पुणे, दि. 20 (जिमाका, वृत्तसेवा): दिनांक २१ मार्च २०२६ रोजी रमजान ईद निमित्त शासकीय सुट्टी जाहीर असली तरी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे पक्क्या अनुज्ञप्ती (Driving Licence) चाचण्यांचे कामकाज सुरू राहणार आहे. यापूर्वीच अर्जदारांनी अपॉइंटमेंट (slot) बुक केलेले असल्यामुळे त्यांना गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
ज्या अर्जदारांना २१ मार्च रोजी उपस्थित राहणे शक्य नसेल, त्यांनी शासकीय सुट्टी वगळता दिनांक २३ मार्च ते ३० मार्च २०२६ दरम्यान कोणत्याही दिवशी कार्यालयीन वेळेत चाचणीसाठी उपस्थित राहावे. यासाठी नवीन अपॉइंटमेंट घेण्याची आवश्यकता नसून, पूर्वीची अपॉइंटमेंट ग्राह्य धरली जाणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे यांनी केले आहे.
000


