पुण्यातील प्रतिष्ठित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा नव्या पिढीतील कलाकारांना प्रेरणा देत राहिली
• उत्कृष्ट रंगमंचीय प्रतिभेचा गौरव करण्यासाठी काइनेटिककडून काइनेटिक DX+ इलेक्ट्रिक स्कूटरचे पारितोषिक
पुणे, १७ मार्च २०२६: पुण्यातील समृद्ध सांस्कृतिक परंपरेला अधोरेखित करणारी फिरोदिया करंडक ही आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. यंदाच्या वर्षी या स्पर्धेत एमआयटी अकॅडमी आँफ इंजिनिअरिंग, आळंदी कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘सिनेमा कॅमेरा’ या नाटकाने बाजी मारली. त्यांचा “लेजेंडरी परफॉर्मर ऑफ द इयर” पुरस्काराने गौरव करण्यात आला. तसेच त्यांना कायनेटिक डीएक्स प्लस ही नवी कोरी गाडी भेट देण्यात आली. हा पुरस्कार डॉ. जयश्री अरुण फिरोदिया यांच्या हस्ते देण्यात आला.
या वेळी अभिनेता आणि दिग्दर्शक प्रविण तरडे, अभिनेता व लेखक सुबोध भावे आणि पार्श्वगायक महेश काळे हेही उपस्थित होते. यंदाच्या वर्षी या स्पर्धेला अनुपम खेर, संजय लीला भन्साळी, सुभाष घई, नाना पाटेकर आणि आशुतोष गोवारीकर यांसारख्या दिग्गज व्यक्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..
पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फिरोदिया करंडकमध्ये विविध महाविद्यालयांतील संघ सहभागी होतात. या संघांकडून नाट्य, संगीत, नृत्य, दृश्यकला आणि मल्टिमीडिया यांसारख्या विविध कला प्रकारांचा समन्वय साधत भव्य रंगमंचीय सादरीकरण केले जाते. यंदाच्या वर्षी एमआयटीएओईसह, सीओईपी, एमआयटी वर्ल्ड पीस यूनिव्हर्सिटी, विश्वकर्मा इंस्टिट्यूट आँफ टेक्नाँलाँजी, भारती विद्यापीठ, कमिन्स काँलेज आँफ इंजिनिअरिंग, सिंम्बायोसिस, माँर्डन काँलेज आणि फर्ग्युसन काँलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
या प्रसंगी काइनेटिक ग्रुपचे व्हाइस चेअरमन अजिंक्य फिरोदिया म्हणाले, “फिरोदिया करंडकाची सुरुवात माझ्या आजींनी केली होती आणि आज ही स्पर्धा पुण्यातील सर्वात प्रतिष्ठित सांस्कृतिक व्यासपीठांपैकी एक बनली आहे. अनेक पिढ्यांतील कलाकारांना या मंचाने घडवले आहे. दरवर्षी येथे दिसणारी ऊर्जा, कल्पकता आणि समर्पण खरोखरच प्रेरणादायी असते. ‘लेजेंडरी परफॉर्मर ऑफ द इयर’ या पुरस्काराच्या माध्यमातून आम्हाला उत्कृष्ट वैयक्तिक प्रतिभेचा गौरव करण्याचा आणि भारताच्या सर्जनशील भविष्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तरुण कलाकारांचा सन्मान करण्याचा अभिमान वाटतो.”
काइनेटिक ग्रुप विषयी
काइनेटिक ग्रुप हा भारतातील सर्वात प्रतिष्ठित मोबिलिटी अग्रदूतांपैकी एक आहे. पाच दशकांहून अधिक वारसा असलेल्या या समूहाने काइनेटिक होंडा आणि काइनेटिक DX यांसारख्या महत्त्वपूर्ण उत्पादनांद्वारे शहरी वाहतुकीत मोठा बदल घडवून आणला. आजही हा समूह नवकल्पना करत पुढे जात असताना समाजाशी आणि सांस्कृतिक उपक्रमांशी
असलेले नाते जपून ठेवत आहे.


