पुणे १५ मार्च २०२६ :
मिशन आर्थ्रायटिस इंडिया (माई ) तर्फे अस्थी व सांधे आरोग्य या विषयावर राष्ट्रीय रुग्ण परिषद , द पूना क्लब, कॅम्प, आयोजित करण्यात आली . या परिषदेत रुग्ण, त्यांचे पालक-कुटुंबीय (केअरगिव्हर्स) आणि डॉक्टर्स मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जागरूकता, शिक्षण आणि रुग्ण सक्षमीकरणासाठी हा दिवस समर्पित करण्यात आला होता.
या परिषदेला प्रमुख पाहुण्या म्हणून एंडोक्रायनोलॉजिस्ट डॉ. वैशाली देशमुख उपस्थित होत्या. त्यांनी सांधेदुखी आणि संबंधित विकार टाळण्यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य तसेच योग्य जीवनशैली आणि नियंत्रित वजन व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. या परिषदेत तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्यानेही झाली. यामध्ये ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. नचिकेत कुलकर्णी, सीआरडी चे संचालक व मुख्य ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट डॉ. अरविंद चोप्रा, टिळक आयुर्वेद महाविद्यालयातील द्रव्यगुण विभागप्रमुख व प्राध्यापक डॉ. अपूर्वा एम. संगोराम आणि माईर्स च्या फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. रवींदर कौर यांचा समावेश होता.
माई च्या अध्यक्षा दीपा मेहता यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती देत संधिवातग्रस्त रुग्णांना मदत करण्यासाठी संस्थेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
माई च्या सचिव श्रीमती श्वेता कुलकर्णी यांनी स्वागतपर भाषण केले. त्यानंतर माई स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
तज्ज्ञांच्या व्याख्यानांमध्ये अस्थी व सांधे आरोग्य, निरोगी सांध्यांसाठी योग्य शरीरबांधा व एर्गोनॉमिक्स, तसेच संधिवात नियंत्रणासाठी पारंपरिक भारतीय आहार व पोषण यांचे महत्त्व या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमातील विशेष आकर्षण म्हणजे तीन प्रतिष्ठित पुरस्कारांचे वितरण. स्व. श्री. पी. सी. नहार ऑरेशन पुरस्कार डॉ. नचिकेत कुलकर्णी यांना, स्व. श्री. हरिभाऊ राठीजी वात विरुद्ध योद्धा पुरस्कार श्रीमती राणी परसनीस यांना, तर सीआरडी वात विरुद्ध पुरस्कार श्री. अरविंद जगताप यांना प्रदान करण्यात आला.
यानंतर आयोजित ओपन फोरम सत्रात रुग्णांनी डॉक्टरांशी थेट संवाद साधत आपले अनुभव मांडले आणि मार्गदर्शन घेत
ले.


