मुंबई, 19 मार्च 2026: आशियातील पहिली सूचीबद्ध डिपॉझिटरी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (“सीडीएसएल”) ने केपीएमजी इन इंडिया यांच्या सहकार्याने, “रिइमॅजिन: सिक्युरिटीज मार्केट थ्रू डेटा सीनर्जी या शीर्षकाच्या त्यांच्या रिइमॅजिन थॉट लीडरशिप अहवालाची तिसरी आवृत्ती प्रकाशित केली आहे. यावर्षी पूर्वी आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या वार्षिक रिइमॅजिन परिसंवादानंतर सादर करण्यात आला आहे. या अहवालात भारताच्या सिक्युरिटीज मार्केट परिसंस्थेमध्ये डेटा-आधारित परिवर्तनासाठी मार्गदर्शन करणारी क्रिएशन कंट्रोल – कल्चर (3C) चौकट प्रस्तावित करण्यात आली आहे.
अहवालात डेटा जोखीम ही बाजार जोखीम हे अधोरेखित करण्यात आले असून संरचित डेटा गव्हर्नन्स दृष्टिकोन भारताच्या सिक्युरिटीज मार्केट परिसंस्थेमध्ये स्थैर्य, पारदर्शकता आणि नाविन्यपूर्णता कसा वाढवू शकतो याचे विवेचन केले आहे. यात 3C फ्रेमवर्कचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे मार्केट संस्था सामायिक डेटा पायाभूत सुविधा उभारू शकतात, मजबूत प्रशासन आणि सायबर संरक्षण समाविष्ट करू शकतात आणि संपूर्ण परिसंस्थेमध्ये जबाबदार डेटा पद्धती विकसित करू शकतात. अहवालात मार्केट संस्थांमध्ये केंद्रीय नियामक ऑपरेटिंग मॉडेलची संकल्पना देखील मांडण्यात आली आहे. त्यामुळे नियामक अपेक्षांचे संरेखन, मार्केट सहभागी संस्थांमधील इंटरऑपरेबिलिटीमध्ये सुधारणा आणि वाढत्या डेटा-आधारित मार्केटमध्ये अधिक प्रभावी जोखीम व्यवस्थापन व गुंतवणूकदार संरक्षण शक्य होईल.
सीडीएसएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नेहल व्होरा म्हणाले: “विश्वास अधिक मजबूत करत नाविन्यपूर्णतेला सक्षम करताना डेटा सीनर्जी ही निर्मिती, नियंत्रण आणि संस्कृती यांना एकत्र आणणारी शक्ती आहे. जेव्हा डेटा बुद्धिमान आणि इंटरऑपरेबल बनतो तेव्हा तो रचनात्मकदृष्ट्या स्थिर आणि मूलभूत पातळीवर विश्वास-आधारित मार्केट सक्षम करतो. अशा प्रकारची परिसंस्था मग केवळ व्यवहार सुलभ करण्यापलीकडे जाते. ती आत्मनिर्भर गुंतवणूकदाराला सक्षम करते आणि भारताच्या खऱ्या अर्थाने विकसीत भारतच्या प्रवासाला पाठिंबा देते.”
भारताचे सिक्युरिटीज मार्केट गुंतवणूकदारांच्या सहभागात जलद विस्तार अनुभवत आहे. सध्या घरागणिक सहभाग सुमारे 20% इतका असला तरी युनायटेड स्टेट्स सारख्या अधिक विकसित बाजारांच्या तुलनेत भविष्यातील वाढीसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. वाढता गुंतवणूकदार आधार देशभर आर्थिक समावेशन अधिक सखोल करण्यासाठी आणि गुंतवणूकदार जागरूकता बळकट करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण संधी निर्माण करत आहे.
याशिवाय, अहवालात चार प्रमुख संधी क्षेत्र अधोरेखित केली आहेत जिथे डेटा इकोसिस्टममध्ये परिवर्तन घडवू शकतो: अधिक सक्षम किंमत शोध आणि निवडक उत्पादने, व्यापक स्तरावर वैयक्तिकृत गुंतवणूकदार अनुभव, सुधारित जोखीम विश्लेषण आणि आर्थिक फसवणूक प्रतिबंध आणि नियामक तंत्रज्ञान (RegTech) आणि सुपरवायझरी तंत्रज्ञान (SupTech) द्वारे अधिक लवचिक निगराणी.
अहवालाबद्दल भाष्य करताना केपीएमजी इन इंडियाच्या क्लायंट अँड मार्केट्सचे भागीदार आणि राष्ट्रीय पातळीवरील अग्रणी श्री. अखिलेश तुतेजा म्हणाले: “मानवी बुद्धिमत्तेने आधुनिक अर्थव्यवस्थांना चालना दिली आहे; पुढील विकासाचा टप्पा आपण या कुशल डेटाचा किती प्रभावीपणे उपयोग करतो यावर अवलंबून असेल. या अहवालात सुचविल्याप्रमाणे, डेटा जोखीम हीच बाजार जोखीम आहे. भारताने बाजारातील नेतृत्व आणि गुंतवणूकदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी डेटाला बाजारातील मुख्य पायाभूत सुविधा म्हणून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
प्रस्तावित 3C चौकट विश्वसनीय डेटा इकोसिस्टम उभारण्यासाठी सुसूत्र मार्ग दर्शवते:
• निर्मिती भारताच्या सामायिक उपयुक्तता साधने उभारण्याच्या क्षमतेचा गौरव करते. यामध्ये मार्केट डेटा डिक्शनरीज, मशीन-रीडेबल डिस्क्लोजर्स, सुरक्षित API पाइपलाइन्स आणि गोपनीयता जपणारी सिम्युलेशन वातावरण यांचा समावेश आहे. त्यामुळे संपूर्ण परिसंस्थेमध्ये संशोधन आणि उत्पादन नाविन्यपूर्णता यांना चालना मिळते.
• नियंत्रण स्मार्ट संरक्षण उपायांद्वारे प्रणालीला मजबूत करते. यामध्ये प्रायव्हसी-बाय-डिझाइन, स्टँडर्डाइज्ड लिनीएज, सायबर रेजिलियन्स प्रोग्राम्स (पोस्ट-क्वांटम रेडिनेस सहित) आणि जबाबदार एआय गव्हर्नन्स (इंडस्ट्री-वाइड एआय मॉडेल रजिस्ट्रीच्या दृष्टीकोनासह) यांचा समावेश आहे. हे नियंत्रण प्रगतीला शाश्वत आणि विश्वासार्ह बनवून गती देतात.
• कल्चर डेटा गुणवत्ता, स्पष्ट करून सांगण्याची क्षमता, प्रतिसाद क्षमता आणि गुंतवणूकदार परिणाम उंचावून परिवर्तनाला टिकाऊ बनवते; तसेच बहुभाषिक गुंतवणूकदार शिक्षणाचा विस्तार करून जागरूकतेला आत्मविश्वासपूर्ण सहभागात रूपांतरित करते.
अहवालात रिइमॅजिन: सिक्युरिटीज मार्केट थ्रू डेटा सीनर्जी या परिसंवादामधील माहितीचाही समावेश आहे. यामध्ये सेबीचे अध्यक्ष श्री. तुहिन कांता पांडे हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच सेबीचे पूर्णवेळ सदस्य श्री. संदीप प्रधान आणि एचडीएफसीचे माजी उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. केकी मिस्त्री हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. या परिसंवादामध्ये सिक्युरिटीज मार्केट, वित्तीय सेवा आणि तंत्रज्ञान इकोसिस्टममधील अग्रणी एकत्र आले होते. त्यामध्ये “डेटाज सुपरपॉवर – ड्रायव्हिंग इनोव्हेशन अॅट स्केल,” “डेटा इज कॅपिटल – ट्रस्ट इज द करन्सी” आणि “डेटा अॅज डीएनए – अ कल्चरल शिफ्ट” या विषयांवर चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले.
डेटा हा वित्तीय बाजारांचा कणा बनत असताना हा अहवाल नियामक, मार्केट पायाभूत सुविधा संस्था, मध्यस्थ आणि गुंतवणूकदार यांच्यात समन्वित कृतीची गरज अधोरेखित करतो. त्यायोगे भारताच्या विकसीत भारत या दृष्टिकोनाला पाठिंबा देणारी स्थिर आणि विश्वासार्ह डेटा इकोसिस्टम उभारता येईल.
लिंक:
https://www.cdslindia.com/Publications/Thought%20Leadership%20Reports.html


