Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedइप्का'चे 'एपिक' अॅप सादर 'एआय'च्या मदतीने 'डायबेटिक फूट अल्सर' व्यवस्थापनाला नवी दिशा

इप्का’चे ‘एपिक’ अॅप सादर ‘एआय’च्या मदतीने ‘डायबेटिक फूट अल्सर’ व्यवस्थापनाला नवी दिशा

पुणे : ‘इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड’ने पुण्यात आयोजित १०व्या आंतरराष्ट्रीय मधुमेह परिषदेत शुक्रवारी (१३ मार्च) ‘डायबेटिक फूट अल्सर’ व्यवस्थापनासाठी ‘एपिक’ नामक ‘एआय’ आधारित मोबाइल अॅप्लिकेशन सादर केले.

 

देशातील अग्रगण्य फार्मा कंपनी म्हणून, ‘इप्का’चा हा नवीन प्लॅटफॉर्म डॉक्टर आणि ‘रिअल-टाइम’ तंत्रज्ञानाला एकत्र आणून कॅन्सर आणि मधुमेहाच्या गुंतागुंतीच्या उपचारांमधील महत्त्वाची दरी भरून काढण्याचे काम करतो. ‘एपिक’ अॅप रुग्ण आणि डॉक्टर दोघांसाठीही एक महत्त्वाचे साधन ठरेल. याद्वारे रुग्ण जखमेचे उच्च-गुणवत्तेचे फोटो अपलोड करू शकतील. त्यामुळे जखमेची तीव्रता आणि प्रगती अचूकपणे तपासणे डॉक्टरांना शक्य होईल.

 

‘एपिक’ची मुख्य उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये

 

– ‘रिअल-टाइम मॉनिटरिंग’ रुग्ण घरबसल्या जखमेच्या बऱ्या होण्याच्या प्रक्रियेचा मागोवा घेऊ शकतील. त्यामुळे वेळेवर उपचार करणे सोपे होईल.

 

‘अॅम्पुटेशन’ला (अवयव काढणे) प्रतिबंध या प्लॅटफॉर्मचे मुख्य ध्येय जखमेच्या तीव्रतेचे आगाऊ मूल्यांकन करून मधुमेहामुळे होणारा पाय गमावण्याचा धोका कमी करणे हा आहे.

 

– जागतिक एकात्मता : हे अॅप स्थानिक रुग्ण आणि जागतिक दर्जाच्या ‘पोडियाट्री’ (पायांचे उपचार) मानकांमधील अंतर कमी करते.

 

या विशेष सादरीकरणामुळे डिजिटल आरोग्य क्षेत्रातील उदयोन्मुख प्रगतीबद्दल सखोल माहिती मिळते आणि नामवंत वैद्यकीय तज्ज्ञः तसेच संशोधकांशी संवाद साधण्याची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे.

 

‘इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड’बाबत

 

‘इप्का’ ही पूर्णतः एकात्मिक फार्मा कंपनी असून, विविध उपचार विभागांमध्ये ती अग्रस्थानी आहे. जागतिक स्तरावर उच्च दर्जाचे आणि नावीन्यपूर्ण डिजिटल आरोग्य उपाय प्रदान करण्यासाठी कंपनी वचनबद्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments