Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedआयएसबीएम मध्ये क्रेसेन्डो २६ चे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा अनोखा...

आयएसबीएम मध्ये क्रेसेन्डो २६ चे उद्घाटन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा अनोखा कार्यक्रम

 

 

पुणे , दि. १३ मार्च : विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्यातील कला गुणांना वाव देऊन त्यांच्यात सांस्कृतिक समज आणि आदर वाढवणे, संवाद कौशल्य सुधारणे, सहानुभूती, विविधतेत एकता, सहिष्णुता वाढवणे तसेच देशातील विविध राज्यांमधील परंपरा, संगीत, कला, लोकसंस्कृती यांची विद्यार्थांसाठी देवाण घेवाण व्हावी हा मुख्य उद्देश ठेऊन इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस अँड मीडिया यांच्या वतिने आयोजित तीन दिवसीय ‘क्रेसेन्डो २६ चे उदघाटन सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री उर्वशी परदेशी आणि लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून ओळखली जाणारी सिमरन खान यांच्या हस्ते करण्यात आले.

‘क्रेसेन्डो २६ च्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयएसबीएम कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद कुमार हे होते. एस. जयरामन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्टूडेंट कौन्सिल चे उपाध्यक्ष दर्शील लोढा हेही यावेळी उपस्थित होते.

या कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. हे विद्यार्थी आपल्या कला गुणांचे सादरीकरण करतील यामध्ये नृत्य, डान्स, गाणे, वेशभूषा, भाषा, पारंपरिक कला यांसारख्या विविध राज्यांतील बहुसांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असेल.

यावेळी डॉ. प्रमोद कुमार म्हणाले, क्रेसेन्डो हा कार्यक्रम संगीत, डान्स, विविध लोकपरंपरा अशा देशातील विविध जुन्या नव्या संस्कृतीचे आणि तरुणाईतील टॅलेन्ट यांचा उत्तम संगम आहे. विद्यार्थ्यांमधील आंतरीक कला गुणांना वाव देणारा आणि विद्यार्थ्यांमध्ये निकोप सहिष्णुता जोडणारा हा प्लॅटफॉर्म आहे. या कार्यक्रमाचे आयोजन आयएसबीएम मधील स्टूडेंट कौन्सिल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनीच विद्यार्थांसाठी केले आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments