पुणे, दि. 20 (जिमाका, वृत्तसेवा): उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सोयीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड मार्फत मे. आयडीटीआर, कासारवाडी, पुणे येथे घेण्यात येणाऱ्या वाहन चालक चाचण्या आता सकाळी ७ वाजता सुरू करण्यात येणार आहेत.
तरी संबंधित नागरिकांनी याची नोंद घेऊन वाहन चालक चाचणीसाठी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी-चिंचवड यांनी केले आहे.
0000


