भारत – मार्च १०, २०२६ – पोको इंडियाने आज पोको C85x ५जीच्या लाँचची घोषणा केली. हा स्मार्टफोन दैनंदिन वापरकर्त्यांकरिता विश्वसनीय कार्यक्षमता, मोठा सर्वोत्तम डिस्प्ले आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारी बॅटरी देण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. विद्यार्थी, पहिल्यांदाच स्मार्टफोन खरेदी करणारे आणि विश्वसनीय दैनंदिन कार्यक्षमतेचा शोध घेत असलेले वापरकर्ते यांच्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या पोको C85x ५जीमध्ये कार्यक्षम हार्डवेअरसह व्यावहारिक वैशिष्ट्ये आणि दीर्घकालीन सॉफ्टवेअर सपोर्ट आहे.
दैनंदिन वापरासाठी विश्वसनीय कार्यक्षमता
पोको C85x ५जीमधील खास वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्षम ६एनएम प्रोसेसवर निर्माण करण्यात आलेले ऑक्टा-कोअर प्रोसेसर, जे परफॉर्मन्स व ऊर्जा कार्यक्षमतेमध्ये संतुलन राखण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. जवळपास २.२ गिगाहर्ट्झपर्यंतचे ए७८ परफॉर्मन्स कोअर्स आणि माली-जी५७ जीपीयूसह हा डिवाईस ब्राऊजिंग, सोशल मीडिया, स्ट्रीमिंग व कॅज्युअल गेमिंग अशा दैनंदिन टास्क्सना सहजपणे हाताळण्यास सक्षम आहे.
हा स्मार्टफोन ४ जीबी + ६४ जीबी आणि ४ जीबी + १२८ जीबी या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये जलद अॅप लोडिंग व सुलभ मल्टीटास्किंगसाठी एलपीडीडीआर४एक्स मेमरी व यूएफएस २.२ स्टोरेज आहे. वापरकर्ते स्टोरेज क्षमता जवळपास २ टीबीपर्यंत वाढवू शकतात, ज्यामुळे फोटो, व्हिडिओ, अॅप्स व फाइल्ससाठी व्यापक स्टोरेज मिळते.
शाओमी हायपरओएस ३ सह अँड्रॉईड १६ वर संचालित हा डिवाईस ४ वर्षांचे ओएस अपडेट्स आणि ६ वर्षांचे सिक्युरिटी अपेडट्सच्या माध्यमातून दीर्घकालीन विश्वसनीयता देखील देतो.
मनोरंजनासाठी डिझाइन करण्यात आलेला मोठा डिस्प्ले
पोको C85x ५जीमध्ये ६.९-इंच डिस्प्ले आहे, जो व्हिडिओ, गेम्स व दैनंदिन कन्टेन्टमधील मोठ्या व सर्वोत्तम व्युईंगसाठी डिझाइन करण्यात आला आहे. या डिस्प्लेमध्ये ३० हर्ट्झपासून १२० हर्ट्झपर्यंत अॅडप्टिव्ह रिफ्रेशर रेट आहे, ज्यामधून सुलभ व आकर्षक व्हिज्युअल्सची खात्री मिळते, तसेच ऊर्जा वापर सानुकूल करण्यासाठी रिफ्रेशन रेट्स सर्वोत्तमपणे समायोजित केले जातात.
अॅडप्टिव्ह १२० हर्ट्झ ते २४० हर्ट्झ टच सॅम्प्लिंगसह स्क्रिन गेमिंग व जलद नेव्हिगेशनदरम्यान प्रतिसादात्मक इंटरअॅक्शन्स देते. डिस्प्ले हाय ब्राइटनेस मोडमध्ये जवळपास ८०० नीट्स ब्राइटनेसपर्यंत देखील पोहोचतो, ज्यामुळे बाहेर सूर्यप्रकाशात देखील डिस्प्लेवरील चित्र स्पष्टपणे दिसते.
अधिक वापरासाठी डिवाईसमध्ये ट्रिपल टीयूव्ही-प्रमाणित आय प्रोटेक्शन डिस्प्ले, तसेच अधिक टिकाऊपणासाठी प्रोटेक्टेड ग्लास आहे.
अधिक वापरासाठी विशाल क्षमतेची बॅटरी
पोको सी८५एक्स ५जीमध्ये ६३०० एएमएच क्षमतेची बॅटरी आहे, जी दीर्घकाळापर्यंत स्ट्रीमिंग, ब्राऊजिंग व कम्युनिकेशन्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे, ज्यामुळे डिवाईसला वारंवार चार्जिंग करण्याची गरज भासत नाही.
या डिवाईसला १५ वॅट फार्स्ट चार्जिंगचा सपोर्ट आहे, तसेच बॉक्समध्ये चार्जर आहे आणि ७.५ वॅट रिव्हर्स चार्जिंग देखील देते, ज्यामुळे वापरकर्ते गरज असताना अॅक्सेसरीज किंवा इतर डिवाईसेसना देखील चार्ज करू शकतात.
दैनंदिन फोटोग्राफीसाठी एआय कॅमेरे
पोको C85x ५जीमध्ये ३२ मेगापिक्सल एआय ड्युअल रिअर कॅमेरा सिस्टम देखील आहे, जी दैनंदिन स्थितींमध्ये सुस्पष्ट फोटो कॅप्चर करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. पुढील बाजूस ८ मेगापिक्सल कॅमेरा सेल्फी व व्हिडिओ कॉल्सची सुविधा देतो, ज्यामुळे सहजपणे कनेक्टेड राहता येते आणि क्षणांना शेअर करता येते.
दैनंदिन सोयीसुविधेसाठी डिझाइन करण्यात आलेला स्मार्टफोन
या स्मार्टफोनमध्ये जलद अनलॉकिंगसाठी साइड-माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि धूळरोधक व जलरोधकसाठी आयपी५२- प्रमाणित संरक्षण आहे. सिंगल स्पीकरमधून अद्वितीय ऑडिओचा अनुभव मिळतो, जो जवळपास २०० टक्के व्हॉल्यूम देऊ शकतो, ज्यासह व्हिडिओ पाहताना किंवा संगीत ऐकण्याचा आनंद घेताना अनुभवामध्ये अधिक वाढ होते.
मोठी बॅटरी असताना देखील पोको C85x ५जीची जाडी अत्यंत स्लिम ८.१५ मिमी आहे, तर वजन २१० ग्रॅम आहे. या स्मार्टफोनमध्ये ३.५ मिमी हेडफोन जॅक आणि जवळपास २ टीबीपर्यंत विस्तारित स्टोरेज देखील आहे, ज्यामुळे दैनंदिन वापरकर्त्यांना अधिक स्थिरता मिळते.
किंमत व उपलब्धता
पोको C85x ५जीची किंमत १०,९९९ रूपयांपासून सुरू होते. या डिवाईसच्या विक्रीला १४ मार्च २०२६ पासून सुरूवात होईल आणि फ्लिपकार्ट व भारतभरातील आघाडीच्या रिटेल स्टोअर्समध्
ये उपलब्ध असेल.


