Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedबनावट आरटीओ वेबसाईट व लिंकपासून सावध राहा*

बनावट आरटीओ वेबसाईट व लिंकपासून सावध राहा*

 

 

पुणे, दि. 16(जि.मा.का.): ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी व ई-चलन सेवांशी संबंधित बनावट वेबसाईट, मोबाईल अॅप्स व SMS/WhatsApp द्वारे पाठविल्या जाणाऱ्या खोट्या लिंकद्वारे नागरिकांची आर्थिक व वैयक्तिक माहितीची फसवणूक होत असल्याचे परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.

 

नागरिकांनी केवळ परिवहन विभागाच्या अधिकृत “.gov.in” डोमेन असलेल्या संकेतस्थळांचा वापर करावा. तसेच WhatsApp द्वारे पाठविलेल्या पेमेंट लिंकवर व्यवहार करू नये व अनधिकृत APK अॅप्स डाउनलोड करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

संशयास्पद संदेश किंवा लिंक मिळाल्यास सायबर हेल्पलाइन १९३०, www.cybercrime.gov.in⁠ किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी, असे परिवहन विभागाने कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments