Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedगॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाईप लाईनने पुरवठा करा. -संदीप खर्डेकर

गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पाईप लाईनने पुरवठा करा. -संदीप खर्डेकर

 

पुणे   गॅस टंचाई च्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक ठिकाणी त्वरित गॅस पाईपलाईन ने पुरवठा उपलब्ध करणेबाबत…. आणि त्यासाठी पुणे मनपा पथ विभाग व वाहतूक पोलीसांकडून खोदाईची त्वरित परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी महाराष्ट्र नॅचरल गॅसचे व्यावसायिक  वापर  विभागाचे व्यवस्थापक  श्री. प्रतीक जैन यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे

 

व्यवसायिक वापराच्या गॅस पुरवठ्यावर मर्यादा आल्या असून त्यामुळे अनेक ठिकाणी नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे.

अश्या परिस्थितीत एम एन जी एल ने पुरवठा सुरळीत ठेवण्याबाबत केलेली घोषणा ही दिलासादायक आहे याबद्दल आपले आभार.

पण याच सोबत काही अत्यावश्यक ठिकाणी व्यवसायिक वापरासाठी त्वरित गॅस पाईपलाईन द्वारे पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी करत आहे.

यात दोन प्रकार आहेत…

1) रुग्णालय असेल वा मनोरुग्णालय,शालेय विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण पुरविणारे बचत गट केंद्र असतील अथवा वृद्धाश्रम, अनाथाश्रम, दिव्यांग केंद्र…. अश्या ठिकाणी जर वर्गवारी करून व्यवसायिक अथवा घरगुती वापराची पाईपलाईन त्वरित उपलब्ध केल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

तसेच अश्या ठिकाणाबाबत त्वरित मनपा पथ विभाग व वाहतूक पोलीस विभागाशी चर्चा केल्यास खोदाई ची परवानगी ही त्वरित मिळेल व सर्वसामान्यांना दिलासा मिळेल.

2) दुसरं म्हणजे ज्या भागात यापूर्वीच आपल्या पाईपलाईन टाकून झाल्यात त्या भागात जे व्यवसायिक वापरासाठी च्या दराने खरेदी करण्यास तयार आहेत आणि जे आपल्या नियमात बसतात ( म्हणजे ज्यांच्याकडे विविध प्रकारचे फूड व इतर लायसन्स आहेत ते ) अश्यांना युद्ध पातळीवर कनेक्शन दिल्यास त्यांना दिलासा मिळू शकेल. उदाहरणार्थ म्हात्रे पुल ते राजाराम पुल या रस्त्यावर हार्वेस्ट क्लब पर्यंत आपली लाईन आहे, तेथून पुढे ज्या मंगल कार्यालयांना आवश्यकता आहे व जे आपल्या अटींची पूर्तता करतात अश्यांना त्वरित कनेक्शन मिळेल यासाठी जादा यंत्रणा लावून काम केल्यास ज्यांच्या घरात मंगल कार्य आहे व ज्यांनी 6/8 महिन्याआधी शुभकार्य ठरविले आहे अश्यांना दिलासा मिळू शकेल.

तसेच कोणकोणत्या भागात आपण त्वरित कनेक्शन देऊ शकतात याबाबत आपण निवेदन प्रसृत केल्यास त्यात्या भागातील नागरिक आपल्याशी संपर्क साधून कनेक्शन घेऊ शकतात व याद्वारे सध्याच्या गंभीर परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळू शकतो.

आपण योग्य कार्यवाही कराल असा विश्वास आहे असे या निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments