Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवा बजेट फ्रेंडली सॅमसंग गॅलेक्सी एम १७ ई ५ जी दाखल.

नवा बजेट फ्रेंडली सॅमसंग गॅलेक्सी एम १७ ई ५ जी दाखल.

 

पुणे, मार्च १८, २०२६ – सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍स ब्रँडने आज गॅलेक्‍सी एम१७ई ५जी च्‍या लाँचची घोषणा केली. हा स्‍मार्टफोन विक्रीसाठी २० मार्चपासून सॅमसंगच्या संकेतस्थळावर, अॅमेझॉन आणि निवडक रिटेल आऊटलेट्समध्‍ये उपलब्‍ध असेल. या स्‍मार्टफोनची किंमत १३,९९९ रूपयांपासून सुरू होते.

या स्‍मार्टफोनमध्‍ये प्रमुख स्‍मार्टफोन वैशिष्‍ट्यांमधील विश्वसनीय कार्यक्षमता व दैनंदिन उपयुक्‍ततेसह सुलभ डिस्‍प्‍ले, दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी, कार्यक्षम परफॉर्मन्‍स, क्षमतापूर्ण कॅमेरे व इंटेलिजण्‍ट सॉफ्टवेअर आहे. ज्‍यामुळे भारतातील तरूण ग्राहकांच्‍या गतीशील गरजांची पूर्तता होते.

”गॅलेक्‍सी एम१७ई ५जी नाविन्‍यता व अनुभव देतो. जनरेशन झेडच्या दृष्टीकोनातून या नव्या स्मार्टफोनचे डिझाईन करण्यात आले आहे. त्यात प्रामुख्याने दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी, सुलभ अॅप परफॉर्मन्‍स, उच्‍च दर्जाची फोटोग्राफी आणि उत्‍पादकता वाढवणारी सर्वोत्तम वैशिष्‍ट्ये असलेल्‍या डिवाईसेसचा समावेश आहे.’ असे सॅमसंग इंडियाच्‍या एमएक्‍स बिझनेसचे डायरेक्‍टर अक्षय एस. राव यांनी सांगितले.

गॅलेक्‍सी एम१७ई ५जी मध्‍ये ६.७-इंच स्क्रिनसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे, ज्‍यामधून प्रत्‍येक स्‍क्रॉल, स्‍वाइप व टॅप प्रभावीपणे सुलभ होण्‍याची खात्री मिळते. आवडते ओटीटी कन्‍टेन्‍ट पाहायचे असो किंवा सोशल मीडिया ब्राऊज करायचे असो डिस्‍प्‍ले अचूक रंगसंगती व शार्प सुस्‍पष्‍टततेसह व्हिज्‍युअल्‍स देते.

रंग

वाइब व्‍होयोलेट व बिल्‍ट्झ ब्‍ल्‍यू रंगांमध्‍ये उपलब्‍ध असलेल्‍या गॅलेक्‍सी एम१७ई ५जी मध्‍ये लक्षवेधक आकर्षकता व कार्यक्षम डिझाइनचे संयोजन आहे. या स्‍मार्टफोनचे टिकाऊ ग्‍लास फायबर रिइन्‍फोर्स पॉलिमर (जीएफआरपी) बॅक व प्रबळ रचना, धूळ व पाण्‍यापासून संरक्षणासाठी प्रमाणन यामुळे हा स्‍मार्टफोन सक्रिय जीवनशैली असलेल्‍या तरूण वापरकर्त्‍यांसाठी विश्वसनीय सोबती आहे. या स्‍मार्टफोनमधील एर्गोनॉमिक ८.२ मिमी स्लिम प्रोफाइल हातामध्‍ये आरामदायी पकडची खात्री देते.

बॅटरी

गॅलेक्‍सी एम१७ई ५जी तुमच्‍या जीवनशैलीला कार्यरत ठेवण्‍यासाठी शक्तिशाली ६००० एमएएच बॅटरीसह येतो. अधिक कॅज्‍युअल गेमिंग सत्रांपासून मॅरेथॉन्‍स पाहण्‍याचा मनसोक्‍त आनंद व दीर्घकाळापर्यंत व्हिडिओ कॉल्‍सपर्यंत ही बॅटरी स्‍मार्टफोनला दिवसभर कार्यरत ठेवते, ज्‍यामधून विनाव्‍यत्‍यय उत्‍पादकता व मनोरंजनाचा आनंद घेता येतो. वन यूआय ८ द्वारे ऑप्टिमाइज करण्‍यात आलेला गॅलेक्‍सी एम१७ई ५जी सर्वोत्तमपणे ऊर्जा वापराचे व्‍यवस्‍थापन करतो, ज्‍यामुळे डिवाईस दिवसभर कार्यरत राहण्‍याची खात्री मिळते.

 

 

मल्टिमिडिया

गॅलेक्‍सी एम१७ई ५जी विनासायास मल्‍टीटास्किंग व स्थिर कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍याचे श्रेय त्‍यामधील मीडियाटेक डायमेन्सिटी ६३०० ५जी प्रोसेसरला जाते. स्ट्रिमिंग, गेमिंगचा आनंद घ्‍यायचा असो किंवा अॅप्‍समधून नेव्हिगेट करायचे असो एकीकृत एआरएम माली-जी५७ जीपीयू बॅटरी क्षमतेबाबत तडजोड न करता सहपजणे मल्‍टीमीडिया प्‍लेबॅकची खात्री देते.

कॅमेरा

५० मेगापिक्‍सल मेन कॅमेऱ्यासह प्रत्‍येक क्षणाला परिपूर्णपणे व सुस्‍पष्‍टपणे कॅप्‍चर करता येते. हा कॅमेरा कोणत्‍याही प्रकाशात आकर्षक व सुस्‍पष्‍ट फोटो कॅप्‍चर करतो. डेप्‍थ कॅमेरासह हा कॅमेरा प्रोफेशनल-ग्रेड फोकसच्‍या माध्‍यमातून आकर्षक पोर्ट्रेट्स तयार करतो. ८ मेगापिक्‍सल फ्रण्‍ट कॅमेरा सोशल मीडियासाठी आकर्षक सेल्‍फीज कॅप्‍चर होण्‍याची आणि काम किंवा कुटुंबासोबत कनेक्‍ट होण्‍याकरिता सुस्‍पष्‍ट व्हिडिओ कॉल्‍सची खात्री देतो.

सॅमसंगच्‍या अँडॉईड १६ वरील वन यूआय ८.० ची शक्‍ती असलेला गॅलेक्‍सी एम१७ई ५जी दैनंदिन परस्‍परंसवाद सुलभ करतो. सर्वोत्तम अॅप व्‍यवस्‍थापनासाठी लार्ज फोल्‍डर्स आणि रिअल-टाइम अपडेट्ससाठी नाऊ बार यासारख्‍या वैशिष्‍ट्यांमुळे मल्‍टीटास्किंग आता अधिक सोपे झाले आहे. इंटीग्रेटेड गुगल जेमिनी एआय आणि सर्कल टू सर्च ही वैशिष्‍ट्ये मजकूर निर्मितीपासून सहाय्यतेचे नियोजन करण्‍यापर्यंत सर्वोत्तम क्षमता देतात.

किंमत

उत्‍पादन

व्हेरिएण्‍ट्स

एमओपी

गॅलेक्‍सी एम१७ई ५जी

४ जीबी + १२८ जीबी

१३,९९९ रूपये

६ जीबी + १२८ जीबी

१५,४९९ रूपये

 

 

गॅलेक्‍सी एम१७ई ५जी ४/१२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १३,९९९ रूपयांपासून आणि ६/१२८ जीबी व्‍हेरिएण्‍टसाठी १५,४९९ रूपयांपासून उपलब्‍ध असेल

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments