Tuesday, October 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedजगभरात सर्वोत्कृष्ट स्मार्ट रिंग कंपनी म्हणून ओळखल्या जाणारा औउराची (ŌURA) रिंग आता...

जगभरात सर्वोत्कृष्ट स्मार्ट रिंग कंपनी म्हणून ओळखल्या जाणारा औउराची (ŌURA) रिंग आता भारतातही उपलब्ध होणार ! भारतीयांच्या बिघडत्या झोपेच्या सवयींबाबत अहवालाच्या माध्यमातून धक्कादायक खुलासे!

भारतीय बाजारपेठेत प्रवेश करतानाच औउराने (ŌURA) भारतातील ग्राहकांच्या झोपेच्या सवयींबाबत अहवाल सादर केला आहे. चुकीच्या झोपेच्या सवयीमुळे भारतीयांच्या डोळ्यांच्या बुबुळ्याच्या जलदरित्या होणा-या हालचाली मंदावत असून, त्यांची गाढ झोप कमी होत असल्याचे दिसून आले आहे.

 

 

 

१८ मार्च, २०२६, मुंबई – औउरा (ŌURA) या जगभरात सर्वात विश्वसनीय स्मार्ट रिंगची निर्मिती करणा-या कंपनीने आज अधिकृतरित्या भारतीय बाजारपेठेत प्रवेश केल्याची घोषणा केली. तंत्रज्ञानाची आवड असलेल्या भारतीय ग्राहकांसाठी आता औउरा रिंग ४ खरेदी करता येईल. क्रोमा आणि ॲमेझॉनवर ही रिंग खरेदीसाठी उपलब्ध असेल. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानावर आधारित आरोग्यविषयक अचूक माहिती देणारी ही स्मार्ट रिंग दैनंदिन वापरासाठी योग्य ठरते. या रिंगची रचनाही दैनंदिन वापराच्या अनुषंगाने सुटसुटीत पद्धतीने करण्यात आली आहे. ही स्मार्ट रिंग तंत्रज्ञानस्नेही भारतीय ग्राहकांसाठी तयार करण्यात आली आहे.

 

 

 

याचसोबत औउरा (ŌURA) कंपनीने ‘इंडिया:द स्टेट ऑफ स्लीप २०२६’ हा अहवालदेखील प्रसिद्ध केला. या अहवालात औउरा (ŌURA) स्मार्ट रिंग वापरणा-या भारतीय ग्राहकांची माहिती देण्यात आली आहे. या अहवालात ग्राहकांच्या झोपेच्या सवयी, पद्धती यांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.

 

 

 

‘इंडिया:द स्टेट ऑफ स्लीप २०२६’ अहवालाबद्दल औउरा (ŌURA) कंपनीचे प्रमुख मार्केटिंग अधिकारी डग स्विनी यांनी तपशीलवार माहिती दिली. ते म्हणाले,” भारतीयांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवण्यासाठी औउरा (ŌURA) सर्वतोपरी उपयुक्त ठरते, हे समजावण्यासाठी आम्ही हा अहवाल तयार केला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार, पुरेशी झोप हा उत्तम आरोग्यासाठी आवश्यक ठरते याकडे लक्ष वेधते. भारतीयांची व्यस्त आणि वेगवान जीवनशैली अपु-या झोपेला कारणीभूत आहे. औउरा (ŌURA) रिंगचा वापर केल्याने ही रिंग ग्राहकांना त्यांच्या आरोग्याबाबत जागरुक करते, काळानुरुप सकारात्मक जीवनशैलीचे अवलंबन करण्यास मदत करते. आम्ही भारतात औउरा(ŌURA)ची सेवा उपलब्ध करुन देत आहोत. भारत हा देश प्रत्येक क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या देशातील ग्राहकांना औउरा(ŌURA)ची सेवा उपलब्ध करुन देताना आम्ही खूप आनंदी आहोत.”

 

 

 

भारतीयांच्या झोपेच्या सवयी: अपुरी विश्रांतीमुळे होणारे आरोग्यावरील दुष्परिणाम

 

 

 

औउरा(ŌURA)च्या अहवालात, भारतीय ग्राहकांचा जगभरातील ग्राहकांच्या झोपेच्या सवयींशी तुलना करण्यात आली. यातील आकडेवारीनुसार, भारताचा सर्वात कमी झोप घेणा-या देशांच्या यादीत समावेश होतो. भारतीय ग्राहक दररोज रात्री पुरेशी झोप घेत नाहीत, या ग्राहकांची झोप केवळ ६ तास २८ मिनिटांपुरती मर्यादित असते, हे तास सर्वाधिक झोप घेणा-या देशांतील नागरिकांच्या झोपेच्या तासांशी तुलनात्मक पातळीवर ४० मिनीटांनी कमी असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

 

प्रत्येक प्रौढ व्यक्तीने निरोगी आरोग्यासाठी किमान ७ ते ९ तासांची झोप घेणे आवश्यक असते. मात्र बहुतांश भारतीयांना पुरेशी झोप मिळत नाही. व्यवसायाच्या मागणीनुसार, विविध देशांतील वेळापत्रकानुसार चालणा-या कामाच्या पद्धती, रात्री होणा-या भेटीगाठी, सतत ऑनलाईन माध्यमांवर सक्रिय राहण्याच्या सवयी यांमुळे भारतीयांना ७ ते ९ तासांची झोप मिळत नाही.

 

 

 

चुकीच्या जीवनशैलीमुळे झोपेच्या कार्यात बिघाड होतो. याचा थेट परिणाम डोळ्यांतील बाहुल्यांच्या हालचालींवर होत असून या हलचाली आता मंदावू लागल्या आहेत. भारतीय गाढ झोपेपासूनही दूरावत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. जागतिक पातळीवर इतर देशांच्या तुलनेत, भारतीयांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांची जलद हालचाल दर आठवड्याला कमी होऊ लागली आहे. ही हालचाल प्रत्येक आठवड्याला एका तासापेक्षा जास्त पटीने कमी होत आहे. डोळ्याच्या बाहुल्यांची जलद हालचाल ही नैसर्गिक प्रक्रिया असून, मानवी भावनांचे संतुलन राखण्यास मदत करते. या हालचाली नैसर्गिक प्रक्रियेनुसार जलद घडल्यास माणसाची स्मरणशक्ती सुधारते. निर्णयक्षमता वृद्धिंगत होते. झोपेच्या कमतरतेमुळे बहुतांश भारतीयांना सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही. मरगळलेल्या अवस्थेतच त्यांची सकाळची सुरुवात होते.

 

 

 

रात्री उशिरापर्यंत जागणे, सकाळी झोपा काढण्याच्यी सवयी वाढल्या

 

 

 

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे –

 

 

 

रात्री उशिरापर्यंत जागणे: भारतातील तब्बल ५९ टक्के औउरा (ŌURA) ग्राहक रात्री उशिरापर्यंत जागरण करतात. जागतिक स्तरावर ही टक्केवारी इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. अनेकांना रात्री उशिपर्यंत जागे राहायला आवडते. या प्रहारात अनेकजण करणेही पसंत करत असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

रात्री उशिरा झोपून सकाळी लवकर उठणे: अनेकजण रात्री १२ वाजून १४ मिनिटांनी झोपायला प्राधान्यत देतात. ही वेळ आता जगभरातील अनेकजण पाळतात. जगभरातील माणसांप्रमाणेच भारतीयही सकाळी ७ वाजून ४३ मिनिटांनी उठतात. उशिरा झोपून आणि त्या तुलनेत सकाळी लवकर उठल्याने भारतीयांच्या झोपेच्या वेळेला मर्यादा येत आहे.

कन्सिन्सन्स स्लीपर्स: अहवालानुसार काही लोकांमध्ये झोपेची वेळ कामाच्या दिवसांपासून ते सुट्टीच्या दिवसाच्या वेळापत्रकातही जवळपास समानच राहते. या लोकांना ‘कन्सिस्टंट स्पीपर्स’ असे म्हटले जाते. ही माणसे दररोज एकाच वेळी झोपतात आणि उठतात. अशा नियमित झोपेच्या सवयीमुळे कालांतराने झोपेची गुणवत्ता चांगली होते. झोपेची वेळ स्थिर राहण्यात मदत होते.

दिवसा झोप घेणे: या अहवालात औउराचे (ŌURA) सदस्य दिवसभरात काही वेळेची विश्रांती घेत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले. दिवसा काही काळासाठी झोप घेतल्याल त्याला ‘पॉवर नॅप’ असे संबोधले जाते. जागतिक स्तरावर भारतीय सदस्य दिवसा सरासरी ५३ मिनिटांची सर्वात जास्त वेळ चालणारी डुलकी घेतात. इतर देशांच्या तुलनेत हा सर्वाधिक पॉवर नॅपचा कालावधी असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक भारतीय आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी डुलकी घेण्यास पसंती दर्शवतात. लांबचा प्रवास, आंतरराष्ट्रीय वेळापत्रकानुसार कामाचे तास आणि व्यस्त जीवनशैलीमुळे आठवड्याची सुरुवात पुरेशा उर्जेने करण्यासाठी दिवसभरातील छोटी विश्रांतीही महत्त्वाची असल्याचे या अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.

 

 

औउरा रिंग ४ बदद्ल माहिती –

 

 

 

औउरा रिंग हे अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेले स्मार्ट रिंग आहे. हे रिंग दैनंदिन वापरासाठी खास तयार करण्यात आले आहे. या रिंगच्या वापराने आरोग्य आणि वेलनेस संबंधित तब्बल ५० हून अधिक विषयासंदर्भात माहिती मिळते. औउरा (ŌURA) एप्लिकेशनमध्ये ही माहिती अगदी सोप्या भाषेत वाचता येते. औउरा रिंग ४ हे औउरा स्मार्ट सेंन्सिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे. यात अत्याधुनिक अल्गोरिदम आणि संशोधनासाठी वापरल्या जाणा-या उच्च-दर्ज्याच्या सेन्सरचा वापर केला जातो. हे रिंग प्रत्येक व्यक्तीच्या बोटाच्या आकारानुसार, त्वचेच्या रंगानुसार आणि इतर बदलांनुसार जुळवून घेते. या रिंगमधील मल्टी-वेव्हलेंथ सेंन्सिंग प्रणाली आणि १८ सिग्नल पाथवेच्या मदतीने शरीरातील संकेत अचूकरित्या नोंदवले जातात. या विश्वासार्हतेमुळे वापरकर्त्यांना वैयक्तिकपातळीवर आरोग्यविषयक अचूक माहिती मिळते.

 

औउरा रिंगची निर्मिती हलक्या टायटॅनियमपासून करण्यात आली आहे. रिंगच्या आतल्या बाजूला सेन्सर्स बसवण्यात आले आहेत. या सुविधेमुळे दिवसा आणि रात्रीही ही रिंग वापरता येते. झोपेतही या रिंगच्या माध्यमातून संबंधित व्यक्तीच्या आरोग्याची माहिती घेण्याची प्रक्रिया सुरुच राहते. ही रिंग बारा वेगवेगळ्या आकारात उपलब्ध असून, ४ ते १५ या आकारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. स्मार्ट रिंगमध्ये ही सर्वाधिक रेंज मानली जाते. परफॉर्मन्स आणि आकर्षक मिनिमल डिझाइनचा उत्तम संगम असलेले हे रिंग ब्लॅक,सिल्वर, स्टेल्थ, ब्रश्ड सिल्व्हर, गोल्ड आणि रोझ गोल्ड अशा सहा आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.

 

 

 

औउरा रिंग ४ भारतातही खरेदी करता येणार

 

 

 

१८ मार्चपासून औउरा रिंग ४ची खरेदी करता येईल. देशभरातील १०० हून अधिक क्रोमा स्टोअर्समध्ये आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर औउरा रिंग ४ खरेदीसाठी उपलब्ध असेल. याव्यतिरक्त, हे अत्याधुनिक स्मार्ट रिंग अमेझॉनवरही ऑनलाईन खरेदीच्या माध्यमातून विकत घेता येईल.

 

 

 

औउरा रिंग४चा विक्री दर –

 

 

 

सिल्व्हर एण्ड ब्लॅक – २८ हजार ९०० रुपये

स्टेल्थ, ब्रश्ड सिल्व्हर, गोल्ड आणि रोझ गोल्ड – ३९ हजार ९०० रुपये

सदस्यांसाठी :

 

प्रति महिना ५९९ रुपये

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments