गटात यश भिडे (सुवर्ण), तन्वी जाधव (रौप्य), विराज पारखे (ब्राँझ) यांनी पदकांची कमाई केली.ज्युनिअर गटात पूर्वजा खेडकर हिने सुवर्ण, अनुम अन्सारी याने रौप्य आणि ब्राँझ पदक मिळविले. चिल्ड्रेन १ गटात साईशा पाटील आणि चिल्ड्रेन २ गटात अमायशा असीम यांनी सुवर्णपदक पटकाविले.

 

ऑलिम्पिकमधील खेळाचा वेगळा प्रकार असलेल्या अश्वारोहण स्पर्धेचा हा थरार दि. १५ मार्च पर्यंत स.प. महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर दररोज सकाळी ८ ते ११ आणि सायंकाळी ५ ते ७ यावेळेत पुणेकरांना अनुभवता येणार आहे. स्पर्धा पाहण्यासाठी प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

संक्षिप्त निकाल (जिमखाना क्रीडाप्रकार) :

हॅक्स : बिगिनर – निनाद नाईक (सुवर्ण), ध्रुव ममानिया (रौप्य), संजना जोशी (ब्राँझ). खुला – करमजीत सिंग (सुवर्ण), वैष्णवी जाधव (रौप्य), गुरुप्रीत सिंग (ब्राँझ). युवा – तन्वी जाधव (सुवर्ण), यश भिडे (रौप्य), भूवी मींच (ब्राँझ). ज्युनिअर – आयवाना फर्नांडिस (सुवर्ण), संग्राम हरपाळे (रौप्य), हिंदवी कवडे (ब्राँझ). चिल्ड्रेन १ – पार्वती धर्माधिकारी (सुवर्ण), सई शेलार (रौप्य), श्रावणी गायकवाड (ब्राँझ). चिल्ड्रेन २ – अलंक्रीता राजपुरोहित (सुवर्ण), स्वयंम संचेती (रौप्य).

 

बॉल अँड बकेट : ज्युनिअर – पार्थ सोलत (सुवर्ण). चिल्ड्रेन १ – स्वराज राजे (सुवर्ण), श्रावणी गायकवाड (रौप्य), ऋतुराज काळे (ब्राँझ). चिल्ड्रेन २ – स्वयंम संचेती (सुवर्ण), अलंक्रीता राजपुरोहित (रौप्य)

*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments