Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedहृदयामधील दुर्मिळ जन्मजात रक्तवाहिनीच्या विकारावर विश्वराज हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

हृदयामधील दुर्मिळ जन्मजात रक्तवाहिनीच्या विकारावर विश्वराज हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार

पुणे, २३ मार्च २०२६:

 

अवघ्या दीड वर्षाच्या एका मुलीच्या हृदयामधील दुर्मिळ जन्मजात रक्तवाहिनी संबंधीच्या विकारावर विश्वराज हॉस्पिटल, लोणी येथील डॉक्टरांच्या पथकाने ट्रान्सकॅथेटर डिव्हाईस क्लोजर ही प्रक्रिया यशस्वीरित्या केली. बाल हृदयविकार तज्ज्ञ डॉ. आशिष बनपूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही कमीत कमी छेद असलेली हृदयविकार प्रक्रिया करण्यात आली.

 

याबाबत अधिक माहिती देताना डॉ. आशिष बनपूरकर म्हणाले की, या मुलीच्या रक्तातील अमोनियाचे प्रमाण थोडे वाढल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करावे लागले व निरीक्षणाखाली ठेवले होते. हे प्रमाण सुरुवातीला औषधोपचारांनी नियंत्रित करण्यात आले. चालू तपासण्यांमध्ये या मुलीला अ‍ॅबर्नथी मालफॉर्मेशन ही दुर्मिळ स्थिती असल्याचे निदान केले. याला कॉजीनेंटल पोर्टोसिस्टिमिक शंट असे देखील म्हंटले जाते.एका सामान्य लहान मुलामध्ये पोटातील व आतड्यांमधील रक्त हे यकृताकडे पोर्टल व्हेन्सच्या मार्गातून जाते. हृदयात जाण्यापूर्वी येथे त्याचे शुद्धीकरण होते. मात्र याबाबतीत यकृताकडे न जाता पोर्टल व्हेन्स या असामान्यरित्या थेट वेना कावा या शरीरातील मोठ्या रक्तवाहिनीच्या मार्गातून थेट हृदयाशी जोडल्या गेल्या होत्या.

 

या स्थितीमुळे यकृतातील रक्तप्रवाह नीट विकसित झाला नव्हता आणि फुफ्फुसात उच्च रक्तदाब, असामान्य रक्ताभिसरण विकसित होण्याचा धोका होता. त्यामुळे ही असामान्य स्थिती दुरूस्त करणे आवश्यक होते.

 

“ही स्थिती अत्यंत दुर्मिळ असून, सुमारे प्रत्येक पन्नास हजार जन्मांपैकी एका मुलामध्ये आढळतो,” असे डॉ. बनपूरकर यांनी सांगितले. “वेळीच उपचार न केल्यास यामुळे यकृत, फुफ्फुसे आणि शरीराच्या चयापचय प्रक्रियेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.” असेही ते म्हणाले.

 

मुलीची शारीरिक स्थिती, रक्त तपासण्या आणि यकृताच्या कार्याचे बारकाईने परीक्षण केल्यानंतर डॉक्टरांनी कॅथेटरच्या मदतीने दोष दूर करण्याचा (ट्रान्सकॅथेटर डिव्हाईस क्लोजर) ही कमीत कमी छेद असलेली प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या प्रक्रियेदरम्यान डॉक्टरांनी रक्तवाहिनीतून कॅथेटर घालून शिरांमधील रक्ताचा दाब तसेच रक्तप्रवाहाच्या गतीचे अँजिओग्राफी द्वारे मोजमाप केले.

 

विशेष ऑक्लूजन डिव्हाइस बसवून रक्त जाण्याचा चुकीचा मार्ग बंद करण्यात आला. प्रक्रियेनंतरच्या इमेजिंग आणि सोनोग्राफीमध्ये उपकरण योग्य ठिकाणी बसवल्याचे आणि यकृताकडे रक्तप्रवाह पुन्हा सुरू झाल्याचे दिसून आले.

 

प्रक्रियेनंतर मुलीने चांगला प्रतिसाद दिला आणि तिला तीन दिवसांत रुग्णालयातून सुटी देण्यात आली. “आता रक्तप्रवाह सामान्य राहील अशी अपेक्षा आहे आणि ही प्रक्रिया कायमस्वरूपी उपाय मानली जाऊ शकेल, तसेच ही समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता अत्यंत कमी आहे,” असे डॉ. बनपूरकर यांनी सांगितले.

 

प्रक्रियेपूर्वी मुलीच्या यकृतातील सीरम अमोनियाची पातळी वाढली होती व अधूनमधून नाकातून रक्तस्राव होत होता. आता असामान्य जोडणी बंद झाल्यामुळे ही लक्षणे हळूहळू कमी होतील.

 

डॉ. बनपूरकर यांनी जन्मजात विकारांमध्ये लवकर निदान आणि नियमित पाठपुराव्याचे महत्त्व अधोरेखित केले. “ही मुलगी गर्भावस्थेपासून निरीक्षणाखाली असल्यामुळे आम्हाला योग्य वेळी उपचार करता आले आणि सुरक्षितपणे ही प्रक्रिया करता आली.”

 

या उपचारामध्ये हृदय भूलतज्ज्ञ डॉ. विठ्ठल शेंडगे, रेडिओलॉजिस्ट डॉ. सत्यजित फुंडे आणि कन्सल्टंट इंटेन्सिविस्ट व पेडियाट्रिशियन डॉ. चंद्रकांत सहारे यांचा

समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments