Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedराणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणासाठी माजी सैनिकांची आवश्यकता*

राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षणासाठी माजी सैनिकांची आवश्यकता*

 

 

पुणे, दि. 20 (जिमाका, वृत्तसेवा): समग्र शिक्षा अभियानांतर्गत राज्यातील २१ हजार २७९ शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता ६ वी ते १२ वीतील मुलींसाठी ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत स्वसंरक्षण, जीवनकौशल्य, योगा, सैनिकी प्रशिक्षण व प्रेरणादायी व्याख्याने यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

सदर प्रशिक्षणाची अंमलबजावणी M/s. Indus Edutrain Private Limited यांच्यामार्फत करण्यात येत असून, राज्यातील शाळांमध्ये सैनिकी प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिकांची आवश्यकता आहे.

यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात नोंदणीकृत माजी सैनिकांची यादी संबंधित संस्थेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे आपली नोंद करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

अधिक माहितीसाठी प्रोजेक्ट मॅनेजर श्री. प्रफुल हिवाळे (मो. ८६५७४६८७९५) किंवा ईमेल bd.edu@indusecutrain.com वर संपर्क साधावा.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments